मला वाचवा! माझी पत्नी माझे सर्व पैसे खर्च करतेय, ही बाई मला कंगाल करूनच सोडेल

प्रश्न: माझ्या पत्नीने तिची नोकरी सोडली आहे आणि तिने काम करून किंवा घरासाठी आर्थीक मदत करून 2 वर्षे झाली आहेत. माझ्या डोक्यावर सर्व आर्थिक जबाबदाऱ्या आहेत आणि ते दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे, शिवाय माझी पत्नी नको असणाऱ्या गोष्टींवर नको तेवढा खर्च करते तिच्या या सवयीमुळे एक दिवशी मी दिवाळखोर होईल. मला खरंच कळत नाही आहे मी काय करू. (फोटो सौजन्य :- istock)

तज्ज्ञांचे मत

तज्ज्ञांचे मत

या प्रश्नावर तज्ज्ञ शिवानी मिसरी साधू सांगतात की पती-पत्नींमध्ये, विशेषत: जेव्हा आर्थिक नियोजनाचा प्रश्न येतो तेव्हा आर्थिक हा अनेकदा अडथळा आणि चर्चेचा विषय असू शकतो. ही परिस्थिती खूप सामान्य आहे. जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमची पत्नी जास्त पैसे खर्च करत असेल, तर हीच वेळ आहे तुमच्यासाठी स्पष्ट आर्थिक चर्चा करण्याची, तुमच्या पत्नीसोबत आणि एकमेकांच्या बचत आणि खर्च करण्याच्या सवयींबाबत एकमेकांच्या आवडीनिवडी आणि समस्या समजून घेण्यासाठी.

(वाचा:- प्रत्येक यशस्वी स्त्री च्या मागे एक समजूदार पुरुष असतो, सुधा मूर्तींनी सांगितेल नात्याच्या यशाच गमक) ​

हेही वाचा :  Paytm, GPay, Bhim App वापरताय? मग चुकूनही या गोष्टी करु नका, नाहीतर व्हाल कंगाल

तुमचे खर्च वेगळे करा

तुमचे खर्च वेगळे करा

तुम्ही तुमचे आणि तुमच्या पत्नीचे खर्च वेगळे करा. त्यांना व्यवसाय किंवा नोकरी करण्यासाठी प्रेरित करा. त्यांचा खर्च त्यांना करू द्या यामुळे त्यांना पैशाची खरी किंमत कळेल. तुम्ही त्यांना पैसा उपलब्ध करून दिलात तर त्या खर्चच करत राहतील.

चर्चा करा

चर्चा करा

नातं टिकवण्याचा सर्वांत चांगला पर्यांय म्हणजे जोडीदारसोबत संवाद साधणे. तुमच्या पत्नीसोबतच्या आर्थिक समस्यांबाबत चर्चा करा. तुम्हाला कोणत्याही अतिरिक्त सहाय्याची आवश्यकता असल्यास, तुम्ही व्यावसायिक मदत घेण्याचा विचार करू शकता. एवढं करून देखील त्यांना गोष्टी समजत नसतील तर एका तज्ज्ञांची मदत घ्या.

घरच्या व्यक्तींची मदत घ्या

घरच्या व्यक्तींची मदत घ्या

या संदर्भात तुम्ही घरच्या व्यक्तीची सुद्धा मदत घेऊ शकता. गोष्टी छोट्या वेळेत सुधारणे गरजेचे असते. त्यामुळे या संदर्भात तुम्ही घरातील वडिलधाऱ्या व्यक्तींची मदत घेऊ शकता.

(वाचा :- या देशातील मुलीं म्हणतात लग्न नकोच, कारण वाचून पायाखालची जमीन सरकेल) ​

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Akola News : मुलांची काळजी घ्या! कुलरचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

जयेश जगड, झी मीडिया, अकोला (Akola News in Marathi) : विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढतोय. अशात …

कोकण रेल्वेचा मोठा निर्णय; वाढत्या गर्दीमुळं ‘या’ स्थानकांदरम्यान धावणार विशेष रेल्वे; तातडीनं पाहा वेळापत्रक

Konkan Railway News : मे महिन्याची सुट्टी, शिमगा आणि गणेशोत्सव यादरम्यान कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या …