Bank Job 2022: महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत भरती

Bank Job 2022: महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेमध्ये (Maharashtra State Cooperative Bank) विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेमधील भरतीअंतर्गत सहायक व्यवस्थापक (Assistant Manager),अधिकारी श्रेणी II (Officer Grade II), कनिष्ठ अधिकारी (Junior Officer) या पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.

पदभरतीचा तपशील
असिस्टंट मॅनेजर पदासाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त संस्थेतून बीई/बीटेक इन सीएस/आयटी किंवा एमसीए/एमएससीपर्यंत शिक्षण उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासाठी उमेदवाराकडे संबंधित कामाचा किमान अनुभव असावा. यासाठी उमेदवाराचे वय ३५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

ऑफिसर ग्रेड पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांकडे मान्यताप्राप्त संस्थेतून बीई/बीटेक इन सीएस/आयटी किंवा एमसीए/एमएससीपर्यंत शिक्षण उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासाठी उमेदवाराकडे संबंधित कामाचा किमान अनुभव असावा.यासाठी उमेदवाराचे वय ३३ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

ज्युनिअर ऑफिसर या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त संस्थेतून बीई/बीटेक इन सीएस/आयटी किंवा एमसीए/एमएससीपर्यंत शिक्षण उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवारास संबंधित कामाचा किमान अनुभव असावा. तसेच उमेदवाराचे वय ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे.

हेही वाचा :  केंद्रीय गुप्तचर विभाग अंतर्गत विविध पदांची भरती

MMRDA Recruitment 2022: एमएमआरडीएत विविध पदांवर भरती

भारतीय नौदलात १५०० हून अधिक पदांची भरती, जाणून घ्या तपशील
अर्ज प्रक्रिया
पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.

MSC Bank Recruitment 2022: पदभरतीचा तपशील जाणून घेण्यासाठी क्लिक करा
या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे.

पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आपले अर्ज १ मार्चपर्यंत पाठवायचे आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा
CISF मध्ये बारावी पास असणाऱ्यांना संधी, ६९ हजारपर्यंत मिळेल पगार
IAF Recruitment 2022: इंडियन एअर फोर्समध्ये विविध पदांची भरती

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …