अजित पवारांच्या नावे पुण्यात पुन्हा एकदा फसवणूक; पीएसोबत ओळख असल्याचं सांगत १० लाखाला गंडा


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वीय सहाय्यकांचं नाव सांगून जमीन व्यवहारात फसवणूक केल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा अशी एक घटना घडली आहे. माझी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पीएसोबत ओळख असल्याचे, सांगून पुण्यातील वारजे भागात राहणार्‍या एकाची १० लाख रूपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलिस स्टेशनमध्ये दोघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रविण विठ्ठल जगताप रा.वाई सातारा आणि एक अनोळखी अशा दोन आरोपींची नावे आहेत. त्यातील प्रवीण विठ्ठल जगताप यास अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे महापालिकेमार्फत विविध विकास कामे केली जातात. त्यापैकी ५ कोटी रुपयांचे बजेट लॉकिंग करून देतो, माझी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पीए मुसळे यांच्याशी ओळख आहे. तुमचे काम होऊन जाईल, असे आरोपी प्रवीण विठ्ठल जगताप आणि त्याच्या एका साथीदाराने फिर्यादी महेश पटवर्धन याला सांगितले.

त्यावर महेश पटवर्धन यांनी विश्वास ठेवला. त्यानंतर पटवर्धन यांनी आरोपीला १० लाख रुपये दिले. पण तो काही काम करत नाही.आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर आरोपी प्रवीण जगताप याला अटक केली असून अधिक तपास सुरू असल्याचे बंडगार्डन पोलिसांनी सांगितलं.

हेही वाचा :  कपाळ फोडून घेऊ का? सकाळपासून मरमर काम करतो अन्... अजित पवार शिक्षकांवर वैतागले

The post अजित पवारांच्या नावे पुण्यात पुन्हा एकदा फसवणूक; पीएसोबत ओळख असल्याचं सांगत १० लाखाला गंडा appeared first on Loksatta.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘हे वैचारिक दारिद्रयच, पंतप्रधान हिंदू-मुस्लिमांमध्ये द्वेष निर्माण करणारी भाषणे..’; ठाकरेंचा हल्लाबोल

Uddhav Thackeray Group On PM Modi Speechs: देशवासीयांना एकसंध ठेवण्याऐवजी केवळ मतांसाठी देशातील हिंदू व मुस्लिम …

Weather Forecast: मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा; ‘या’ भागात पडणार पाऊस

Maharashtra Weather Forecast Today : एप्रिल महिन्यापासून राज्यातील नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतोय. मुंबईतही …