उन्हाळी कांद्याच्या लागवडीत ३० टक्के वाढ


चार-पाच महिने दरवाढीची शक्यता नसल्याने ग्राहकांना दिलासा

एप्रिल महिन्यात वखारीत साठवणूक

पुणे, नाशिक : लाल कांद्याला अवकाळी पावसाने तडाखा दिल्याच्या पार्श्वभूमीवर आता उन्हाळी कांद्याचा (गरवी) हंगाम सुरू झाला आहे. यंदाच्या हंगामात गरवी कांद्याच्या लागवडीत ३० टक्क्यांनी वाढ झाली असून, बाजारात आवक वाढल्याने कांद्याच्या दरात प्रतििक्वटलमागे ३५० ते ५०० रुपयांनी घट झाली आहे. पुढील चार ते पाच महिने कांदा दरात वाढ होण्याची शक्यता नसल्याने सामान्यांना दिलासा मिळणार आहे.  

खरीप हंगामातील गरवी कांद्याचा हंगाम सुरू झाला असून पुणे, नाशिकमधील लासलगाव, नवी मुंबईतील बाजार समितीच्या (वाशी) आवारात कांद्याची आवक वाढली आहे. लाल कांद्याचा (हळवी) हंगाम संपत आला आहे. गरवी कांद्याची आवक वाढल्याने पुण्यातील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात प्रतिकिलो कांद्याच्या दरात चार ते पाच रुपयांनी घट झाली आहे. यापुढील काळात बाजारात कांद्याचा अजिबात तुटवडा जाणवणार नाही, तसेच पुढील चार ते पाच महिने कांदा दरवाढीची शक्यता नाही, असे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील कांदा व्यापारी रितेश पोमण यांनी सांगितले. गरवी कांद्याचा हंगाम फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस सुरू होतो. जून महिन्यापर्यंत गरवी कांद्याचा हंगाम सुरू असतो. मार्च महिन्यात कांद्याची आवक वाढणार आहे. लाल कांद्याची लागवड नगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा परिसरातील शेतकरी मोठय़ा प्रमाणावर करतात. गरवी कांद्याची लागवड पुणे जिल्ह्यातील खेड, मंचर, शिरूर तसेच पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून केली जाते.

हेही वाचा :  पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार का? कच्चा तेलाच्या किंमतीत मोठी घसरण, का आणि किती झाली घसरण?

नाशिक बाजारात क्विंटलमागे ३५० ते ५००  रुपयांची घसरण 

नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीच्या आवारात कांद्याची आवक वाढल्याने कांदा दरात क्विंटलमागे ३५० ते ५००  रुपयांची घट झाली. मार्च महिन्यात उन्हाळी कांद्याची आवक वाढणार आहे.  कांद्याच्या सर्वात मोठय़ा लासलगाव बाजारात सध्या १७ ते १८ हजार क्विंटल कांद्याची आवक होत आहे. लाल कांद्याचा हंगाम अखेरच्या टप्प्यात असून बाजारात लाल कांद्याची आवक मोठय़ा प्रमाणावर होत आहे. लाल कांद्याच्या हंगामाची अखेर तसेच नवीन उन्हाळी कांद्याचा हंगामाच्या सुरुवातीस कांदा दरात घट होते, असे निरीक्षण लासलगाव बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाधावणे यांनी नोंदविले. देशांतर्गत मागणी कमी आहे. मागणीच्या तुलनेत कांद्याची आवक मोठय़ा प्रमाणावर होत असल्याने दरात घट झाली आहे. लाल कांद्याचे दर क्विंटलमागे ३५० रुपये तसेच उन्हाळी कांद्याचे दर ५३० रुपयांनी कमी झाले आहेत.

  • पावसाळय़ात कांद्याची आवक होत नाही. त्यामुळे गरवी कांदा लागवड करणारे शेतकरी एप्रिल महिन्याच्या अखेरीस वखारीत कांदा साठवणूक करण्यास सुरुवात करतात.
  • पुणे जिल्ह्यातील खेड, मंचर, शिरूर भागातील शेतकरी मोठय़ा प्रमाणावर साठवणूक करतात. पावसाळय़ात वखारीतील कांदा बाजारात विक्रीस पाठविला जातो.
  • गेल्या दोन ते तीन वर्षांपासून पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील पूर्व भागातील शेतकऱ्यांचा गरवी कांद्याच्या लागवडीकडे कल वाढला आहे.
  • लाल कांद्याच्या तुलनेत गरवी कांद्याची प्रतवारी चांगली असत़े  तसेच तो टिकाऊ असतो. त्यामुळे गरवी कांद्याला परराज्यातून चांगली मागणी असते, असे कांदा व्यापारी रितेश पोमण यांनी सांगितले.
हेही वाचा :  पुण्यातलं हे अपहरण प्रकरण स्पर्धां परीक्षांचा प्रश्न ठरु शकतं इतकं कॉम्पलिकेटेड; 6 जणांच्या अटकेनंतर खुलासा

The post उन्हाळी कांद्याच्या लागवडीत ३० टक्के वाढ appeared first on Loksatta.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …