MAHAGENCO Recruitment: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत बंपर भरती

MAHAGENCO Recruitment: चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड येथे विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन लिमिटेडमध्ये एकूण ६६१ पदे भरली जाणार आहेत. याअंतर्गत असिस्टंट इंजिनीअरची ३३९ पदे आणि ज्युनिअर इंजिनीअरची ३२२ पदे भरली जाणार आहेत.

असिस्टंट इंजिनीअर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून बीई/बीटेक इन इलेक्ट्रीकल इंजिनीअरिंग, मेकॅनिकल इंजिनीअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग, इंस्ट्रमेंटेशन इंजिनीअरपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना १ लाख १९ हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.

MAHAGENCO Job: पदभरतीचा तपशील पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ज्युनिअर इंजिनीअर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून डिप्लोमा इन इलेक्ट्रीकल इंजिनीअरिंग/ मेकॅनिकल इंजिनीअरिंग/ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग, इंस्ट्रुमेंटेशन इंजिनीअरिंगपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना १ लाख रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.

हेही वाचा :  JEE Mains:'आयआयटी-जेईई मेन्स' पुढे ढकलणार? मुंबई हायकोर्टचा महत्वपूर्ण निर्णय

AAI Recruitment: भारतीय विमानतळ प्राधिकरणात नोकरी करण्याची संधी, जाणून घ्या तपशील

MMRC Job: मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये भरती, ‘येथे’ पाठवा अर्ज
पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.

या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. तसेच उमेदवारांना संबंधित संस्थेने दिलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक आहे.

१७ डिसेंबर २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा
नोटा छापण्याच्या कारखान्यात नोकरी आणि ९५ हजारपर्यंत पगार, आता वेळ घालवू नका ‘ही’ घ्या अर्जाची लिंक

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …