एलॉन मस्क काही ऐकेनात! ट्टिरमधून ४,४०० कंत्राटी कामगारांना नोटीस न देता काढले

Authored by Pravin Dabholkar | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 14 Nov 2022, 1:32 pm

Twitter layoff: ट्विटरचे नवीन बॉस एलोन मस्क यांनी कर्मचारी कपातीचे धोरण अवलंबले आहे. गेल्या आठवड्यात, एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी आऊटसोर्सिंगवर काम करणार्‍या मॉडरेटरला नोकरीपासून दूर केल्याचे समजले. ट्विटर आणि इतर मोठे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म द्वेषयुक्त भाषण नियंत्रित करण्यासाठी आणि हानिकारक सामग्रीविरूद्ध नियम लागू करण्यासाठी आउटसोर्स केलेल्या कंत्राटदारांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असतात.

 

Twitter Layoff
एलॉन मस्क काही ऐकेनात! ट्टिरमधून ४,४०० कंत्राटी कामगारांना नोटीस न देता काढले

हायलाइट्स:

  • एलॉन मस्क काही ऐकेनात!
  • ट्टिरमधून कामगारांना डच्चू
  • ४,४०० नोकरदारांवर परिणाम
Twitter Layoff: एलॉन मस्क यांनी ट्विटरची सूत्रे हाती घेतल्यापासून कंपनीत दररोज काही ना काही खळबळ उडालेली दिसत आहे. कंपनीचा पदभार स्वीकारण्यापूर्वी मस्क यांनी जवळपास ३,८०० कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मस्कने आता कंपनीच्या कंत्राटी कामगारांना कामावरून काढून टाकण्यास सुरुवात केल्याचे वृत्त आहे. ट्विटरमध्ये सुमारे ५,५०० कंत्राटी कर्मचारी असून, त्यापैकी सुमारे ४,४०० कर्मचाऱ्यांना नोटीस न देता काढून टाकण्यात आले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या कर्मचाऱ्यांना नोटीसही देण्यात आलेली नाही. या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा ऑनलाइन सेवा आणि ईमेलचा एक्सेस काढून घेण्यात आला आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे या कर्मचाऱ्यांच्या मॅनेजरलाच या कपातीबद्दल अजिबात माहिती नव्हती. हे कंत्राटी कर्मचारी कामावर यायचे बंद झाल्यावर त्यांच्या हे लक्षात आले.

हेही वाचा :  Success Story: मिस इंडिया फायनलिस्ट, मॉडेलिंग सोडून दिली UPSC; पहिल्याच प्रयत्नात...

ट्विटरमधील कपात थांबेना

ट्विटरचे नवीन बॉस एलोन मस्क यांनी कर्मचारी कपातीचे धोरण अवलंबले आहे. गेल्या आठवड्यात, एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी आऊटसोर्सिंगवर काम करणार्‍या मॉडरेटरला नोकरीपासून दूर केल्याचे समजले. ट्विटर आणि इतर मोठे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म द्वेषयुक्त भाषण नियंत्रित करण्यासाठी आणि हानिकारक सामग्रीविरूद्ध नियम लागू करण्यासाठी आउटसोर्स केलेल्या कंत्राटदारांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असतात.

अखेर ज्याची भीती होती तेच घडलं! ‘मेटा’मध्ये ११ हजार कर्मचाऱ्यांना नारळ!
ट्विटरने आता अशा सामग्रीवर नजर ठेवणाऱ्या लोकांना एक्झिट दाखवण्यास सुरुवात केली आहे. तत्पूर्वी ४ नोव्हेंबर रोजी ट्विटरने आपल्या कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांना त्यांच्या हकालपट्टीबद्दलची माहिती देणारा ई-मेल पाठवला होता. आता मस्क यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यास सुरुवात केली आहे. ट्विटरवर एक वर्षापेक्षा जास्त काळ काम करत असलेला मेलिसा इंगेल यांना देखील कर्मचारी कपातीचा फटका बसला. मोठ्या संख्येने कर्मचार्‍यांना काढून टाकण्यात आल्याने ट्विटरची परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता असल्याचे मेलिसा म्हणाल्या.

Facebook lay off: ट्विटरनंतर आता फेसबुक कर्मचाऱ्यांचीही नोकरी धोक्यात

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

हेही वाचा :  Viral Video : वादळाची माहिती देण्यासाठी अँकरनं Live बुलेटिन थांबवलं आणि...

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …