Amazon ने कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं..आता पत्र लिहून कळविलं असं काही..

Amazon LayOff: अमेरिकेतील तंत्रज्ञान आणि ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनने वाढत्या आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर आपला खर्च कमी करण्यास सुरुवात केली आहे. हे पाहता कंपनीने नोकऱ्या कपात करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान, कंपनीचे हार्डवेअर प्रमुख डेव्ह लिंप यांनी कर्मचाऱ्यांना पत्र लिहिले आहे. पुनरावलोकनांच्या अनेक फेऱ्या घेतल्यानंतर आम्ही अलीकडेच काही टिम्स आणि कार्यक्रमांची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला आहे.

कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रांनुसार, ‘ही बातमी देताना आम्हाला खूप दुःख होत आहे. आम्हाला माहित आहे की याचा परिणाम म्हणून आम्ही डिव्हाइसेस आणि सर्व्हिसेस ऑर्ग मधील एक प्रतिभावान अमेझोनियन गमावू.’ नवीन काम शोधण्यात त्यांना मदत करण्यासह यापुढे सहकार्य देण्यासाठी आम्ही प्रत्येक व्यक्तीसोबत जवळून काम करत राहू असे कंपनीने आपल्या पत्रात म्हटले आहे.

न्यूज एजन्सी एएनआयने न्यूयॉर्क टाईम्स (NYT) च्या अहवालाचा हवाला देत म्हटले आहे की, अमेझॉन कंपनी शक्य तितक्या लवकर १० हजार कर्मचार्‍यांना काढून टाकू शकते. कपातीची एकूण संख्या १० हजारच्या आसपास राहिल्यास, अॅमेझॉनच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कपात असेल. जी कंपनीच्या कर्मचार्‍यांच्या एक टक्क्यापेक्षा कमी आहे. कारण Amazon जागतिक स्तरावर १.६ दशलक्षाहून अधिक लोकांना रोजगार देते. नोकऱ्यांमधील कपात अ‍ॅमेझॉनच्या डिव्हाइसेस युनिटवर केंद्रित असेल. ज्यामध्ये व्हॉइस असिस्टंट अलेक्सा आणि त्याच्या रिटेल आणि मानव संसाधन विभागांचा समावेश आहे, असे अहवालात म्हटले आहे.

हेही वाचा :  सिंगापूरमध्ये भारतीयांच्या नोकऱ्या संकटात, टेक कंपन्यांमध्ये कपातीला सुरुवात

फेसबुकनंतर आता Amazonमध्ये नोकर कपात! ३,५०० कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार

गुगलमध्येही टाळेबंदीच्या बातम्या

अॅक्टिव्हिस्ट गुंतवणूकदार टीसीआय फंड मॅनेजमेंटने गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटला खर्चात कपात करण्यासाठी त्यांचे कर्मचारी कमी करण्यास सांगितले आहे. कंपनीमध्ये खूप कर्मचारी आहेत आणि प्रति कर्मचारी खर्च खूप जास्त आहेत, असे २०१७ पासून अल्फाबेटमध्ये सहा अब्ज शेअर्स असलेल्या गुंतवणूकदाराने कंपनीला सांगितले.

हजारो लोकांच्या नोकऱ्या जाणार! २ अमेरिकन कंपन्यांतील कपातीमुळे आशियातील कर्मचाऱ्यांना फटका

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …