करिअर

दहावीच्या परीक्षेची तयारी पूर्ण; ‘असे’ असेल प्रश्नांचे स्वरूप

म. टा. प्रतिनिधी, पुणेगेल्या वर्षी करोनाच्या प्रादुर्भावामुळे पडलेल्या खंडानंतर यंदा दहावीची परीक्षा पुन्हा होऊ घातली आहे. मंगळवारपासून (१५ मार्च) या परीक्षांना सुरुवात होणार असून, त्यासाठीची सर्व तयारी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून पूर्ण झाली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी अडचणी येऊ नयेत, म्हणून ‘शाळा तेथे केंद्र’ अशी योजनाही आखली आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा पहिला टप्पा म्हणून गणल्या जाणाऱ्या या …

Read More »

वैद्यकीय शिक्षण देशातच पूर्ण करू द्या; युक्रेनहून परतलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुप्रीम कोर्टात याचिका

युक्रेनमधून परतलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना देशातच वैद्यकीय शिक्षण घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करणारी एक जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना भारतात वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश देऊन त्यांना ते शिक्षण येथेच पूर्ण करण्याची मुभा मिळावी यासाठी न्यायालयाने केंद्र सरकारला निर्देश द्यावेत, अशी विनंती या याचिकेत करण्यात आली आहे. अॅडव्होकेट राणा संदीप बुस्सा यांच्यासह काही जणांनी ही याचिका केली …

Read More »

ISRO कडून ‘यंग सायन्स प्रोग्राम’ सुरु, नोंदणी प्रक्रिया जाणून घ्या

ISRO Young Scientist Programme 2022: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘यंग सायन्स प्रोग्राम’ (Young Scientist Programme 2022) हा विशेष अभ्यासक्रम सुरू केला आहे. यासाठी इस्त्रोकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. याची अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून इयत्ता नववीचे विद्यार्थी या विशेष कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. अर्ज करू इच्छिणारे सर्व विद्यार्थी अधिकृत वेबसाइट isro.gov.in वर प्रोग्रामसाठी अर्ज …

Read More »

ऑनलाइन शैक्षणिक अॅप बंद करा; इंग्रजी शाळा संघटना मेस्टाचे सरकारला साकडे

शासनाची कुठलीही परवानगी न घेता शालेय शैक्षणिक धोरणाची पायमल्ली करत शिक्षणाचा बाजार मांडणा-या बायज्यूज् सारखे सर्व ऑनलाइन अॅप (educational app) बंद करा, अशी मागणी महाराष्ट्र इंग्रजी शाळा संस्थाचालक संघटना मेस्टाने (MESTA) केली आहे. राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना मेस्टाने पत्र लिहून ही मागणी केली आहे.या पत्रात असे म्हटले आहे की, ‘करोना काळात बायज्यूज, व्हाईट हॅट ज्युनिअर व आकाश …

Read More »

CBSE ने वेळापत्रक जाहीर केल्यानंतर महाराष्ट्र बोर्डाच्या विद्यार्थ्यांकडून नाराजी व्यक्त, हे आहे कारण

SSC HSC Exam 2022: सीबीएसई बोर्डातर्फे नुकतेच टर्म २ परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. दरम्यान महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी, बारावीच्या (Maharashtra SSC, HSC Exam 2022) काही विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Education Minister, Varsha Gaikwad) यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. सीबीएसई बोर्डाने (CBSE Board) जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, दोन पेपरमध्ये अभ्यास करण्यासाठी बराच कालावधी दिला आहे. याऊलट महाराष्ट्र बोर्डाकडून दोन विषयांमध्ये जास्त अंतर नसल्याने …

Read More »

फीबाबत केली विचारणा; पालकांना शाळेच्या महिला बाऊन्सरकडून मारहाण

पुणे: बिबवेवाडीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. फी बाबत विचारणा केली असता पालकांना बिबवेवाडी परिसरातील क्लाईन मेमोरियल शाळेत (kline memorial school pune) महिला बाऊन्सरकडून मारहाण करण्यात आली आहे. पालक मंगेश गायकवाड यांनी या प्रकाराची शाळेविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.मुलांच्या शाळेची फी भरण्यासाठी मुख्याध्यापकांकडून आलेल्या पत्राबाबत म्हणणे मांडण्यासाठी सगळे पालक शाळेत गेले होते. त्यावेळी मुख्याध्यापकांना भेटण्याची मागणी करणाऱ्या पालकांना महिला …

Read More »

