मिर्झापूरच्या तिसऱ्या सिझनचं शूटिंग पूर्ण झालं, अली फजलनं शेअर केली पोस्ट

Ali Fazal Mirzapur 3: मिर्झापूर या वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या सीरिजचे दोन भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला. या सीरिजच्या तिसऱ्या सिझनची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते.  मिर्झापूरमधील गुड्डू पंडित  ही भूमिका साकारणारा अभिनेता अली फजलनं (Ali Fazal) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.  मिर्झापूर- 3 (Mirzapur 3) चं शूटिंग पूर्ण झाले आहे. आता लवकरच मिर्झापूर सीरिजचा तिसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

मिर्झापूर या वेब सीरिजच्या नावाचा समावेश हिंदी भाषेतील सर्वात लोकप्रिय वेब सीरिजच्या यादीत केला जातो. सीरिजमध्ये प्रमुख भूमिका अभिनेता अली फजलनं सोशल मीडियावर मिर्झापूर सीरिजच्या नव्या सिझनच्या शूटिंगबाबत माहिती दिली.

अली फजलची पोस्ट

अली फजलनं सोशल मीडियावर मिर्झापूर वेब सीरिजच्या टीमचा फोटो शेअर केला. हा फोटो शेअर करुन त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘माझी प्रिय टीम, तुम्ही मिर्झापूरच्या जगावर केलेल्या प्रेमासाठी आणि मेहनतीबद्दल मी तुमचे आभार मानतो. इतर दोन सीझनप्रमाणेच सीझन 3 हा माझ्यासाठी खूप खास आहे. माझे सह कलाकार, तुम्हाला माहित आहे की तुम्ही सर्वोत्कृष्ट आहात. आणि तुला माहित आहे मी तुझ्यावर किती प्रेम करतो. अॅमेझॉनचे देखील आभार.’

हेही वाचा :  स्पेन ते फ्रान्स; आठ देशांमध्ये झालंय शाहरुखच्या 'पठाण'चं शूटिंग!

News Reels


रिपोर्टनुसार, मिर्झापूर-3 ही सीरिज पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे. या सीरिजच्या रिलीज डेटची अजून घोषणा करण्यात आलेली नाही. मिर्झापूर या वेब सीरिजच्या तिसऱ्या सिझनमध्ये आधीच्या दोन सिझनमधील कलाकार काम करणार आहेत की नाही? या प्रश्नाचं उत्तर देखील लवकरच प्रेक्षकांना मिळेल. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …