रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे भरतीमध्ये ८५ टक्के रिक्त जागा गँगमन, कीमन, हेल्पर, पॉइंटमॅन, असिस्टंट मास्टर स्टेशनच्या आहेत. तर १५ टक्के पदे टीटीई, बुकिंग क्लर्क आणि सुपरवायझरच्या आहेत. यामध्ये गॅझेटेड आणि नॉन गॅजेटेड जागांचा समावेश आहे.
रेल्वे गॅजेटेड जागा (Railway Gazetted Seats)
मध्य रेल्वेमध्ये ५६, पूर्व किनारपट्टी रेल्वेमध्ये ८७, पूर्व रेल्वेमध्ये १९५, पूर्व मध्य रेल्वेमध्ये १७०, मेट्रो रेल्वेमध्ये २२, उत्तर मध्य रेल्वेमध्ये १४१, उत्तर पूर्व रेल्वेमध्ये ६२, ईशान्य रेल्वेमध्ये ६२ जागा रिक्त आहेत. उत्तर रेल्वे फ्रंटमध्ये ११२, उत्तर रेल्वेमध्ये ११५, उत्तर पश्चिम रेल्वेमध्ये १००, दक्षिण मध्य रेल्वेमध्ये ४३, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमध्ये ८८, दक्षिण पूर्व रेल्वेमध्ये १३७, दक्षिण रेल्वेमध्ये ६५, पश्चिम मध्य रेल्वेमध्ये ५९, पश्चिम रेल्वेमध्ये १७२ रेल्वे आणि इतर घटकांमध्ये ५०७ राजपत्रित पदे रिक्त आहेत.
रेल्वे नॉनगॅझेट जागा (Railway Gazetted Seats)
मध्य रेल्वेमध्ये २७,१७७, पूर्व किनारपट्टी रेल्वेमध्ये ८,४४७, पूर्व रेल्वेमध्ये २८,२०४, पूर्व मध्य रेल्वेमध्ये १५,२६८, मेट्रो रेल्वेमध्ये ८५६, उत्तर मध्य रेल्वेमध्ये ९,३६६, उत्तर-पूर्व रेल्वेमध्ये १४,२३१, ईशान्य सीमा रेल्वे १५,४७७, उत्तर रेल्वे ३७,४३६, उत्तर पश्चिम रेल्वे १५,०४९, दक्षिण मध्य रेल्वे १६, ७४१, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे ९,४२२, दक्षिण पूर्व रेल्वे १६,८४७, दक्षिण भारतीय रेल्वे ९,५००, दक्षिण पश्चिम रेल्वेमध्ये ६,५२५, पश्चिम मध्य रेल्वेमध्ये ११,०७३ पश्चिम रेल्वेमध्ये २६,२२७ आणि इतर युनिटमध्ये १२,७६० नॉन-गॅझेटेड पदे रिक्त आहेत.
RailTel मध्ये तरुणांसाठी बंपर भरती
रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत एकूण ६९ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट Railtelindia.com वर अर्ज करू शकतात. याची अर्ज प्रक्रिया २३ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिटांनी समाप्त होईल. परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
RailTel भर्ती परीक्षा २०२२ ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. यामध्ये एकूण १५० गुणांसाठी बहुपर्यायी प्रश्न असतील. परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी निवडले जाईल. मुलाखतीसाठी ५० गुण असतील. ऑनलाइन चाचणी आणि मुलाखतीत किमान ६० टक्के गुण मिळवलेले विद्यार्थी यासाठी पात्र मानले जातील.