NVS Admission 2022: नवोदय विद्यालय समितीकडून नववीसाठी प्रवेशपत्र जाहीर

NVS Admission 2022: नवोदय विद्यालय समिती (Navodaya Vidyalaya Samiti, NVS)ने इयत्ता नववीसाठी प्रवेशपत्र जाहीर केले आहे. एनव्हीएसने इयत्ता नववीसाठी जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी, (Jawahar Navodaya Vidyalaya Selection Test, JNVST 2022) प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइट navodaya.gov.in वर जाहीर केले आहे. या परीक्षेला बसलेले सर्व विद्यार्थी त्यांचे JNVST २०२२ प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइट- navodaya.gov.in वरून तपासू आणि डाउनलोड करू शकतात. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी, …

Read More »

PhD not mandatory: सेंट्रल युनिव्हर्सिटीत शिकवण्यासाठी आता PhD अनिवार्य नाही

केंद्रीय विद्यापीठांमध्ये (Central Universities) अध्यापक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या शिक्षकांसाठी एक चांगली बातमी आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय विद्यापीठांमध्ये शिकवण्यासठी आता पीएचडी अनिवार्य नाही. पीएचडी अनिवार्यतेचा निकष रद्द करण्यात आला आहे. आयोगाच्या निर्णयानंतर, ज्यांना शिक्षण क्षेत्रातील दांडगा अनुभव आहे, पण केवळ डिग्री नसल्याने विद्यापीठांमध्ये त्यांना शिकवता येत नव्हते, त्यांना ती संधी चालून आली आहे. यापुढे सर्व …

Read More »

PCMC Recruitment 2022: पिंपरी चिंचवड पालिकेत महिलांना नोकरीची संधी

PCMC Recruitment 2022: नोकरीच्या शोधात असलेल्या महिलांसाठी महत्वाची बातमी आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये (Pimpri Chinchwad Municipal Corporation) आरोग्य सेविका (PCMC Recruitment 2022) पदांची भरती होणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. पिपंरी चिंचवड पालिकेच्या कॉर्पोरेशन हेल्थ अॅण्ड फॅमिली वेल्फेअर सोसायटी अंतर्गत राष्ट्रीय …

Read More »

CMAT प्रवेश परीक्षेचे प्रवेशपत्र कधी? जाणून घ्या अपडेट

CMAT Entrance Exam Date 2022: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency, NTA) ने सीएमएटी CMAT (CMAT 2022) परीक्षेच्या तारखा जाहीर केल आहेत. परीक्षेसाठी नोंदणी केलेले उमेदवार एनटीएच्या अधिकृत वेबसाइट cmat.nta.nic.in वर सविस्तर अपडेट पाहू शकतात.CMAT परीक्षा ९ एप्रिल रोजी दुपारी ३ ते ६ या वेळेत घेतली जाणार आहे. एनटीएने गेल्या वर्षी CMAT २०२२ ची परीक्षा एकाच शिफ्टमध्ये घेतली होती. CMAT …

Read More »

राज्यात तीन लाख नव्या रोजगारसंधी; कुठे आहेत हे रोजगार… जाणून घ्या

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईराज्यात करोनामुळे उद्योग क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. त्यातून मार्ग काढत राज्यातील उद्योगांना चालना देण्यासाठी ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र २’वर विशेष लक्ष देण्यात आले आहे. यासाठी राज्यातील उद्योग घटकांसमवेत ९८ गुंतवणूक करार करण्यात आले. राज्यात त्यातून १ लाख ८९ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून रोजगाराच्या ३ लाख ३० हजार नवीन संधी (job opprtunities) निर्माण होतील, असा अंदाज …

Read More »

CBSE दहावी टर्म १ चा निकाल जाहीर, येथे पाहा अपडेट

CBSE 10th Result 2021: सीबीएसई इयत्ता दहावी टर्म १ परीक्षा २०२१ चा निकाल जाहीर झाला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) संबंधित शाळांना दहावी टर्म १ च्या मार्कशीट पाठविण्यात आल्या आहेत. सीबीएसई बोर्डाने शाळांना ईमेलकरुन यासंदर्भातील माहिती दिली. दहावीच्या शाळा कोडच्या सत्र २०२१-२२ च्या सत्र १ परीक्षेच्या निकालासंदर्भात यात सूचना करण्यात आली आहे. असे असले तरीही सीबीएसई इयत्ता दहावी निकाल …

Read More »

शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेत राज्यपालांच्या निषेधाचा ठराव

कोल्हापूर:छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी राज्यपाल भगत भगतसिंह कोशायरी यांनी चुकीचे वक्तव्य केल्याबद्दल शिवाजी विद्यापीठाच्याच्या अधिसभेत स्थगन प्रस्ताव मांडण्यात आला. राज्यपालांचा यावेळी निषेध करण्यात आला. महात्मा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज व सावित्रीबाई फुले यांचा चुकीचा इतिहास महाराष्ट्राला सातत्याने सांगण्याचं काम राज्यपाल कोश्यारी करतात. ही महाराष्ट्राच्या इतिहासातील दुर्दैवी बाब आहे असं मत प्रा. मधुकर पाटील यांनी व्यक्त केले. मराठी भाषा दिनी …

Read More »

FSSAI मध्ये विविध पदांच्या भरती परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर

FSSAI admit cards 2022: FSSAI ने विविध भरती परीक्षांसाठी प्रवेशपत्रे जाहीर केली आहेत. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (Food Safety and Standards Authority of India,FSSAI) ने आयटी सहाय्यक, हिंदी अनुवादक, ज्युनिअर असिस्टंट ग्रेड-1, अन्न विश्लेषक, केंद्रीय अन्न सुरक्षा अधिकारी आणि इतर भरती परीक्षांसाठी हॉल तिकीट जाहीर केले आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइट fssai.gov.in वर जाऊन हॉल तिकीट …

Read More »

CBSE 10th 12th Exam Date sheet: सीबीएसई दहावी, बारावी टर्म २ परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

CBSE Class 10, 12 Term 2 Date sheet: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) इयत्ता दहावी आणि बारावीच्या टर्म २ परीक्षांचे वेळापत्रक (Cbse Class 10 And 12 Term 2 Date Sheet) जाहीर केले आहे. यासंबंधीची घोषणा बोर्डाने ट्विटरद्वारे केली आहे. ट्विटरवर एका पोस्टद्वारे सीबीएसईने असे जाहीर केले आहे की टर्म २ बोर्ड परीक्षा सीबीएसई बोर्डाने २६ एप्रिलपासून आयोजित केल्या आहेत.जारी झालेल्या …

Read More »

IIIT नागपूरमध्ये भरती, डिप्लोमा आणि पदवीधरांना नोकरीची संधी

IIIT Recruitment: इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी, नागपूर (Indian Institute Of Information Technology Nagpur)येथे विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.नागपूर येथील इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये (IIIT Nagpur Recruitment) पदवीधर प्रशिक्षणार्थी (Graduate Trainee) आणि तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी (Technician …

Read More »

NEET UG: मॉप अप राउंड मधील पसंतीक्रम भरण्याच्या प्रक्रियेस सुरुवात

NEET UG Counselling 2021: वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील नीट यूजी मॉप अप राउंड मधील पसंतीक्रम भरण्याच्या प्रक्रियेस शुक्रवार ११ मार्चपासून सुरूवात झाली आहे. ज्या उमेदवारांनी NEET UG 2021मॉप अप राउंडसाठी नोंदणी केली आहे ते आपले कॉलेजांचे पसंतीक्रम भरून सबमिट करू शकतात. ज्या उमेदवारांनी अद्याप मॉप अप राउंडसाठी नोंदणी केली नसेल तर ते mcc.nic.in या संकेतस्थळावर जाऊन १४ मार्च २०२२ रोजी रात्री …

Read More »

Drone School: भारतातील पहिले ड्रोन स्कूल सुरु, जाणून घ्या वैशिष्ट्य आणि रोजगाराच्या संधी

Drone School: मध्यप्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये राज्यातील पहिली ड्रोन शाळा (First Drone School) सुरू होत आहे. ही शाळा अनेक तांत्रिक सुविधांनी सुसज्ज असणार असून यामुळे शिक्षण क्षेत्रात एक नवीन सुरुवात केली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ड्रोन स्कूलचे उद्घाटन (Drone School Opening) केले. यावेळी मान्यवरांनी ड्रोन स्कूल तंत्रज्ञानाचे भविष्य आणि अशा …

Read More »

Education Budget 2022: राज्याच्या अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रासाठी काय? जाणून घ्या

Education Budget 2022: महाराष्ट्र सरकारने २०२२-२३ (Maharashtra Budget 2022) या वर्षासाठीचा अर्थसंकल्प जाहीर केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांनी विधानसभेत अर्थसंकल्प (Budget 2022) जाहीर केला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते. यामध्ये शिक्षण क्षेत्रासाठीही तरतूद करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये (Education Budget 2022) मुंबई विद्यापीठासाठी २ कोटींची तरतूद करण्यात …

Read More »

CBSE Term 1 निकाल आज जाहीर होणार असल्याचे ट्वीट व्हायरल.. बोर्डाने दिले स्पष्टीकरण

CBSE Term 1 Results: सीबीएसई बोर्ड टर्म १ परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार असल्याचे एक ट्वीट सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. सीबीएसई बोर्डाच्या अधिकृत ट्वीटर हॅंडलवरुन हे ट्वीट आल्याचे भासविले जात आहे. यावर सीबीएसई बोर्डाने स्पष्टीकरण दिले आहे. हे ट्वीट बनावट आणि दिशाभूल करणारे असल्याचे बोर्डाने म्हटले आहे. सीबीएसईने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर दिलेल्या माहितीनुसार, बारावीचा निकाल आज जाहीर होणार …

Read More »