महाराष्ट्रात वैद्यकीय शिक्षण होणार स्वस्त, विद्यार्थ्यांना परदेशी जाण्याची गरज नाही

Maharashtra Medical education: भारतातील वैद्यकीय शिक्षण (India Medical Education) परवडू न शकल्याने विद्यार्थी परदेशाचा (foregn Education) मार्ग स्वीकारतात. युक्रेन युद्धाच (Ukrain war) भारतीय विद्यार्थी अडकल्यानंतर (indian Student in Ukrain) या विषयावर चर्चा होऊ लागली आहे. दरम्यान, देशामध्येच विद्यार्थ्यांना परवडेल अशा शुल्कात वैद्यकीय शिक्षण पूर्ण करता आल्यास ते देशाबाहेर जाणार नाहीत असा निष्कर्ष यातून काढण्यात आला. महाराष्ट्र सरकारकडून यासंदर्भात सकारात्मक पाऊल उचलल्याचे दिसून येत आहे.

महाराष्ट्र सरकारकडून लवकरच युक्रेन आणि रशियाचे वैद्यकीय अभ्यासक्रम आणि त्यांच्या फीचा अभ्यास केला जाणार आहे. याबाबत राज्य सरकारनेही अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. युक्रेन आणि रशियाच्या धर्तीवर राज्यातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची व्यवस्था करणे हा यामागचा उद्देश आहे. महाराष्ट्र सरकारचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. विद्यार्थी परदेशात का शिकायला जातात? याचा अभ्यास सरकार करेल, असेही ते म्हणाले.

विद्यार्थ्यांनी परदेशात शिकण्यासाठी जाण्याऐवजी येथेच शिक्षण घ्यावे, यासाठी पावले उचलली जातील, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. केंद्र आणि राज्य सरकार या मुद्द्यावर एकत्र काम करणार असल्याचे ते म्हणाले. काँग्रेस पक्षाच्या डिजिटल सदस्यत्व मोहिमेत सहभागी झाले असताना ते बोलत होते. यामाध्यमातून डिजिटल मेंबरशिपच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची ओळख होईल असे कॉंग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा :  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत विविध पदांची भरती

भारतीय विद्यार्थी शिकण्यासाठी युक्रेनमध्ये का जातात? जाणून घ्या

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या प्रशासकीय विभागात भरती, २५ हजार ते १ लाखापर्यंत मिळेल पगार
TIFR Recruitment: टाटा रिसर्च सेंटरमध्ये भरती, पदभरतीचा तपशील जाणून घ्या
युक्रेनमध्ये शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना शिक्षण मध्येच अर्धवट सोडून परतावे लागत आहे. काही विद्यार्थी आपला अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या अंतिम टप्प्यात आहेत. आता त्यांच्या समोर वेगळेच संकट उभे आहे. त्यांचे करिअर धोक्यात आहे. युक्रेनमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण देणारी प्रमुख १८ विद्यापीठे आहेत. रशियाच्या हल्ल्यानंतर या विद्यापीठांचे काय होणार, याचा नेमका अंदाज तूर्त कोणालाच नाही. ज्या पद्धतीने युद्धामुळे युक्रेनमधील शहरे उद्धवस्त होत आहेत, ते पाहता तेथे लगेच सर्व पूर्वपदावर येणे कठीण आहे.

Russia Ukraine War: युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांनी शिक्षणावर खर्च केलेले लाखो रुपये वाया जाणार? करिअरवर संकट
विद्यार्थ्यांसमोर अन्य अनेक अडचणी
युक्रेनमध्ये सहा वर्षांचा एमबीबीएस कोर्स पूर्ण करण्यासाठी एका विद्यार्थ्याला सरासरी २० ते २५ लाख रुपये शुल्क भरावे लागते. काही विद्यार्थ्यांची सोय विद्यापीठांच्या वसतिगृहात होते, तर काहींना बाहेर राहावे लागते. या सर्व विद्यार्थ्यांवर तूर्त तर मायदेशी परतण्याचे मोठे आव्हान आहे. त्यानंतर त्यांच्यासमोर अर्धवट शिक्षणाचे काय करायचे, ते कुठे कसे पूर्ण करायचे, की परिस्थिती सामान्य होण्याची वाट पाहायची, किती वेळ वाट पाहायची असे अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत.

हेही वाचा :  नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन अंतर्गत असिस्टंट मॅनेजर पदांची भरती

फिल्मसिटीमध्ये नोकरीची संधी, जाणून घ्या तपशील
Government Job: ओएनजीसीमध्ये विविध पदांची भरती, ‘येथे’ करा अर्ज

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …