माझी कहाणी : माझा नवराच मुलाच्या जीवावर उठलाय, मला त्याची खूप भीती वाटते मी काय करु ?​

मी एक विवाहित स्त्री आहे. पण मी माझ्या पतीसोबत अजिबात खुश नाही. त्याचे कारण खूपच विचित्र आहे. माझ्या नवऱ्याला डॉक्टरांनी `बायपोलर डिसॉर्डर’ म्हणून घोषित केले. हा एक प्रकारचा मोठा मानसिक आजार आहे. ही गंभीर गोष्टी माझ्या सासरच्या लोकांनी माझ्याकडून लपवून ठेवली. बायपोलर डिसॉर्डर हा एक गंभीर मानसिक रोग आहे. या रोगाने पीडित असलेल्या व्यक्तीला स्वतःच्या मनावर ताबा ठेवताना त्रास होतो. या आजारात रोगी व्यक्तीला मूडवर नियंत्रण राखत येत नसते. सतत मूड स्विंग्स (Mood Swing) होतात. रुग्ण व्यक्ती काही वेळ खूप आनंदी असते, पुढे काही मिनिटांमध्येच ती व्यक्ती रडताना दिसतो. सोप्या शब्दांमध्ये सांगायचे झाल्यास या स्थितीमध्ये रोगी व्यक्तीच्या मनातील भावना वेगाने बदलत असतात. (फोटो सौजन्य : टाइम्स ऑफ इंडिया)

प्रश्न

मी एक ३३ वर्षांची विवाहित महिला आहे. माझे पती 40 वर्षांचे आहेत. मी माझ्या पतीसोबत अरेंज मॅरेज केले होते. माझे लग्न होऊन बरेच दिवस झाले नाहीत. पण लग्नाआधी आम्हाला फार काळ एकत्र वेळ मिळाला नव्हाता. आम्ही फक्त 7 महिने एकमेकांना ओळखत होतो. आम्हा दोघांना एकमेकांबद्दल फारशी माहिती नव्हती. मात्र, माझ्या वैवाहिक जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या नाही. पण माझी अडचण अशी आहे की माझ्या पतीला खूप राग येतो. कधी कधी आमच्या लग्नात काय चाललंय असा प्रश्न मला अनेकदा पडायचा. मला वाटायचे की आमचे लग्न उशीरा झाले त्यामुळे 40 वर्षे अविवाहित राहिल्याने त्यांना असे वाटत असेल. पण काही काळ असेच चालू राहिल्याने आम्ही डॉक्टरकडे गेलो. त्यांनंतर डॉक्टरांनी त्यांना बायपोलर घोषित केले.हा एक प्रकारचा मोठा मानसिक आजार आहे. ही गंभीर गोष्टी माझ्या सासरच्या लोकांनी माझ्याकडून लपवून ठेवली. या गोष्टीचं मला नवल वाटलं. (वाचा :- माझी कहाणी : लग्नाच्या 5 वर्षांनंतर मी पुन्हा माझ्या EX ला भेटले, त्यानंतर जे झालं ते सांगायला ही मला लाज वाटते)

हेही वाचा :  नवर्‍याची फसवणूक करण्याआधी सत्य कळले असते तर माझी इतकी वाईट स्थिती झाली नसती

​तज्ञांचे उत्तर

या समस्येवर एआयआर इन्स्टिट्यूट ऑफ रिलायझेशन आणि एआयआर सेंटर ऑफ एनलाइटनमेंटचे संस्थापक रवी म्हणतात की तुम्ही विवाहित नातेसंबंधात आहात जिथे तुमच्या पतीने त्याची मानसिक स्थिती लपवून तुमची फसवणूक केली आहे. या प्रकरणात तुझी सासू, सासरे यांचाही सहभाग आहे. तुम्ही सांगितल्या प्रमाणे, तुम्ही गरोदर असताना तुम्हाल या गोष्टीची माहिती मिळाली. अशा परिस्थितीत, मी तुम्हाला म्हणेन की या परिस्थितीतून घटस्फोट हा एकमेव मार्ग आहे. पण घटस्फोट हा तुमच्या मुलासाठी सोपा उपाय नाही. (वाचा :- त्या रात्री रडून मला श्वास घेणं ही कठीण झालं होतं, दुसऱ्या मुलीसाठी त्याने मला सोडलं, जे झालं ते ऐकून हादरुन जाल)

​तुमच्या पतीशी मोकळेपणाने बोला

तुम्ही म्हटल्याप्रमाणे तुमचे मूल फक्त २.५ वर्षांचे आहे. अशा परिस्थितीत मी म्हणेन की या नात्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही तुमच्या पतीशी तुमच्या समस्यांबद्दल बोलू शकता. त्यांच्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या मुलाला काय त्रास होत आहे ते तुम्ही त्यांना सांगू शकता. एवढेच नाही तर एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलल्यानंतरच तुम्ही दोघांना योग्य तोडगा काढता येईल. या समस्येवर काय करता येईल याचा विचार करणे गरजेच आहे. (वाचा :- डेटिंग अ‍ॅपवर प्रेम आणि मग क्रुर हत्या आफताब हा काही पहिला क्रूरकर्मा नाही, या काही कहाण्या थरकाप उडवतील)

हेही वाचा :  महिलांनी स्तनांची काळजी घेणे आवश्यक, स्तनाच्या कर्करोगासाठी सोनोमॅमोग्राफीचा देण्यात येतोय सल्ला, घ्या अधिक जाणून

​आपल्या पतीला समर्थन द्या

माझ्या मते तुमच्या पतीला ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. आज काल समाजात मानसिक आजारांना खूप गंभीरतेने घेतले जात नाही. एवढेच नाही तर बहुतांश वेळा या आजाराकडे दुर्लक्ष केले जाते. अशा परिस्थितीत मी तुम्हाला तुमच्या पतीला संयमाने साथ देण्याचा सल्ला देईन. त्यांना आरोग्य तज्ञाची मदत घेण्यास सांगा. त्यांना एकटे सोडणे घातक ठरू शकते. (वाचा :- “आयुष्याच्या या वळणावर जोडीदार असावा असं वाटतं,” रतन टाटांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘माझ्याकडे चीप..ईव्हीएम हॅक करतो’ दीड कोटींचा सौदा; धक्कादायक कहाणी

EVM Machine Hack call: देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे.  ईव्हीएम मशिनच्या माध्यमातून हे मतदान …

पत्नीचं हॉस्पिटलचं बिल पाहून पतीचं धक्कादायक कृत्य, थेट ICU मध्ये गेला अन्…

पतीने रुग्णालयातच पत्नीची गळा दाबून निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेत हा …