‘बाहुबली’ फेम अनुष्का शेट्टीचा योग ट्रेनर ते अभिनय असा प्रवास, कितवी शिकलीय? जाणून घ्या

Anushka Shetty’s Education Details: साऊथ इंडियन अभिनेत्री अनुष्का शेट्टीचा ७ नोव्हेंबर रोजी वाढदिवस असतो. तिने आपल्या सौंदर्य आणि अभिनयाने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘बाहुबली’मध्ये ‘देवसेना’ ही भूमिका साकारल्यानंतर ती घराघरात पोहोचली. तिच्या सिनेमांतील अभिनयाची सगळीकडे चर्चा सुरु असते. दरम्यान तिच्या शैक्षणिक कारकिर्दिवर एक नजर टाकूया.

अनुष्काने ज्याप्रमाणे दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये तिने स्वत:ची ओळख निर्माण केली तशी ती अभ्यासातही कुणापेक्षा कमी नव्हती. अनुष्का शेट्टी बंगळुरु येथे लहानाची मोठी झाली. तिला पालकांनी तिला बंगळुरू येथील शाळेत पाठवले. येथूनच तिचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. अनुष्काला सुरुवातीपासूनच कॉम्प्युटरची खूप आवड होती. यामुळे तिने कॉम्प्युटरमध्ये ग्रॅज्युएशन करण्याचा निर्णय घेतला.

शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनुष्का शेट्टीने उच्च शिक्षणासाठी बंगळुरूमधील माउंट कार्मेल कॉलेजची निवड केली. या संस्थेतून त्यांनी कॉम्प्युटर ऍप्लिकेशनमध्ये ग्रॅज्युएशनपर्यंतचे पूर्ण केले.

अनुष्का शेट्टी केवळ शिक्षणच घेत नव्हती. तर शिक्षणासोबत विविध कलांमध्ये पारंगत होती. ती योगामधील देखील तज्ञ आहे. अनुष्काने भरत ठाकूर यांच्याकडून योगाचे शिक्षण घेतले आहे. अभिनेत्री होण्यापूर्वी ती योगा इंस्ट्रक्टर होती. अनुष्का शेट्टीला शिक्षणाची पहिल्यापासून आवड होती. सुरुवातीच्या काळात तर तिसरीच्या मुलांना शिकविण्याचे काम करायची.

हेही वाचा :  HPPSC Recruitment 2023 – Opening for 585 Lecturer Posts | Apply Online

शिक्षण अर्धवट सोडून करु लागली डान्स, सोशल मीडिया स्टार गौतमी पाटील कोण आहे?

चित्रपट कारकीर्द

अनुष्का शेट्टीने तिच्या फिल्मी करिअरमध्ये ‘बाहुबली’, ‘डॉन’, ‘बिल्ला’, ‘लिंगा’ आणि ‘मिर्ची’ आणि ‘सिंघम’ या सिनेमांमधून काम केले आहे. अनेक उत्तमोत्तम चित्रपटांतून तिने आपली ताकद दाखवली आहे. अनुष्का शेट्टीला तिच्या सर्वोत्कृष्ट कामासाठी तीन वेळा फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सध्या ती तिच्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे.

‘मै नही तो कौन बे?’…कोण आहे सृष्टी तावडे? तिच्या करिअरविषयी जाणून घ्या
वडिलांकडे पैसे नव्हते म्हणून शिक्षण अर्ध्यावर सोडले, समंथा प्रभूबद्दलच्या ‘या’ गोष्टी तुम्हालाही माहिती नसतील

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …