‘लोकसत्ता अभिजात’ उपक्रमांतर्गत खास कार्यक्रम


ठाण्यात गुरुवारी ‘लता : एक आठवण’

ठाणे: ज्या स्वरांनी गेली आठ दशके जगावर आपली जादू पसरवली, ज्या स्वरांनी प्रत्येकाला जगण्याचे बळ दिले आणि ज्या स्वरांवर प्रत्येकाने मन:पूत प्रेम केले, त्या स्वरांचा आठव येत्या गुरुवारी एका विशेष कार्यक्रमाद्वारे करण्यात येणार आहे. ‘लोकसत्ता अभिजात’ या उपक्रमांतर्गत जागतिक कीर्तीच्या कलावंत भारतरत्न लता मंगेशकर यांनी गायलेल्या निवडक गीतांचा ‘लता : एक आठवण’ हा खास कार्यक्रम येत्या गुरुवारी, (दि. ३ मार्च) ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात आला आहे.

आपल्या स्वतंत्र प्रतिभेने चित्रपट संगीताच्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवलेल्या कलावंत बेला शेंडे यांचा या कार्यक्रमातील पाहुणे कलाकार म्हणून सहभाग असेल व ते या कार्यक्रमाचे खास आकर्षणही असेल. त्यांच्या बरोबर संजीवनी भेलांडे, संपदा गोस्वामी व केतकी भावे-जोशी हे कलावंतही लतादीदींची निवडक हिंदी, मराठी, तसेच रागदारीवर आधारित गीते या कार्यक्रमात सादर करणार आहेत.

गेल्या दोन वर्षांतील करोनाकाळामुळे ‘लोकसत्ता अभिजात’ या कार्यक्रमाचे आयोजन होऊ शकले नाही. त्या पार्श्वभूमीवर लता मंगेशकर यांच्या गीतांचा हा विशेष कार्यक्रम ठाण्यातील रसिकांना अपूर्वाईचा ठरणार आहे. दोन वर्षांपूर्वी ठाण्यात मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने ‘लोकसत्ता अभिजात’ या उपक्रमाचा प्रारंभ झाला होता. मराठी सारस्वताच्या दरबारातील नामवंतांच्या कवितेचा जागर करणाऱ्या त्या कार्यक्रमाला ठाणेकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला होता. आता पुन्हा ती संधी ‘लता : एक आठवण’ या कार्यक्रमामुळे ठाणेकरांना मिळणार आहे.

  • प्रवेशिका आजपासून सकाळी ८.३० ते ११ आणि सायंकाळी ५ ते रात्री ८ या वेळेत विनामूल्य उपलब्ध. एका व्यक्तीला एकच प्रवेशिका दिली जाईल. काही जागा निमंत्रितांसाठी राखीव.
हेही वाचा :  ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; साकेत पुलाजवळ वाहतूक बदल!

कधी : गुरुवार, ३ मार्च २०२२

वेळ : सायंकाळी ६.३० वाजता

ठिकाण : गडकरी रंगायतन

प्रस्तुती :  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ

सहप्रायोजक : सिडको, टीजेएसबी सहकारी बँक लि.

पॉवर्ड बाय : नेटभेट ईलर्निग सोल्युशन्स

बँकिंग पार्टनर्स : ठाणे भारत सहकारी बँक लि.

The post ‘लोकसत्ता अभिजात’ उपक्रमांतर्गत खास कार्यक्रम appeared first on Loksatta.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महारेराचा बिल्डर लॉबीला दणका; पार्किंचा वाद टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

MAHARERA: बिल्डिंगमध्ये अपुऱ्या जागेच्या अभावी पार्किंग करण्यास अडचणी येतात. हल्ली काही बिल्डर घर खरेदी केल्यानंतरच …

Viral Video : बॉसच्या जाचाला कंटाळून नोकरी सोडणाऱ्या तरुणाकडून शेवटच्या दिवशी ढोलताशे वाजवत कंपनीला निरोप

Pune Job News : सरकारी नोकरीवर (Government Jobs) असणाऱ्या अनेकांचाच खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना हेवा …