CBI भरती २०२२ अंतर्गत केवळ बँकेतून निवृत्त झालेले उमेदवार ५३५ पदांसाठी अर्ज करू शकतील. तसेच, ज्या पदावरून ते निवृत्त झाले त्याच पदांसाठी उमेदवार अर्ज करू शकतात. पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांचे वय ६३ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
निवड प्रक्रिया
सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. उमेदवारांकडून प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी केल्यानंतर बँकेकडून मुलाखतीसाठी बोलावले जाईल. विहित प्रक्रियेद्वारे निवडलेल्या उमेदवारांची एक वर्षासाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती केली जाईल. तसेच उमेदवारांच्या कामगिरीनुसार वयोमर्यादा जास्तीत जास्त ६५ वर्षांपर्यंत वाढवली जाऊ शकते.
अर्ज प्रक्रिया आणि शुल्क
सीबीआयच्या अधिकृत वेबसाईट, centralbankofindia.co.in वरील भरती विभागात दिलेल्या लिंकद्वारे उमेदवार पदभरतीचे नोटिफिकेशन डाउनलोड करू शकतात. अर्जाचा नमुना भरती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. उमेदवारांना अंतिम मुदतीपर्यंत नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या पत्त्यावर पॅन कार्ड, आधार कार्ड आणि रिलीव्हिंग लेटरच्या प्रती जोडून पूर्णपणे भरून हा फॉर्म सबमिट करावा लागणार आहे. उमेदवारांना ‘सेंट्रल बँक ऑफ इंडिया’च्या नावे काढलेला ५९० रुपयांचा डिमांड ड्राफ्ट देखील जोडावा लागेल
पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवार बँकेने जारी केलेल्या अर्जाद्वारे या पदांसाठी अर्ज करू शकतात. २८ फेब्रुवारी २०२२ ही सीबीआय भरती २०२२ साठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.
पदभरतीचा तपशील पाहण्यासाठी येथे क्लिक करा