मैत्रिणींना दाखवायला तरुणाने पिस्तूल चालवले, पण घडलं भलतंच… साताऱ्यात खळबळ

Satara Youth Firing In The Air In Marathi: साताऱ्यातील (Satara) एमआयडीसीतील समर्थ कॉलनी परिसरात एक खळबळजनक घटना घडली आहे. मैत्रिणींना पिस्तूल (Pistol) दाखवताना मित्राकडून एक चूक घडली आणि मोठा अनर्थ घडताना टळला आहे. या घटनेमुळं परिसरात एकच चर्चा रंगली आहे. दरम्यान, पोलिसांनी (Maharashtra Police) सदर मित्राला ताब्यात घेतलं आहे. तसंच, त्याच्या जवळील बंदूकही जप्त केलं आहे. नेताजी बोकेफोडे असं या तरुणीचे नाव आहे. (Satara Youth Firing In The Air)

जमिनीवर फायरिंग केली

एमआयडीसीतील समर्थ कॉलनी परिसरात गणेश क्लिनिक जवळ नेताजीने आपल्या दोन मैत्रिणींना दाखवण्यासाठी पिस्तूल बाहेर काढले. त्याचवेळी चुकीने त्याच्या पिस्तुलातून जमिनीवर फायरिंग झाली. गोळीबाराचा आवाज ऐकून एकच गोंधळ निर्माण झाला. तसंच, नागरिकांनी पोलिसांनीही या घटनेची माहिती दिली. 

चेष्टेत गोळीबार केला

दरम्यान, तरुणाने केलेल्या गोळीबाराच्या घटनेत कोणीही जखमी झालेले नाहीये. गोळीबाराची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. याबाबत त्याची चौकशी विचारपूस केली असता मैत्रिणींसमोर चेष्टेमध्ये हा प्रकार घडला असल्याचे त्यांनी सांगितले. 

हेही वाचा :  आधी खात्यात पैसे टाकले मग केला मोठा आरोप; साताऱ्यात डॉक्टरांना कंटाळून तरुणाने स्वतःला संपवलं

सातारा पोलिसांनी केली अटक

पोलिस  या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करत आहेत. याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली आहे. तसंच, तरुणाकडे पिस्तूल कसे व कुठून आले, याचा तपास पोलिस करत आहेत. पोलिसांनी नेताजी बोकेफोडेला ताब्यात घेतल्यानंतर त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. माझ्याकडून चुकून गोळी झाडली गेल्याचे त्याने सांगितले. मात्र, बंदूक परवाना नसताना त्याने हे शस्त्र बाळगल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. 

प्रत्यक्षदर्शींनी मात्र वेगळेच सांगितले

दरम्यान, काही प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यावरुन, नेताजी त्याच्या मैत्रिणीला उपचारासाठी घेऊन आला होता. मात्र, रविवार असल्याने क्लिनिक बंद होते. तेव्हा संतापाच्या भरात त्याने क्लिनिकबाहेरच गोळीबार केला. पिस्तूलाच्या आवाजाने आजूबाजूचे लोक तिथे धावत आले. मात्र, तो तिथून निघून गेला होता. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देताच ते घटनास्थळी पोहोचले. व तरुणाला तासाभरात ताब्यात घेतले. तरुणाकडून जर्मन बनावटीचे पिस्तूल ताब्यात घेतले आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …