शिक्षण अर्धवट सोडून १५ वर्षे करतेय अभिनय, दीपिका पदुकोणच्या करिअरविषयी जाणून घ्या

Deepika Padukone Education Details: बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने अभिनय क्षेत्रात १५ वर्षे पूर्ण केली आहेत. तिच्या मेहनतीमुळे बॉलिवूड इंडस्ट्रीत तिने विशेष स्थान मिळवले आहे. कोणतीही फिल्मी पार्श्वभूमी नसताना तिने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. दीपिका पदुकोणचा जन्म भारतात झाला नाही हे फार कमी जणांना माहिती असेल. दरम्यान तिच्या शैक्षणिक प्रवासाविषयी जाणून घेऊया.

दीपिका पदुकोण २००६ पासून बॉलिवूड इंडस्ट्रीत सक्रिय आहे तिची कौटुंबिक पार्श्वभूमी खेळाची आहे.वडील प्रकाश पदुकोण हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटनपटू आहेत. तिच्या आईचे नाव उज्जला पदुकोण आणि बहिणीचे नाव अनिशा पदुकोण आहे. ती एक व्यावसायिक गोल्फ खेळाडू आहे. दीपिका स्वतः देखील एक उत्तम बॅडमिंटनपटू आहे. पण तिला अभिनय क्षेत्रात करिअर करायचे होते. बॉलीवूडचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिला क्रीडा जगतापासून दूर रहावे लागले.

दीपिका पदुकोणचा जन्म ५ जानेवारी १९८६ रोजी झाला. डेन्मार्कच्या कोपनहेगनमध्ये तिचा जन्म झाला. दीपिका पदुकोणचे मूळ गाव बंगळुरू आहे. तिने आपले शालेय शिक्षणही तेथूनच पूर्ण केले. दीपिकाने बंगळुरूच्या सोफिया हायस्कूलमधून प्राथमिक शिक्षण घेतले आहे. त्यानंतर तिने बंगळुरूच्या माउंट कार्मेल कॉलेजमधून इंटरमिजिएटचे शिक्षण घेतले. दीपिकाने समाजशास्त्रात बीए केले आहे. पदवी मिळविण्यासाठी तिने दिल्लीतील इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात (इग्नू) प्रवेश घेतला होता. पण अभिनयात करिअर करण्यासाठी तिने कॉलेज शिक्षण अर्धवट सोडले.

हेही वाचा :  शाहरुखचा 'पठाण' पहिल्या वीकेंडला किती कमाई करणार?

शिक्षण अर्धवट सोडून करु लागली डान्स, सोशल मीडिया स्टार गौतमी पाटील कोण आहे?
मॉडेलिंग आणि चित्रपटांमध्ये करिअर करण्यासाठी दीपिकाने मध्यंतरी कॉलेज सोडले. २००६ मध्ये तिने ‘ऐश्वर्या’ या कन्नड चित्रपटात काम केले होते. त्यानंतर २००७ मध्ये ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिने तिच्या पहिल्याच चित्रपटात शाहरुख खानची अभिनेत्री बनून सर्वांच्या मनावर विशेष छाप सोडली. यानंतर दीपिकाला चित्रपट मिळत राहिले.

‘वेडात मराठे…’मध्ये वीर म्हणून झळकणार सत्या महेश मांजरेकर, कितवी शिकलाय जाणून घ्या
१४ नोव्हेंबर २०१८ रोजी दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांचा विवाह झाला. दोघांनीही आपल्या जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत इटलीतील लेक कोमो येथे लग्नाचे विधी पूर्ण केले होते. भारतात आल्यानंतर त्याने अनेक शहरांमध्ये रिसेप्शन दिले. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.

‘बाहुबली’ फेम अनुष्का शेट्टीचा योग ट्रेनर ते अभिनय असा प्रवास, कितवी शिकलीय? जाणून घ्या

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …