कुठे पाहता येणार गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळा?

Golden Globe Awards 2023: गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्याला (Golden Globe Awards 2023) सुरुवात झाली आहे. हा पुरस्कार सोहळा भारतात 6:30 वाजल्यापासून स्ट्रीम केला जात आहे. या पुरस्कार सोहळ्याला आरआरआर  (RRR)  चित्रपटाच्या टीमनं हजेरी लावली आहे. 

कुठे होणार स्ट्रीम?
यंदा गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्याचे लाइव्ह-स्ट्रिमिंग करण्यात येणार आहे. त्याचा लाइव्ह प्रीमियर अमेरिकेत आज रात्री 10 जानेवारी रोजी रात्री 8 वाजता होणार आहे. तर भारतात या पुरस्कार सोहळ्याचे प्रीमियर 11 जानेवारी रोजी सकाळी 6:30 वाजता होणार आहे. भारतातील प्रेक्षक Lionsgate Play वर हा पुरस्कार सोहळा पाहु शकता. 

होस्ट
जेरॉड कारमाइकल हे प्रथमच गोल्डन ग्लोब पुरस्काराचे होस्टिंग करणार आहेत.  नेबर्समध्ये या 2014 च्या कॉमेडी चित्रपटामुळे  जेरॉड कारमाइकलला प्रसिद्धी मिळाली.   

news reels

आरआरआरची टीम गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर 

नामांकन यादी 

‘आरआरआर’ या ब्लॉकबस्टर चित्रपटाला गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यामध्ये दोन नामांकने मिळाली आहेत. एसएस राजामौली यांच्या चित्रपटाला ‘नाटू-नाटू’ गाण्याला या सुपरहिट गाण्यासाठी मोशन पिक्चरमधील बेस्ट ओरिजिनल सॉन्ग आणि  बेस्ट पिक्चर (नॉन-इंग्लिश) नामांकन मिळाले आहे. 

हेही वाचा :  केस न कापण्याच्या शिझानच्या मागणीवर जेल अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया; म्हणाले...

Golden Globe Awards 2023: कौतुकास्पद! सर्वोत्कृष्ट ओरिजिनल साँग कॅटेगिरीमधील गोल्डन ग्लोब पुरस्कार आरआरआरमधील ‘नाटू नाटू’ नं पटकावला

 

बेस्ट ड्रामा सीरीज
1.बेटर कॉल शाऊल
2.द क्राउन
3.हाउस ऑफ द ड्रैगन
4.ओजार्क
5. सेवरेंस (Severance)

बेस्ट अॅक्ट्रेस टीव्ही ड्रामा सीरिज
1.एम्मा डी आर्सी- हाउस ऑफ द ड्रैगन
2.जेंडया- यूफोरिया (Euphoria)
3.हिलेरी स्वँक- अलास्का डेली
4.इमेल्डा स्टॉन्टन- द क्राउन
5. लॉरा लिनी- ओजार्क

बेस्ट अॅक्टर टीव्ही ड्रामा सीरिज
1.जेफ ब्रिज- द ओल्ड मॅन केविन
2.एडम स्कॉट- सेवरेंस (Severance)
3.बॉब ओडेंकिर्क- बेटर कॉल शाऊल 
4.कोस्टनर- येलोस्टोन
5.डिएगो लूना- अँडोर

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Entertainment News Live Updates 11 January : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत… मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

 

 

 Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …