Talathi Bharti: राज्यात तलाठी पदांची बंपर भरती; पात्रता, पगार सर्वकाही जाणून घ्या

Talathi Recruitment: तलाठी भरतीची वाट पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य शासनाकडून तलाठी भरतीसंदर्भात नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. या अंतर्गत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये भरती केली जाणार आहे. यानुसार महसूल विभाग अंतर्गत तलाठी पदाच्या ४१२२ पदांची भरती होणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

राज्यात ४,१२२ तलाठी भरती अंतर्गत नाशिक विभागात १०३५, औरंगाबाद विभागात ८४७, कोकण विभागात ७३१, नागपूर विभागात ५८०, अमरावती विभागात १८३ तर पुणे विभागात ७४६ पदे भरली जाणार आहेत.

गेल्या कित्येक महिन्यांपासून अनेक जिल्ह्यातील तलाठी पदे भरली गेली नाहीत. यासाठी नुकताच शासन निर्णय पारित करण्यात आला आहे. तलाठी भरती न झाल्याने कामकाजाचा भार वाढत चालला आहे. एका तलाठ्याकडे अतिरिक्त भार आल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

Talathi Bharti: पदभरतीचा तपशील जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
तलाठी भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्था अथवा विद्यापीठातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषयांचं चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे. तसेच राज्य सरकारच्या सर्व अटी आणि शर्थींचे पालन करणे गरजेचे आहे.

हेही वाचा :  अन्न-पाणी दुरापास्त, २५ किमी पायपीट; युक्रेनमधील विद्यार्थ्यांचे हाल

अर्ज करताना उमेदवारांचे वय १८ ते ३८ वर्षांदरम्यान असावे. एससी/एसटी/पीडब्ल्यूडी/ओबीसी उमेदवारांना वयोमर्यादेत शिथिलता देण्यात आली आहे.
तलाठी पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ५,२०० रुपये ते २० हजार २०० रुपये पगा दिला जाणार आहे.

मध्य रेल्वेत विविध पदांची भरती, ‘ही’ घ्या अर्जाची थेट लिंक
पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.

या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. तसेच उमेदवारांना संबंधित संस्थेने दिलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक आहे.

AAI Recruitment: भारतीय विमानतळ प्राधिकरणात नोकरी करण्याची संधी, जाणून घ्या तपशील
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.

यासाठी जानेवारी २०२३ पासून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करताना उमेदवारांना जीमेल अकाऊंटची मदत घ्यावी लागेल. पूर्ण अर्ज भरल्यावर अर्जाची प्रिंट देखील जीमेलवर उपलब्ध होणार आहे.

हेही वाचा :  शाळा, कॉलेजांमध्ये मतदार साक्षरता मंडळ

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

BMC Recruitment: सायन रुग्णालयात विविध पदांची भरती

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …