Viral Video: आता काय तर पाणीपुरी आईस्क्रीम! नेटीझन्सनी लावला डोक्याला हात, म्हणाले…

Pani Puri With Ice Cream: गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर विचित्र फूड कॉम्बिनेशनशी संबंधित व्हिडिओ समोर येत आहे. रस्त्यावरील विक्रेते एखाद्या चांगल्या खाद्यपदार्थांवर असे काही प्रयोग करत आहेत जणू काही देशात लज्जतदार पाककृती तयार करण्याची स्पर्धा सुरू आहे. कधी वडा पाव आईस्क्रीम रोलचा (Ice Cream Rules) व्हिडिओ, तर कधी मॅगीसोबत पाणीपुरी… यामुळे लोकांचे डोके चक्रावले आहे. 

अशाचप्रकारचा एक व्हिडीओ व्हायरल (Video Viral) होत आहे. व्हायरल व्हिडीओ हा पाणीपुरीचा असून व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण हादरून गेला आहे. एका माणसाने पाणीपुरी विथ आईस्क्रीमचा  (Panipuri Icecream) शोध लावला आहे. हे पाहून लोक उलट्या होत असल्याचे म्हणत आहेत. व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओमध्ये (Video) तुम्ही पाहू शकता, की एक विक्रेता गोलगप्पा विथ आईस्क्रीम म्हणजेच पाणीपुरी आईस्क्रीम बनवताना दिसत आहे. ही व्यक्ती आधी व्हॅनिला फ्लेवर्ड आईस्क्रीमने पाणीपुरी (Pani Puri With Ice Cream) भरू लागतो. एक एक करून तो गोलगप्पामध्ये आइस्क्रीम भरू लागतो. 

चव वाढवण्यासाठी तीन प्रकारच्या चवीचे पाणी त्या पुऱ्यामध्ये टाकत असतो. शेवटी, तो पाणीपुरी सर्व्ह करण्यापूर्वी गोड आणि चवदार गार्निशचे मिश्रण जोडतो. क्लिपमध्ये तुम्ही पाहू शकता की गोलगप्पाचे पाणी तयार करण्यासाठी बर्फाचा वापर केला जात होता आणि नंतर ते पाणी पुरीत ओतून खायला दिले जात होते. 

हेही वाचा :  'लोक समजून घेतील तुम्ही इकडे या'; उद्धव ठाकरेंना शिंदे गटाकडून ऑफर

वाचा: ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! दोन पराभवानंतर कर्णधार कमिन्स मायदेशी परत 

ही अजब रेसिपी पाहून तुम्हालाही क्षणभर काय करावे, ते कळणार नाही. या विचित्र पाणीपुरीचा व्हिडिओ Facebook या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर Mi Nashikar नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये, एक स्ट्रीट विक्रेता लोकप्रिय स्ट्रीट फूडसह डिश तयार करताना दिसत आहे. 

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक विक्रेत्यावर आपला राग काढत आहेत. एका यूझरने कमेंट करताना लिहिले आहे, की उलटी होण्यासाठी पिशवी द्याल नाहीतर आम्हाला सोबत आणावी लागेल. त्याचवेळी दुसरा यूझर म्हणतो, की हे पाहिल्यानंतर मला उलट्या झाल्या. त्याचप्रमाणे आणखी एका यूझरने कमेंट करताना लिहिले आहे, की विक्रेते काहीही करत आहेत, अशाना हाकलून द्या.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

लहानपणी शाळेत खाल्लेला रट्टा लागला जिव्हारी, अभिनेत्याने शाळा विकत घेत फिरवला बुलडोझर

Trending news in Marathi : आई वडील असो किंवा शिक्षक मुलांना चांगली सवय आणि शिस्त …

‘मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी…’; ‘पवारांना कुटुंब संभाळता आलं नाही’वर पवार स्पष्टच बोलले

Sharad Pawar On PM Modi Comment About His Family: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीचे संस्थाप शरद पवारांवर …