Facebook lay off: ट्विटरनंतर आता फेसबुकमध्ये कर्मचाऱ्यांवर नोकरीची टांगती तलवार

Facebook lay off: ट्विटरनंतर आता दिग्गज सोशल मीडिया कंपनी फेसबुकनेही मोठ्या प्रमाणात कपातीची तयारी केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फेसबुकची मूळ कंपनी मेटा प्लॅटफॉर्म हजारो कर्मचाऱ्यांना बुधवारपासून कामावरून काढण्यास सुरुवात करणार आहे. मेटा कंपनी जगभरातील १२ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची शक्यता आहे. मेटामध्ये सध्या साधारण ८७ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. याआधी शुक्रवारी ट्विटरने जगभरातील ३ हजार ७०० कर्मचाऱ्यांना काढून टाकले होते. यानंतर कंपनीतील कर्मचाऱ्यांची संख्या निम्म्यावर आली आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांनी ऑक्टोबरच्या अखेरीस ट्विटर खरेदी करण्याचा करार पूर्ण केला. त्यानंतर कंपनीने अर्ध्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले.

मस्क नंतर, मेटा प्लॅटफॉर्मचे सीईओ मार्क झुकरबर्ग देखील मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपातीची तयारी करत आहेत. मेटा कंपनीचे शेअर्स यंदा ७३ टक्क्यांनी घसरले आहेत. फेसबुक (आता मेटा प्लॅटफॉर्म) टिकटॉक आणि यूट्यूब सारख्या प्लॅटफॉर्मसोबत कठीण स्पर्धा करत आहे. या १८ वर्ष जुन्या कंपनीतून युजर्स टिकटॉक आणि यूट्यूबकडे वळत आहेत. त्यामुळे कंपनीच्या महसुलावर मोठा परिणाम झाला आहे. यावर्षी कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. कंपनीने आधीच नवीन भरतीवर बंदी घातली होती आणि आता येथे मोठ्या प्रमाणात कपात केली जाणार आहे.

हेही वाचा :  CCI Recruitment 2023

Twitter च्या नव्या बॉसचा आदेश, ‘आठवड्याचे सातही दिवस १२ तास काम करा किंवा सोडा’

झुकरबर्ग यांची एकूण संपत्ती

मेटा प्लॅटफॉर्ममधील सुमारे १६.०८ टक्के शेअर्स झुकरबर्गकडे आहेत. फेसबुकच्या कमाईपैकी ९७ टक्क्यांहून अधिक महसूल जाहिरातींमधून येतो. कंपनीच्या शेअर्सच्या घसरणीमुळे झुकेरबर्गच्या एकूण संपत्तीतही मोठी घसरण झाली आहे. एकेकाळी झुकरबर्ग जगातील श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर होता पण आता त्यांची २९व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. त्यांची एकूण संपत्ती या वर्षी $९०.३ अब्जने घसरून $३५.२ अब्ज झाली आहे. शेअर्सच्या घसरणीमुळे फेसबुकच्या मार्केट कॅपमध्येही मोठी घसरण झाली आहे. या वर्षात कंपनीचे बाजारमूल्य $५०० अब्जांनी घसरले आहे.

कंपनीने मे महिन्यातच इंजिनीअर्स आणि डेटा सायंटिस्टची नियुक्ती थांबवली होती. पुढील १८ ते २४ महिने आव्हानात्मक असू शकतात असे जुलैमध्ये झुकरबर्गने कर्मचाऱ्यांना सांगितले होते. त्यानंतर त्यांनी व्यवस्थापकांना चांगली कामगिरी न करणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी बनविण्यास सांगितले.

फेसबुकमध्ये प्रथमच कपात केली जाणार आहे. अनेक वर्षांपासून या कंपनीने विक्रमी वाढ नोंदवली आणि गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला. यामुळेच वॉल स्ट्रीटचा तो फेव्हरेट राहिला.पण यावर्षी कंपनीचे तिमाही अहवाल चांगले आले नाहीत. फेसबुक देखील आक्रमकपणे आपल्या Metaverse उत्पादनांची जाहिरात करत आहे. त्यामुळे कंपनीच्या आर्थिक स्थितीवरही परिणाम झाला आहे.

हेही वाचा :  भारतीय आयुर्विमा महामंडळ अंतर्गत अप्रेंटिस डेव्हलोपमेंट ऑफिसर पदांची भरती

ट्विटरमधून कर्मचाऱ्यांना मिळणार डच्चू? एलोन मस्क काय म्हणाले जाणून घ्या

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …