करिअर

खुशखबर! जगभरात मंदीचे सावट पण भारतीय कंपन्यांमध्ये मेगाभरती

वृत्तसंस्था, नवी दिल्लीजगभरातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा पवित्रा घेतलेला असताना भारतीय कंपन्यांनी मात्र, कर्मचारी भरतीवर भर दिला आहे. हायरिंग एजन्सी ‘जॉबस्पीक’च्या अहवालानुसार, यंदा नोव्हेंबरमध्ये कर्मचारी भरतीचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत ४३ टक्क्यांनी आणि ऑक्टोबरच्या तुलनेत २७ टक्क्यांनी वाढले आहे. देशातील बहुसंख्या कंपन्या सणासुदीनंतर नोव्हेंबरमध्ये कर्मचारी भरती करीत नाहीत. मात्र, यंदा हा कल मागे पडला आहे. चालू …

Read More »

‘तो’ निर्णय रद्द न केल्यास शिक्षक करणार आंदोलन

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोडखासगी विनाअनुदानित शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांतून अनुदानित शाळा-कनिष्ठ महाविद्यालय किंवा तुकडीवर बदली करण्यासंदर्भातील महाविकास आघाडी सरकारच्या काळातील शासन निर्णयास स्थगिती देण्याच्या विद्यमान शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयामुळे शिक्षक संघटनांची झोप उडाली आहे. या निर्णयाला राज्यभरातून शिक्षक संघटनांनी मोठा विरोध दर्शविला असून, नाशिकमध्येही मंगळवारी शिंदे-फडणवीस सरकारने ही स्थगिती उठवावी, या मागणीचे निवेदन राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. भाऊसाहेब …

Read More »

शाळा, कॉलेजांमध्ये मतदार साक्षरता मंडळ

म. टा. प्रतिनिधी,पुणेकॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणांमध्ये मतदान प्रक्रियेची जनजागृती करण्यासाठी आता पुणे शहर आणि जिल्ह्यात प्रथमच मतदार साक्षरता मंडळाची स्थापना करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात पहिला प्रयोग करण्यात येत असून, मोहिमेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्ता प्रमाणपत्रासह क्रेडिट पॉइंटही मिळणार आहेत. पुणे शहरासह जिल्ह्यातील ४३ कॉलेजांसह १५ शाळांमध्ये मतदार साक्षरता मंडळ स्थापन होणार आहे. ९० विद्यार्थ्यांची …

Read More »

दहावी, बारावी परीक्षा देणाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादमाध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावी परीक्षेच्या अनुषंगाने तयारी सुरू केली. करोनानंतर नियमित परीक्षा होत असल्याने, परीक्षा केंद्र, बैठक व्यवस्थेची मंडळाकडून चाचपणी करण्यात आली. आठ डिसेंबरपासून पुन्हा जिल्हानिहाय बैठकांचे नियोजन करण्यात आले. विभागात दहावी, बारावी परीक्षेसाठी नोंदणी संख्या वाढली आहे. करोना प्रादुर्भावामुळे २०२१ ची दहावी, बारावी परीक्षा झाली नाही. अंतर्गत मूल्यमापन गुणदान करण्यात आले. २०२२मध्ये …

Read More »

JEE Mains: जेईई मेन्स परीक्षेसंदर्भात महत्वाची अपडेट

JEE Mains:जेईई मेन्सच्या परीक्षेत गणित, फिजिक्स, केमिस्ट्री असे तीन विषयांचे पेपर्स द्यावे लागतील. याशिवाय, इंजिनीअरिंग, आर्किटेक्चर आणि प्लानिंग अशा तीन शाखांच्या पदवी प्रवेशासाठी ही प्रवेशपरीक्षा द्यावी लागते. यावर्षी जून आणि जुलै महिन्यात ही परीक्षा घेण्यात आली होती. ही परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना आयआयटी, एनआयटी, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ इंजिनीअरिंग सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी तसेच ट्रिपल आयटीमध्ये प्रवेश घेता येतो.   जेईई मेन्स …

Read More »

‘स्थलांतर प्रमाणपत्राअभावी शाळाप्रवेश थांबणार नाहीत’

School admissions : ‘शाळा स्थलांतर प्रमाणपत्राअभावी शालेय विद्यार्थ्यांचे प्रवेश थांबणार नाहीत’, अशी ग्वाही शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मंगळवारी दिली. पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश सुलभ होण्यासाठी याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.‘राज्यातील कोणत्याही अभ्यासक्रमाच्या प्राथमिक वा माध्यमिक शाळेत पहिली ते दहावीच्या वर्गात प्रवेशासाठी अन्य शाळेतून आलेला विद्यार्थी मागणी करीत असेल, अशा विद्यार्थ्याला आता सुलभ प्रवेश …

Read More »

MPSC: गट ‘क’ पदांसाठी आयोग घेणार भरती

म. टा. प्रतिनिधी, पुणेराज्यातील ‘क’ गटाची सर्व पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) भरण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर आता या पदभरतीच्या प्रत्यक्ष प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. महसूल विभागातील गट ‘क’ पदांच्या भरतीसाठी ‘एमपीएससी’ला परवानगी देण्यात आली असून, जानेवारी महिन्यात एमपीएससी प्रथमच गट ‘क’च्या पदांसाठी जाहिरात काढणार आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी होत असल्याने ‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांनी या निर्णयाबाबत समाधान व्यक्त केले …

Read More »

Bank Job: बॅंक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची संधी, ‘येथे’ पाठवा अर्ज

Bank Of Maharashtra Job: बॅंक भरती परीक्षांची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची अपडेट आहे. सरकारी बँकांमध्ये नोकरी करण्याची संधी चालून आली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्र ही सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. त्याचे मुख्यालय पुण्यात आहे. त्याच्या देशभरात एकूण २०६७ शाखा आहेत. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अधिकारी पदांच्या एकूण ५५१ रिक्त जागा भरल्या …

Read More »

Postman Recruitment: टपाल विभागात पोस्टमनची पदे रिक्त

म. टा. प्रतिनिधी, नागपूरआधुनिक जगातही स्वतःचे अस्तित्व टिकवून असलेल्या टपाल विभागात रिक्त पदांमुळे कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढला आहे. नागपूरचा विचार करता, विविध पदांवरील ३०३ पदे रिक्त असून त्यात सर्वाधिक १७५ पोस्टमनचा समावेश आहे. रेल्वे, पोस्ट, बीएसएनएल या सरकारी विभागांशी असलेले नागरिकांचे नाते जिव्हाळ्याचे आहे. जुन्या पिढीच्या हृदयाजवळ असणारी ही खाती नव्या पिढीलाही आपलीशी वाटतात. टपाल विभागाने काळानुरूप स्वत:मध्ये बदल केल्यामुळे …

Read More »

‘आधार’ नसेल तर विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचा नाही का?

म. टा. प्रतिनिधी, पुणेअनुदानित, सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांचे पालक विद्यार्थ्यांचे आधार ‘अपडेट’ करण्यासाठी सहकार्य करत नसून शाळांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विद्यार्थ्यांची आधार नोंदणी झाली नाही तर मुख्याध्यापकांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. अशा वेळी आधार नसलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश द्यायचे नाहीत का? असा प्रश्न मुख्याध्यापक महामंडळाकडून उपस्थित करण्यात आला आहे. आधार नोंदणीबाबत येत असलेल्या अडचणींचा उल्लेख करून …

Read More »

TET Scam: शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी सुरू

म. टा. प्रतिनिधी, पुणेराज्यभर गाजलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) गैरव्यवहारातील साडेसात हजारांहून अधिक शिक्षक अडकले आहेत. त्यापैकी पुणे जिल्ह्यातीसल १६१ शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी जिल्हा परिषद प्रशासनाने सोमवारपासून सुरू केली आहे. त्यामुळे ‘पवित्र पोर्टल’द्वारे नियुक्ती झालेल्या शिक्षकांऐवजी ‘टीईटी’द्वारे नियुक्त झालेल्या शिक्षकांच्या नोकरीवर गदा येण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे. त्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी संकेत दिले आहेत. …

Read More »

महापरिनिर्वाण दिन म्हणजे काय? बाबासाहेबांच्या पुण्यतिथीला का साजरा केला जातो?

Mahaparinirvan Diwas 2022: डॉ भीमराव रामजी आंबेडकर ज्यांना आपण सर्वजण डॉ बाबासाहेब आंबेडकर या नावाने ओळखतो. डॉ.आंबेडकरांना संविधानाचे जनक म्हटले जाते. ६ डिसेंबर १९५६ रोजी त्यांचे निधन झाले. दरवर्षी बाबासाहेबांच्या पुण्यतिथीचा हा दिवस महापरिनिर्वाण दिवस म्हणून साजरा केला जातो. यावेळी राज्यासह देशभरातील बाबासाहेबांचे लाखो अनुयायी दादर, चैत्यभूमी येथे एकत्र येतात. बाबा साहेबांना आदरांजली अर्पण करण्याचा हा दिवस आहे. बाबासाहेब आंबेडकर …

Read More »

धक्कादायक! मराठी शाळांची पटसंख्या आली निम्म्यावर

म. टा. प्रतिनिधी, मुंबईमुंबई महापालिकेच्या मराठी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या गेल्या १० वर्षांत ५० टक्क्यांनी घटली आहे. पालिकेच्या शाळेत २०१२-१३ मध्ये १ लाख ३ हजार विद्यार्थी शिकत होते. ही संख्या घटून २०२१-२२ मध्ये ५१,६९१ पर्यंत खाली आली आहे. मराठीपाठोपाठ पालिकेच्या हिंदी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थी संख्या ४४ टक्क्यांनी, उर्दू माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थी संख्या ३० टक्क्यांनी घटली आहे. त्याचवेळी पालिकेच्या इंग्रजी …

Read More »

बाबासाहेबांच्या ‘या’ १० विचारांमध्ये आजही लाखो तरुणांचे जीवन बदलण्याची ताकद

Bhimrao Ambedkar Quote: डॉ. भीमराव आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण ६ डिसेंबर १९५६ रोजी झाले. भारतातील सर्वात प्रमुख समाजसुधारकांपैकी एक असलेले आंबेडकर हे भारतातील जातिव्यवस्थेमुळे निर्माण झालेल्या असमानतेविरुद्धच्या लढ्यासाठी ओळखले जातात. दलित कुटुंबात जन्मलेल्या बाबासाहेबांनी समाजाचे शोषण आणि भेदभाव पाहीला. यातून त्यांना समानतेसाठी आजीवन धर्मयुद्ध सुरू करण्याची प्रेरणा मिळाली.बाबासाहेबांची ओळख एक न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि समाजसुधारक अशी आहे. ते संविधानाचे शिल्पकार आणि …

Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षणविषयक विचार

– डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणवंचित दलित समाजाच्या शिक्षणासाठी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. – मागासवर्गीयांच्या शिक्षणासंदर्भात बाबासाहेबांनी जे चिंतन केले तेही तितकेच मूलगामी स्वरूपाचे आहे. ज्ञानाअभावी व्यक्ती ‌आणि समाजाचे नुकसान जसे होते, तसेच एखादी व्यक्ती वा समूहाला शिक्षण नाकारणे म्हणजे माणूस म्हणून त्याचे अस्तित्व नाकारून त्याच्या क्षमता मारून टाकणे होय; अशी बाबासाहेबांची शिक्षणविषयक धारणा होती.– बाबासाहेबांना उच्चशिक्षणाद्वारे समता, स्वातंत्र्य, बंधुभाव …

Read More »

महापरिनिर्वाण दिन: बाबासाहेब आंबेडकरांबद्दलच्या १० गोष्टी जाणून घ्या, गर्वाने म्हणाल ‘जय भीम’

Dr Bhimrao Ambedkar: डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी ६ डिसेंबर रोजी भारतात साजरी केली जाते, ज्याला महापरिनिर्वाण दिवस असेही म्हणतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि समाजसुधारक होते आणि त्यांना ‘भारतीय राज्यघटनेचे जनक’ म्हणूनही ओळखले जाते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दलित, स्त्रिया, मजूर यांच्यावरील सामाजिक भेदभावाविरुद्ध आवाज उठविला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी झाला. ६ डिसेंबर १९५६ …

Read More »

MAHAGENCO Recruitment: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत बंपर भरती

MAHAGENCO Recruitment: चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड येथे विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन लिमिटेडमध्ये एकूण ६६१ पदे भरली जाणार आहेत. …

Read More »

CLAT Exam: विधी विद्यापीठांतील प्रवेशांवर सरन्यायाधीशांचे प्रश्नचिन्ह

वृत्तसंस्था, पणजीराष्ट्रीय विधी विद्यापीठांतील विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेच्या स्वरूपावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी शनिवारी येथे प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सामायिक प्रवेश चाचणी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना या विद्यापीठांत प्रवेश दिला जातो. परंतु प्रवेशासंबंधीचे हे स्वरूप परिपूर्ण नसून कायदा व न्यायाविषयी कळकळ असणारे विद्यार्थी त्यातून निर्माण होतीलच याची शाश्वती नाही, असे ते म्हणाले. ‘इंडिया इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ लीगल एज्युकेशन अँड रिसर्च’ या संस्थेतर्फे …

Read More »

‘आरक्षणामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय’

म. टा. प्रतिनिधी, पुणे‘दहा वर्षांपेक्षा अधिक काळ सेवा झालेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदांच्या भरतीमध्ये आरक्षण नको,’ अशी मागणी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केली आहे. यापूर्वीच सरकारने वेगवेगळ्या प्रकारांत आरक्षण दिले असून, आणखी एका आरक्षणामुळे अनेक वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याची भूमिका विद्यार्थी मांडत आहेत. दहा वर्षे सेवा झालेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद सरळसेवा भरतीमध्ये दहा …

Read More »

BMC Recruitment: मुंबई पालिकेअंतर्गत नोकरीची संधी, थेट मुलाखतीसाठी ‘या’ पत्त्यावर राहा उपस्थित

BMC Recruitment: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई पालिकेअंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.लोकमान्य टिळक महाविद्यालयातील बधिरिकरणशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक पदाच्या २८ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ही पदे कंत्राटी स्वरुपाची असणार आहेत. या …

Read More »