SSC Exam 2022: ‘ती’ मुलगी देणार रुग्णालयातून परीक्षा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘एकतर्फी प्रेमातून हल्ला झालेली अल्पवयीन मुलगी रुग्णालयात उपचार घेत असून, तिला तेथूनच दहावीची परीक्षा देता यावी; तिला लेखनिक सुविधा मिळावी, यासाठी प्रयत्न करणार आहे,’ अशी माहिती राज्‍य महिला आयोगाच्‍या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी मंगळवारी दिली.

वडगावशेरी येथे एका शाळेत घुसून अल्‍पवयीन मुलीवर वर्गातच वार केल्‍याचा धक्‍कादायक प्रकार सोमवारी घडला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर चाकणकर यांनी मंगळवारी पीडित मुलीची रुग्णालयात भेट घेतली. मुलीची प्रकृती व्यवस्‍थित असून, संबंधित आरोपीवर गंभीर स्वरूपाच्‍या कलमांसह गुन्‍हा दाखल केला असल्‍याचे चाकणकर यांनी सांगितले. आरोपीने हल्ल्यानंतर विष प्राषण करून आत्‍महत्येचा प्रयत्‍न केला होता. त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहितीही त्यांनी दिली.

चाकणकर म्‍हणाल्‍या, ‘पीडित मुलगी दहावीला असून, मंगळवारपासून परीक्षा सुरू झालू आहे. तिची प्रकृती चांगली आहे. त्यामुळे तिला रुग्णालयातूनच परीक्षा कशी देता येईल, याची व्यवस्‍था आम्‍ही करणार आहोत. त्‍यासाठी तिला लेखनिकाची व्यवस्‍था करून देण्यात येणार आहे.’

शाळेवरही कारवाई इशारा…

पीडित मुलीच्‍या पालकांनी शाळेविरोधात तक्रार नोंदवली आहे. मुलीवर हल्‍ला होऊनही शाळेच्‍या मुख्याध्यापकांनी, शिक्षकांनी तिला रुग्णालयात हलवले नाही. सुमारे वीस मिनिटे ती मुलगी तेथेच होती. शाळा प्रशासनाने कोणतीही हालचाल केली नाही. त्‍यामुळे शाळेवर कारवाई करणार असल्याचे रूपाली चाकणकर यांनी सांगितले.

हेही वाचा :  Bank Job 2022: महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत भरती

पोलिसांकडून कुचिक प्रकरणाचा तपास सुरू

शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांच्‍यावर गुन्‍हा दाखल असून, गुन्‍ह्याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. यावर बोलताना ‘संबंधित मुलीशी संपर्क साधण्याचा प्रयत्‍न केला असता मुलीचे दोन्‍हीही संपर्क क्रमांक बंद होते. मी स्वतःहून मुलीची भेट घेणार आहे,’ असे चाकणकर म्‍हणाल्‍या.

बारावी केमिस्ट्री पेपर लीकप्रकरणी कारवाईला सुरुवात, जाणून घ्या अपडेट

पुण्यात शाळेतच दहावीच्या विद्यार्थिनीवर तरुणाने केला हल्ला; शहरात खळबळ
ICAI कडून CA फाउंडेशन परीक्षेच्या तारखांमध्ये बदल

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …