Anushka Sharma Production House : अनुष्का शर्मा स्वत:च्या निर्मिती कंपनीतून झाली पायउतार

Anushka Sharma : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने (Anushka Sharma) एक मोठा निर्णय घेतला आहे. 2013 साली अनुष्काने ‘क्लीन स्लेट फिल्म्स’ (Clean Slate Filmz) नावाचे प्रॉडक्शन हाऊस सुरू केले होते. अनुष्काने तिचा भाऊ कर्णेशसोबत हे प्रॉडक्शन हाऊस सुरू केले. पण आता अनुष्काने या प्रॉडक्शन हाऊसला रामराम केला आहे.

अनुष्काने प्रॉडक्शन हाऊसला नुकताच रामराम केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने यासंदर्भात माहिती दिली आहे. या प्रॉडक्शन हाऊस अंतर्गत अनुष्काने ‘NH 10’, ‘फिलौरी’, ‘परी’ यांसारख्या चित्रपटांची आणि ‘पाताल लोक’ या वेब सीरिजची निर्मिती केली आहे.

 

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)



अनुष्काने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे,”कर्नेश ‘क्लीन स्लेट फिल्म्स’ या प्रॉडक्शन हाऊसची जबाबदारी व्यवस्थित पूर्ण करेल, असा माझा ठाम विश्वास आहे. या कंपनीला आणि कर्नेशला माझी साथ नेहमीच असेल. भविष्यात मी या निर्मिती संस्थेच्या बॅनरअंतर्गत काम करण्यास उत्सुकदेखील आहे”. अनुष्काचा‘चकदा एक्स्प्रेस’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

संबंधित बातम्या

हेही वाचा :  प्रियांका चोप्रा ठरली British Vogue मासिकावर झळकणारी पहिली भारतीय अभिनेत्री

Alia Bhatt Upcoming Films : ‘गंगूबाई काठियावाडी’नंतर आलियाचे पाच बिग बजेट सिनेमे होणार प्रदर्शित

RRR : ‘आरआरआर’ सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाल्यानंतर 10 दिवसांसाठी तिकीट महागणार

The Kashmir Files : ‘द कश्मीर फाइल्स’ ला गर्दी कोणाची? भाजपची की सामान्य प्रेक्षकांची?

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …