MMRC Job: मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये भरती, ‘येथे’ पाठवा अर्ज

MMRC Recruitment: मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. याअंतर्गत एकूण २१ रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये महाव्यवस्थापक, उप. महाव्यवस्थापक (सिग्नल आणि टेलिकॉम), उप. महाव्यवस्थापक (साहित्य व्यवस्थापन), सहायक महाव्यवस्थापक (RS), सहायक महाव्यवस्थापक (TP), उप. नगररचनाकार, उप. अभियंता (PST),उप. अभियंता (सिग्नल आणि टेलिकॉम), उप. अभियंता, सहायक व्यवस्थापक (E & M), सहायक व्यवस्थापक (साहित्य व्यवस्थापन), कनिष्ठ अभियंता- II (Depo & MP), कनिष्ठ अभियंता- II (रोलिंग स्टॉक), संचालक (Systems and O & M), संचालक (Finance),संचालक (Planning & Real Estate) ही पदे भरली जाणार आहेत.

पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.

या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. तसेच उमेदवारांना संबंधित संस्थेने दिलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक आहे.

हेही वाचा :  केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत विविध पदांची भरती

मध्य रेल्वेत विविध पदांची भरती, ‘ही’ घ्या अर्जाची थेट लिंक

पगार

या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना १ लाख ८० हजार ते ३ लाख ४० हजाररुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.

शेवटची तारीख

५ डिसेंबरपासून याची अर्ज प्रक्रिया सुरु होणार असून १८ जानेवारी २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.

पदभरतीचा तपशील जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

पदभरतीचा तपशील जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

BMC Recruitment: सायन रुग्णालयात विविध पदांची भरती

AAI Recruitment: भारतीय विमानतळ प्राधिकरणात नोकरी करण्याची संधी, जाणून घ्या तपशील

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …