NBE FMGE 2022: फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट परीक्षेचे नोटिफिकेशन जाहीर

NBE FMGE 2022: फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट परीक्षेचे (foreign medical graduate exam, FMGE 2022) नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. राष्ट्रीय परीक्षा मंडळातर्फे (National Examination Board, NBE) परीक्षेचे वेळापत्रक अधिकृत वेबसाइट nbe.edu.in वर जाहीर करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया आज म्हणजेच १५ मार्च २०२२ रोजी दुपारी ३ वाजता सुरु झाली आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना एनबीईच्या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल.

एफएमजीईसाठी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, अर्जदार या परीक्षेसाठी ४ एप्रिल २०२२ रात्री ११.५५ पर्यंत अर्ज सबमिट करू शकतात. याची स्क्रीनिंग चाचणी ४ जून २०२२ रोजी घेतली जाणार आहे. तर परीक्षेचा निकाल ३० जून २०२२ रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

JIPMER Recruitment 2022: जिपमरमध्ये विविध पदांची भरती
NBE FMGE 2022: महत्त्वाच्या तारखा

FMGE अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – १५ मार्च २०२२ (दुपारी ३ नंतर)

FMGE नोंदणीची अंतिम तारीख – ४ एप्रिल २०२२ (रात्री ११.५५ पर्यंत)

FMGE फॉर्ममध्ये सुधारणा प्रक्रिया -फोटो, सही यामध्ये अंतिम दुरुस्तीसाठी करेक्शन विंडो उघडण्याची तारीख जाहीर केली जाणार आहे.

हेही वाचा :  मुंबई विद्यापीठ आयडॉलचे जानेवारी सत्राचे प्रवेश सुरू

डेमो चाचणी- तारीख जाहीर केली जाईल.

FMGE परीक्षेसाठी प्रवेशपत्र- तारीख लवकरच जाहीर केली जाईल

FMGE परीक्षेचा निकाल- ४ जून २०२२

BMC Recruitment: मुंबई महानगरपालिकेत भरती, थेट मुलाखतीतून होणार निवड
३० जून २०२२ पर्यंत निकालाची घोषणा
FMGE २०२२ परीक्षेत एमबीबीएस अभ्यासक्रमावर आधारित ३०० बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. एनबीईचे पात्रता निकष पूर्ण करणारे उमेदवार FMGE अर्ज फॉर्म २०२२ भरु शकतात. एमबीबीएस पदवी आणि इंटर्नशिप अंतिम मुदतीपूर्वी किंवा त्यापूर्वी पूर्ण केलेले उमेदवार २०२२ मध्ये एमएमजीईसाठी अर्ज करू शकतात.

उमेदवारांना परीक्षेसंदर्भात कोणतीही माहिती हवी असल्यास ते NBEMS उमेदवार केअर सपोर्टशी ०२२ ६१०८७५९५ वर संपर्क साधू शकतात. तसेच, NBEMS ईमेल आयडी [email protected] किंवा NBEMS वेब पोर्टलला भेट देऊ शकतात.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

PCMC Recruitment 2022: पिंपरी चिंचवड पालिकेत महिलांना नोकरीची संधी

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …