‘वाळवी’चा ट्रेलर क्षणोक्षणी कुतूहल वाढवणारा

Vaalvi Trailer Out : ‘वाळवी’ हा शब्द ऐकताच आपल्याला आठवते ती, लाकूड पोखरणारी किड. एवढं नुकसान करणारी हीच वाळवी जर एखाद्या नात्याला लागली तर? अशीच नात्याला लागलेली वाळवी आपल्याला परेश मोकाशी दिग्दर्शित ‘वाळवी’ (Vaalvi) या सिनेमात  पाहायला मिळणार आहे. यापूर्वीच या सिनेमाचा जबरदस्त टिझर अगदी अनोख्या पद्धतीनं प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. त्यामुळे या सिनेमात नक्की काय पाहायला मिळणार याविषयी प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. त्यात आता ‘वाळवी’चा थरारक ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

ट्रेलरमध्ये स्वप्नील जोशी, सुबोध भावे, अनिता दाते, शिवानी सुर्वे एका वेगळ्याच अंदाजात दिसत असून त्यांच्या व्यक्तिरेखा सिनेमाबद्दलची उत्कंठा अधिकच वाढवणाऱ्या आहेत. ‘वाळवी’ हा मराठीतील पहिला थ्रिलकॅाम सिनेमा आहे.

ट्रेलरमध्ये स्वप्नील जोशी आणि अनिता दाते नवरा बायको दिसत असून ते आत्महत्या करण्याचा निर्णय घेत आहेत. मात्र हा स्वप्नीलने आखलेला डाव असून यात त्याला शिवानी मदत करत असल्याचे दिसत आहे. हे सगळं होत असतानाच सुबोध त्यांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय. क्षणोक्षणी कुतूहल वाढवणारा आणि  गूढ असणाऱ्या ‘वाळवी’त स्वप्नील आणि शिवानीचा मनसुबा पूर्ण होणार की, आखलेला डाव फिरणार? सुबोधकडे असे नक्की काय गुपित आहे? वाळवीचा या सगळ्याशी काय संबंध? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना 13 जानेवारीला सिनेमागृहात मिळणार आहेत. 


वाळवी सिनेमासंदर्भात या सिनेमाचा दिग्दर्शक परेश मोकाशी म्हणाला,”प्रेक्षकांना काहीतरी नवीन विषय देण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो आणि यात मला झी स्टुडिओजची नेहमीच साथ लाभते. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव हा नेहमीच अप्रतिम असतो. त्यामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत”. 

हेही वाचा :  साबणाचा शोध लागला नव्हता, तेव्हा कपडे धुण्यासाठी वापरली जायची 'ही' खास पद्धत

परेश मोकाशी पुढे म्हणाला,”वाळवी’ हा एक वेगळा विषय आहे. शेवटपर्यंत खुर्चीला खिळवून ठेवणारा हा सिनेमा आहे. अनेक तर्कवितर्क लावत असतानाच सिनेमातील गूढ अतिशय अनपेक्षितपणे उलगडणार आहे. कलाकारांनी आपल्या भूमिका उत्तम वठवल्या आहेत”. 

स्वप्नील जोशीने ‘वाळवी’चा ट्रेलर शेअर करत लिहिलं आहे,”विषय काय आहे तो यांना माहिती आहे… आणि तुम्हाला? वाळवीची झलक आली आहे तुमच्या भेटीला… ‘वाळवी’ 13 जानेवारी 2023 पासून सर्वत्र प्रदर्शित”. 

संबंधित बातम्या

Vaalvi Teaser: ‘दिसतं तसं नसतं’; 13 जानेवारीला प्रदर्शित होणार ‘वाळवी’ , टीझर पाहिलात?



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …