करिअर

Indian Army Job: बारावी उत्तीर्णांना भारतीय सैन्यात लेफ्टनंट ऑफिसर बनण्याची संधी, ‘येथे’ पाठवा अर्ज

Indian Army Recruitment: बारावी उत्तीर्ण तरुणांना भारतीय सैन्यात लेफ्टनंट अधिकारी बनण्याची सुवर्णसंधी आहे. भारतीय लष्करातर्फे या पदभरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. भारतीय सैन्यात टीईएस-४९ मध्ये ९० रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. भारतीय लष्कराच्या तांत्रिक प्रवेश योजनेअंतर्गत, टीईएस-४९ साठी अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in वर ३० डिसेंबरपर्यंत अर्ज पाठविता येणार आहे. या पदभरती अंतर्गत एकूण ९० रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. चार वर्षांचा …

Read More »

Police Recruitment: पोलीस दलात भरतीचे तृतीयपंथींचे स्वप्न भंगणार?

म. टा. प्रतिनिधी, पिंपरीपोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून गेल्या काही वर्षांपासून भरतीची तयारी करणाऱ्या शहरातील २७ तृतीयपंथींचे पोलीस होण्याचे स्वप्न भंगणार, की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एवढी वर्षे ज्या भरतीची वाट पाहिली आणि ज्यासाठी तयारी केली, त्या भरतीच्या अर्जात तृतीयपंथींसाठी रकानाच (कॉलम) ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे या तृतीयपंथींना आता पोलीस भरतीचा अर्ज करता येत नाही. या …

Read More »

राज्यातील १९ लाख विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड नाही, शिक्षण विभागाच्या मोहिमेतून माहिती समोर

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादराज्यातील १९ लाख विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड नसल्याची माहिती शिक्षण विभागाच्या मोहिमेतून समोर आली आहे. ३९ लाख विद्यार्थ्यांची आधारकार्ड नोंदच होत नाही. यामुळे शिक्षकांची डोकेदुखी वाढली असून, विद्यार्थ्यांची माहिती ‘सरल प्रणाली’त भरताना मोठी अडचण येत आहे. विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन, मोफत पुस्तके-गणवेश मिळवण्यासाठी सरल प्रणालीत आधारकार्ड नोंदणी गरजेची आहे. माहिती भरण्याची अंतिम मुदत बुधवारी ३० नोव्हेंबर रोजी संपत आहे. ही …

Read More »

राज्यातील महाविद्यालयांचे होणार ऑडिट

म. टा. प्रतिनिधी, पुणे‘राज्यातील सर्व महाविद्यालयांचे शैक्षणिक आणि प्रशासकीय लेखापरीक्षण (ऑडिट) करण्यात येणार आहे,’ अशी माहिती उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी शुक्रवारी दिली. नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी जून २०२३पासून करण्यात येणार आहे. चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम हा त्यातील पहिला टप्पा असून, त्यासाठी सरकारी महाविद्यालयांचा ‘संस्था विकास आराखडा’ (आयडीपी) तयार करण्यात येणार असल्याचेही डॉ. देवळाणकर यांनी स्पष्ट केले. उच्च …

Read More »

OBC Students Hostel: ओबीसी वसतिगृहांसाठी ३२ जिल्ह्यांत जागा मिळेना!

नागपूर : राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ७२ शासकीय वसतिगृहे सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने २०१९मध्ये घेतला. या वसतिगृहांसाठी जागेचा शोध घेण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिली. या निर्णयाला पावणेचार वर्षे उलटले तरी एकूण ३६पैकी ३२ जिल्ह्यांमध्ये शासकीय जागाच उपलब्ध झालेली नाही. केवळ चार जिल्ह्यांतच जागा मिळाली. हा विषय मार्गी लावण्यासाठी आता अशासकीय संस्थांना ही वसतिगृहे चालविण्याची जबाबदारी दिली जाणार आहे. …

Read More »

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील गणेश अथर्वशीर्ष अभ्यासक्रमास प्राध्यापकांकडून विरोध

SPPU Ganesh Atharvashirsha course: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गणेश अथर्वशीर्ष सर्टिफिकेट कोर्सला सुरुवात झाल्याने वाद निर्माण झाला आहे. पुणे विद्यापीठाच्या मान्यतेने आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या पुढाकाराने हा कोर्स होत आहे. पण कोर्स सुरु होण्याआधीच त्यावर विविध स्तरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. विद्यापीठातील प्राध्यापकांनी या निर्णयाला जोरदार विरोध केला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संस्कृत-प्राकृत विभाग, लोकमान्य टिळक …

Read More »

दहावीच्या सराव परीक्षेला सुरुवात

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबईविद्यार्थ्यांच्या मनातील दहावीच्या परीक्षेची भीती दूर व्हावी, त्यांना परीक्षेचा सराव व्हावा म्हणून गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने घेण्यात येणारी एसएससी सराव परीक्षा शनिवारपासून नवी मुंबईत सुरू होत आहे. या सराव परीक्षेला दरवर्षी चांगला प्रतिसाद मिळत असून, यंदा त्याचे २४ वे वर्ष आहे. या परीक्षेच्या माध्यमातून दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचा चांगला सराव करता येणार असल्याची माहिती ट्रस्टचे सचिव, …

Read More »

मुंबईत महारोजगार मेळावा, ७ हजार नोकऱ्या होणार उपलब्ध

Maharojgar Mela: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्वाची अपडेट आहे. राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत तरुणांना रोजगार उपलब्ध करुन दिला जात आहे. मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यामार्फत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा ३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजेपासून एलफिन्स्टन टेक्नीकल हायस्कूल, ३ महापालिका मार्ग, धोबी तलाव, …

Read More »

IITच्या ३२ विद्यार्थ्यांचे ‘कोटी’ उड्डाण, पहिल्याच प्लेसमेंटमध्ये घसघशीत वार्षिक पॅकेज

वृत्तसंस्था, नवी दिल्लीकरोनापश्चात झालेल्या पहिल्याच प्रत्यक्ष प्लेसमेंट मोहिमेत आयआयटीच्या ३२ विद्यार्थ्यांना एक कोटी रुपयांपेक्षा अधिकचे वार्षिक पॅकेज मिळाले आहे. आयआयटीच्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या आंतरराष्ट्रीय ऑफर्समध्येही यंदा वाढ झाल्याचे दिसून आले. प्लेसमेंट मोहिमेंतर्गत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी आयआयटी मद्रासच्या किमान २५, तर आयआयटी गुवाहाटीच्या पाच, तर आयआयटी रूरकीच्या दोन विद्यार्थ्यांना वार्षिक एक कोटी रुपयांपेक्षा अधिकचे वार्षिक पॅकेज दिले आहे. आयआयटी मद्रासने यावर्षी आत्तापर्यंतच्या सर्वोच्च …

Read More »

Police Recruitment: ‘तरुणपण पोलीस भरतीच्या तयारीतच घालवायचे का?’

म. टा. वृत्तसेवा, जव्हारजव्हारसारख्या ग्रामीण भागातील आदिवासी युवक तांत्रिक, पदविका, पदवीधर शिक्षण घेऊन हाताला काम मिळत नसल्याने पोलीस दलात कायमस्वरूपी नोकरी मिळावी, यासाठी भरीसाठी कसून मेहनत करत आहेत. परंतु शासन आणि प्रशासन यांचा मेळ बसत नसल्याने पोलिस भरतीची प्रक्रिया सातत्याने पुढे ढकलली जात असल्याने, आदिवासी तरुण-तरुणींनी संपात व्यक्त केला आहे. आम्ही आयुष्यभर पोलीस भरतीची तयारी करत बसायचे का, असा संतप्त …

Read More »

MMRC Job: मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये भरती, ‘येथे’ पाठवा अर्ज

MMRC Recruitment: मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. याअंतर्गत एकूण २१ रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये महाव्यवस्थापक, उप. महाव्यवस्थापक (सिग्नल आणि टेलिकॉम), उप. महाव्यवस्थापक (साहित्य व्यवस्थापन), सहायक महाव्यवस्थापक …

Read More »

पोलीस उपनिरीक्षक पदांसाठीच्या शारीरिक चाचणीनंतर चारच तासात निवड यादी

Police Recruitment: पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हवालदार आणि सहायक पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांना पोलीस उपनिरीक्षक पदांसाठीच्या शारीरिक चाचणीनंतर चार तासातच जलदगतीने आणि उमेवारांना प्रतिक्षा करण्याची संधी न देता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने निवड यादी व सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली आहे.पोलीस उपनिरीक्षक पदांसाठीच्या २५० पदांवर पदोन्नती देण्याकरीता विभागीय स्पर्धा परीक्षेतील १०३१ उमेदवारांची शारीरिक चाचणी दिनांक २८ नोव्हेंबर, २०२२ ते दि. …

Read More »

Talathi Bharti: राज्यात तलाठी पदांची बंपर भरती; पात्रता, पगार सर्वकाही जाणून घ्या

Talathi Recruitment: तलाठी भरतीची वाट पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य शासनाकडून तलाठी भरतीसंदर्भात नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. या अंतर्गत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये भरती केली जाणार आहे. यानुसार महसूल विभाग अंतर्गत तलाठी पदाच्या ४१२२ पदांची भरती होणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात …

Read More »

महापालिकेतील अग्निशमन, आरोग्य विभागातील भरतीला हिरवा कंदील

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिकमहापालिकेतील अग्निशमन विभागातील ३४८, तसेच आरोग्य व वैद्यकीय विभागातील ३५८ अशा एकूण ७०६ पदांसाठीच्या भरतीची प्रक्रियेला प्रशासनाने गती दिली आहे. राज्य सरकारने नोकरभरतीसाठी ‘टीसीएस’ तसेच ‘आयबीपीपीएस’ या दोन कंपन्यांमार्फत नोकरभरतीला हिरवा कंदील दिल्यानंतर प्रशासनाने या दोन कंपन्यांकडून नोकरभरती संदर्भातील प्रस्ताव मागितला आहे. यासंदर्भात सामान्य प्रशासनाकडून विभागाकडून दोन्ही कंपन्यांना पत्र पाठविण्यात आले आहे. या कंपन्यांकडून प्रस्ताव आल्यानंतर …

Read More »

मराठा उमेदवारांचा पुन्हा भ्रमनिरास, आर्थिक दुर्बल कोट्यातून नियुक्तीपत्र देण्यास स्थगिती

म. टा. प्रतिनिधी, मुंबईमराठा आरक्षणासाठीच्या राखीव जागांवरून परीक्षा दिलेल्या व त्यानंतर आर्थिक दुर्बल घटकांच्या (ईडब्ल्यूएस) कोट्यातून नियुक्तीपत्रे मिळणार असलेल्या उमेदवारांचा पुन्हा एकदा भ्रमनिरास झाला आहे. य़ा उमेदवारांना आर्थिक दुर्बल कोट्यातून नियुक्तीपत्रे प्रदान करण्यास गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. यामुळे आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांसह मराठा ठोक मोर्चाच्या वतीने यशवंतराव चव्हाण सेंटरबाहेर गुरुवारी सायंकाळी आंदोलन केले. तसेच ईडब्ल्यूएस आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत सरकारने …

Read More »

ISC,ICSE Exam Date 2023: दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

ISC, ICSE Exam Date 2023: काऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनने (Council for the Indian School Certificate Examinations, ISCE)ICSE म्हणजेच दहावी आणि ISC म्हणजे बारावीच्या परीक्षांसदर्भात अपडेट जाहीर करण्याात आले आहे. यानुसार बारावीची परीक्षा १३ फेब्रुवारी तर दहावीची परीक्षा २७ फेब्रुवारी २०२३ पासून सुरू होणार आहे. आयसीएसई बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cisce. org वर सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. …

Read More »

मिरा-भाईंदर महापालिकेत नोकरीची संधी, भरती प्रक्रियेविषयी जाणून घ्या

म. टा. वृत्तसेवा, मिरा-भाईंदरमिरा-भाईंदर महापालिका हद्दीतील दोन मैदानांची निवड पोलिस भरती प्रक्रिया राबवण्यासाठी करण्यात आली आहे. पुरुष व महिला उमेदवारांसाठी स्वतंत्र मैदानात चाचणी घेतली जाणार आहे. मिरा-भाईंदर वसई-विरार आयुक्तालयाच्या स्थापनेनंतर प्रथमच शिपायांच्या ९९६ जागा प्रत्यक्ष भरती प्रक्रियेद्वारे भरल्या जाणार आहेत. त्यासाठी पोलिसांकडून ही तयारी केली जात आहे. मिरा-भाईंदर वसई-विरार पोलिस आयुक्तालयात स्थापनेपासूनच मनुष्यबळाची मोठी कमतरता आहे. त्यापैकी काही रिक्त पदे …

Read More »

UPSC Recruitment 2022: केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांची भरती

UPSC Recruitment 2022: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून (Union Public Service Commission, UPSC) वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (Senior Scientific Assistant) पदांची भरती केली जाणार आहे. या भरतीद्वारे एकूण ४३ पदे भरली जातील. या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक आहेत उमेदवार अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाऊन फॉर्म भरू शकतात. यूपीएससी अंतर्गत सहाय्यक कृषी विपणन सल्लागार (Assistant Agricultural Marketing Adviser)ची ५ पदे, वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यकची …

Read More »

AAI Recruitment: भारतीय विमानतळ प्राधिकरणात नोकरी करण्याची संधी, जाणून घ्या तपशील

AAI Recruitment 2022: भारतीय विमानतळ प्राधिकरणात (Airports Authority of India, AAI) विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये ग्रॅज्युएट/डिप्लोमा प्रशिक्षणार्थी पदांची भरती केली जाणार आहे. याअंतर्गत एकूण १२५ रिक्त पदे भरली जाणार आहेत. सिव्हिल ग्रॅज्युएट(Civil (Graduation) …

Read More »

नोटा छापण्याच्या कारखान्यात नोकरी आणि ९५ हजारपर्यंत पगार, आता वेळ घालवू नका ‘ही’ घ्या अर्जाची लिंक

Currency Note Press Recruitment: चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. नाशिकच्या चलन नोट प्रेस येथे विविध पदंची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. चलन नोट प्रेसमध्ये पर्यवेक्षक (Supervisor), कनिष्ठ तंत्रज्ञ (Junior Technician) या पदांसाठी ही …

Read More »