Viral Video : वादळाची माहिती देण्यासाठी अँकरनं Live बुलेटिन थांबवलं आणि…

नवी दिल्ली : निसर्ग काही आपल्याला सांगून त्याचे रंग बदलत नाही. ज्यामुळं या निसर्गाच्या प्रत्येक हालचालीकडे तितक्याच गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे, हे आपण गेल्या काही घटनांवरून शिकलो. अशातच आता याच निसर्गाच्या रौद्र रुपापासून आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी वृत्तवाहिनीच्या अँकरनं केलेली धडपड साऱ्या जगात चर्चेचा विषय ठरत आहे. (Viral video NBC meteorologist calls family )

NBC Washington च्या हवामान विभागातील प्रमुख Doug Kammerer यांनी वृत्तनिवेदन करताना थेट प्रक्षेपणादरम्यान, म्हणजेच लाईव्ह ब्रॉडकास्टमध्येच आपल्या घराच्या भागात धडकणाऱ्या वादळाची कल्पना कुटुंबाला दिली. 

31 मार्च रोजी Doug Kammerer ऑन एअर होते. त्यावेळी ते हवामानाचा अंदाज सांगत होते. जिथं त्यांना हवामान खात्याकडून वादळाची पूर्वसूचना आल्याचं कळलं. 

या वादळाचा मार्ग हा अँकरच्या घरावरूनच असल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी प्रक्षेपण सुरु असतानाच त्यादरम्यान आपल्या मुलाला फोन करत संपर्क साधला. 

‘आताच्या आता खाली ये… आधी खाली ये… बेडरुममध्ये जा आणि तिथंच 15 मिनिटं वाट पाहा…. हे आताच कर…’, असं Doug Kammerer त्यांच्या मुलाला फोनवर म्हणाले. असं करतानाचा त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला. 

हेही वाचा :  Video: मृतदेहांचा खच उचलण्यासाठी भरती; चीनमध्ये कोरोनाच्या विळख्यात मन घट्ट करून लोक कतायत 'ही' कामं

मला माझ्या मुलांना सांगावंच लागलं, कारण सध्या ते एकतर गेम खेळत असतील आणि या बातमीकडे त्यांचं लक्ष नसेल. 

तिथं Doug Kammerer कुटुंबाला वादळापासून वाचवण्याच्या प्रयत्नांत असतानाच इथं त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ज्यानंतर काही वेळानं त्यांनी आपलं कुटुंब सुरक्षित असल्याची माहिती ट्विट करत दिली. 

सोशल मीडियावर आपल्या कुटुंबाप्रतीही दक्ष असणाऱ्या या ‘सुपरडॅड’चं अनेकांनीच तोंड भरुन कौतुक केलं. सतर्कताही तुम्हाला मोठ्या संकटातून कशी वाचवू शकते अशाच शब्दांत अनेकजण व्यक्त झाले. 

कामामध्ये एकरुप झालेलं असताना अशा सर्व मंडळींची एक नजर ही त्यांच्या कुटुंबावरही सातत्यानं असते हेच या व्हिडीओच्या निमित्तानं सिद्ध झालं, जे कुणीही नाकारू शकत नाही. 

त्यामुळं घर आणि काम या दोन्हीमध्ये मेळ साधत आयुष्य जगणाऱ्या प्रत्येकालाच सलाम! 

हेही वाचा :  Chandrayaan-3 बद्दल इस्रोकडून आतापर्यंतची सर्वात मोठी माहिती; Photo सह जरा स्पष्टच सांगितलं की...



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पंकजा मुंडे बीडमध्ये भाजपचा बालेकिल्ला राखणार का? जनतेचा कौल कोणाला?

Beed Loksabha Constituency Special Report : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन …

ठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय?

Loksabha 2024 : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य, EVM आणि हजारो मतदानकार्ड आढळून आल्याने …