धक्कादायक! मराठी शाळांची पटसंख्या आली निम्म्यावर

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

मुंबई महापालिकेच्या मराठी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या गेल्या १० वर्षांत ५० टक्क्यांनी घटली आहे. पालिकेच्या शाळेत २०१२-१३ मध्ये १ लाख ३ हजार विद्यार्थी शिकत होते. ही संख्या घटून २०२१-२२ मध्ये ५१,६९१ पर्यंत खाली आली आहे. मराठीपाठोपाठ पालिकेच्या हिंदी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थी संख्या ४४ टक्क्यांनी, उर्दू माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थी संख्या ३० टक्क्यांनी घटली आहे. त्याचवेळी पालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मात्र ७७ टक्क्यांनी वाढली आहे. प्रजा फाऊंडेशनने सोमवारी प्रकाशित केलेल्या अहवालातून वास्तव समोर आले आहे.

२०१२-१३ मध्ये पालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत ५७,२३५ विद्यार्थी शिकत होते. २०२१-२२ मध्ये ही संख्या १ लाख १ हजारांवर पोहोचल्याचे अहवालातून दिसत आहे. परिणामी पालकांचा कल इंग्रजी माध्यमाकडे असून मराठी माध्यमांच्या शाळेकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. त्यातच गेल्या काही वर्षांत पालिकेच्या शाळेत विद्यार्थीसंख्या घटत आहे. २०१२-१३ मध्ये पालिकेच्या वेगवेगळ्या माध्यमाच्या शाळेत ४ लाख ३४ हजार विद्यार्थी शिकत होते. ही संख्या घटून २०१९-२० मध्ये २ लाख ९८ हजारांवर पोहोचली. २०१९-२० मध्ये मराठी माध्यमाच्या शाळेत ५३,७३० विद्यार्थी शिकत होते. करोनानंतर पालिकेच्या शाळेतील विद्यार्थी संख्या वाढून ३ लाख १८ हजारांपर्यंत पोहोचली असली तरी मराठी माध्यमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मात्र ५१ हजारांवर रोडावल्याचे चित्र आहे.

हेही वाचा :  FSSAI मध्ये विविध पदांची भरती, परीक्षेची उत्तरतालिका जाहीर

४१ मुलांमागे एक शिक्षक

मुंबई पालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या १६९ शाळा आहेत. त्यात १ लाख १ हजार विद्यार्थी शिकत असून २,४५२ शिक्षक कार्यरत आहेत. परिणामी सद्यस्थितीत या शाळांमध्ये दर ४१ विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असल्याचे चित्र आहे. त्याचवेळी मराठी माध्यमाच्या ३६० शाळा असून त्यामध्ये १,९८५ शिक्षक कार्यरत आहेत. त्यातून मराठी माध्यमाच्या शाळेत २६ विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असल्याचे चित्र आहे. मुंबई पालिकेकडून कन्नड भाषिक २९ शाळा चालविल्या जात असून त्यामध्ये एकूण ९३ शिक्षक कार्यरत आहेत. तर या शाळांमध्ये १,३१९ विद्यार्थी शिकत आहे. कन्नड माध्यमाच्या शाळेत १४ विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक आहे.

पालिका शाळांतील विद्यार्थी संख्या वर्षनिहाय

२०१२-१३ २०१८-१९ २०१९-२० २०२०-२१ २०२१-२२

मराठी १,०३,०४८ ५०,६७७ ५३,७३० ५०,८९७ ५१,६९१

हिंदी १,३७,३१५ ८१,४३१ ७६,८६१ ६८,१४९ ७६,९९०

इंग्रजी ५७,२३५ ७९,८८४ ८३,०७६ ८५,४७४ १,०१,११०

उर्दू १,१४,५२१ ७९,३४४ ७६,३५४ ७१,८२१ ८०,६११

गुजराथी ७,०३७ २,५१२ २,६४२ २,३९६ २,४४५

एकूण ४,३४,५२३ ३,००,७४६ २,९८,२१५ २,८३,७१९ ३,१८,००२

राज्यातील १९ लाख विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड नाही, शिक्षण विभागाच्या मोहिमेतून माहिती समोर
पालिकेतील विद्यार्थीस्थिती

(सर्व माध्यमांची एकूण)

२०१२-१३ : ४ लाख ३४ हजार

हेही वाचा :  Postman Recruitment: टपाल विभागात पोस्टमनची पदे रिक्त

२०१९-२० : २ लाख ९८ हजार

करोनानंतरचा काळ : ३ लाख १८ हजार

आधारकार्डमधील चुका सुधारण्याचे काम शिक्षकांवर, विद्यार्थ्यांना शिकवणार कधी?

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …