कोल्हापूर फुटबाॅल हंगामासाठी 302 खेळाडू करारबद्ध; 22 परदेशी खेळाडूंचा समावेश

Kolhapur Football : डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हंगामासाठी (Kolhapur Football Season) कोल्हापूरमधील फुटबॉल क्लबने 22 परदेशी खेळाडूंना करारबद्ध केले आहे. कोल्हापूरचे क्लब स्थानिक लीगसाठी परदेशी खेळाडूंना करारबद्ध करत आले आहेत. मात्र, गेल्या दोन वर्षांत कोविडच्या प्रादुर्भावामुळे पाणी फेरले होते. 

16 संघांनी 302 खेळाडूंना करारबद्ध केल्याने शनिवारी खेळाडूंची नोंदणी संपली. करारबद्ध झालेल्या खेळाडूंमध्ये 263 कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत, तर 17 देशाच्या इतर भागातील आणि 22 परदेशी आहेत. सहा महिन्यांपर्यंत चालणाऱ्या या मोसमात अनेक परदेशी खेळाडू कोल्हापुरात घराघरात पोहोचले आहेत. गेल्या दोन वर्षात निर्बंधांमुळे कोल्हापूर क्लबने एकाही परदेशी खेळाडूला संघात घेतले नव्हते. जिल्ह्यातील सर्वोच्च क्रीडा संस्था असलेली कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन कोल्हापूरच्या बाहेरील जास्तीत जास्त तीन खेळाडूंना प्रवेश देण्यास परवानगी देते. यापैकी दोन परदेशी असू शकतात.

कोल्हापूरचे क्लब परदेशी खेळाडूंची वर्षभरातील कामगिरी पाहून त्यांच्याशी संपर्क साधतात. राष्ट्रीय लीगमध्ये खेळणाऱ्या स्थानिक खेळाडूंकडून शिफारस मिळाल्यानंतरही काहीजण येतात. बहुतेक संघ स्ट्रायकरच्या स्लॉटसाठी परदेशी लोकांना प्राधान्य देतात.

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात हंगाम सुरु होण्याची शक्यता

दुसरीकडे कोल्हापूरचा बहुप्रतिक्षित फुटबॉल हंगाम नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. साखळी सामने कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन (KSA) मार्फत सुरुवातीला खेळवले जातील आणि नंतर पात्र संघ बाद फेरीत लढतील. प्रथम सामने KSA द्वारे आयोजित केले जातात आणि नंतर अनेक शीर्षक प्रायोजकांद्वारे (title sponsors) स्पर्धा आयोजित केल्या जातात.

हेही वाचा :  संतोष ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या फुटबॉल संघात कोल्हापूरच्या पाच खेळाडूंची निवड

Reels

अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षांकडून कोल्हापूरचा विशेष उल्लेख 

दरम्यान, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे नवनियुक्त अध्यक्ष कल्याण चौबे यांनी इंडियन सुपर लिगच्या नवव्या पर्वाच्या उद्‍घाटनप्रसंगी केरळमध्ये बोलताना बंगाल, केरळ यांच्या बरोबरच कोल्हापुरात देखील फुटबॉल चाहत्यांची मोठी संख्या असल्याचा विशेष उल्लेख केला होता. 

चौबे म्हणाले की, भारतात फुटबॉलचे मोठे चाहते आहेत. मुख्यतः केरळ, बंगाल, ईशान्येकडील राज्ये, तसेच महाराष्ट्रातील कोल्हापुरात देखील प्रचंड संख्येने चाहते सामन्यांसाठी हजेरी लावतात. त्यामुळे चाहत्यांना अधिकाधिक रोमांचक सामने आणि सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्नात आहे. एआयएफएफचे नवे कार्यकरिणी सदस्य मालोजीराजे छत्रपती यांनी कोल्हापूरमधील क्रेझ पाहण्यासाठी चौबे यांना आमंत्रित केले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …