इंजिनीअरिंगमध्ये नव्या शाखांना मागणी

इंजिनीअरिंगमध्ये नव्या शाखांना मागणी


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

इंजिनीअरिंग कॉलेजांमध्ये (Engineering) पारंपरिक शाखांमधील प्रवेश घटत असताना नव्याने उदयाला येणाऱ्या शाखांची मागणी मात्र वाढत आहे. यामुळे या कॉलेजांनीही कात टाकण्यास सुरुवात केली आहे. परिणामी, २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (AICTE) तब्बल ४० हजार जागांना मान्यता दिली आहे.

देशातील इंजिनीअरिंग कॉलेजांमधील रिक्त जागांचे वाढते प्रमाण ही मोठी समस्या ठरली होती. यामुळे इंजिनीअरिंग कॉलेजांमध्ये नवीन शाखांचा उदय होणे आवश्यक होते. यानुसार अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने गेल्या काही वर्षांत अनेक धोरणात्मक बदल केले. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), डेटा सायन्ससारख्या अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला. यामुळे नवीन कॉलेजे सुरू करण्यावर बंदी असली तरी सध्या अस्तित्त्वात असलेल्या कॉलेजांमध्ये मागणी असलेल्या अभ्यासक्रमांच्या जागांना मान्यता देण्यात येत आहे.

यंदा कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशिन लर्निंग यातील १३ हजार ९५० जागांना मान्यता दिली आहे. त्यानंतर कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सायन्स या विषयाच्या ११ हजार ४० जागांना परवानगी देण्यात आली आहे. याचबरोबर गेल्या काही वर्षात मेकॅनिकल इंजिनीअरिंगच्या सुमारे ११ हजार, तर सिव्हील इंजिनीअरिंगच्या सुमारे १० हजार जागा घटल्याचेही परिषदेने दिलेल्या आकडेवारीत समोर आले आहे.

हेही वाचा :  Elon Musk इतका दिलदार? X युजर्सना न मागताच दिली 'इतकी' मोठी भेट

नोकरीच्या संधी

सध्या कॉलेजांना इंजिनीअरिंगच्या नवीन शाखांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. या अभ्यासक्रमातून पदवी घेतल्यानंतर नोकरीच्या संधीही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्याने विद्यार्थी याला पसंती देत आहेत. असे असले तरी पारंपरिक शाखाही बंद होणार नसल्याचे तज्ज्ञ सांगतात. मुंबईतीलही काही कॉलेजांनी इंजिनीअरिंगच्या नवीन शाखांचा पर्याय स्वीकारला आणि बायोटेक्नॉलॉजी आणि बायोमेडिकल इंजिनीअरिंग यासारख्या शाखा बंद केल्या आहेत.

दोन वर्षांत IIT आणि NIT मध्ये तब्बल १९ हजार जागा राहिल्या रिक्त… जाणून घ्या कारण

MUHS MBBS Admission: राज्यातील १० कॉलेजमधील वैद्यकीय जागांचा पेच सुटला
EIL Recruitment 2022: भारतात नोकरी मिळवा आणि परदेशात जा; इंजिनीअर्स इंडियामध्ये भरती

Source link