Education Budget 2022: राज्याच्या अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रासाठी काय? जाणून घ्या

Education Budget 2022: महाराष्ट्र सरकारने २०२२-२३ (Maharashtra Budget 2022) या वर्षासाठीचा अर्थसंकल्प जाहीर केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांनी विधानसभेत अर्थसंकल्प (Budget 2022) जाहीर केला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते. यामध्ये शिक्षण क्षेत्रासाठीही तरतूद करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये (Education Budget 2022) मुंबई विद्यापीठासाठी २ कोटींची तरतूद करण्यात आली आहेत. तर कोल्हापूर विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठाच्या आवारात उभारल्या जाणाऱ्या लता मंगेशकर संगीत महाविद्यालयासाठी १०० कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे.

अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीच्या मागणीकडे यंदा राज्य सरकारने लक्ष दिल्याचे दिसून आले आहे. अंगणवाडी सेविकांना आतापर्यंत ११०० रुपये मानधन मिळत होते. यामध्ये वाढ करुन ते २५०० इतके करण्यात आले आहे.

महापारेषणमध्ये दहावी उत्तीर्णांना नोकरीची संधी

ICT मध्ये पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी, २५ हजारपर्यंत मिळेल पगार
उच्च व तंत्र शिक्षण विभागासाठी १ हजार १६० कोटी रुपयांचा निधी उभारण्यात येणार आहे. तसेच मुंबईतील पशुवैद्यकीय महाविद्यालयात अनेक वर्षे जुन्या वास्तू आहेत. यांची डागडुजी आणि देखभाल यांच्यासाठी १० कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे.

हेही वाचा :  Maharashtra Budget 2023: फडणवीसांनी अर्थसंकल्प मांडला आणि महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं

यंदाच्या अर्थसंकल्पात शालेय शिक्षण विभागासाठी २३५४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर क्रीडा विभागासाठी ३५४ कोटी रुपये दिले जाणार आहेत. यासोबतच तृतीयपंथींना स्वतंत्र ओळखपत्र देण्यात येणार असल्याची घोषणा देखील यावेळी करण्यात आली आहे.

Government Job साठी ‘या’ वेबसाइट्सवर अर्ज केलात तर बसेल भुर्दंड
मुंबई पालिकेच्या विद्युतपुरवठा आणि परिवहन विभागात भरती, दीड लाखापर्यंत मिळेल पगार

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …