आलियाने जेवण न सोडता केले ६ महिन्यात २० किलो वजन कमी, ऋजुता दिवेकर डाएट

आलियाचे वजन इंडस्ट्रीत येण्यापूर्वी खूप जास्त होते. मात्र अभिनेत्री बनण्याचे स्वप्न आणि योग्य डाएट हेल्थसाठी अधिक उपयुक्त ठरते या विश्वासाने आलियाने ६ महिन्याने २० किलो वजन कमी केल्याचे एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. यासाठी आलियाने अत्यंत साधे डाएट फॉलो केले आणि त्याच्या जोडीला व्यायामही केला.

आलियाने आपल्या रोजच्या जेवणात नक्की काय बदल केले आणि कशी Fat To Fit झाली याबाबत आज आपण जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – @aliaabhatt and @rujuta.diwekar Instagram, Freepilk.com)

ब्रेकफास्टमध्ये काय खावे

ब्रेकफास्टमध्ये काय खावे

आलियाचे वजन चित्रपटात येण्याआधी ६८ किलो होते. तिने पदार्पण करण्यापूर्वी वजन कमी केले आणि नंतर मेंटेनही केले. आलियाने याआधी आपले डाएट एका मुलाखतीत सांगितले होते. तिच्या नाश्त्यामध्ये भरपूर प्रमाणा अँटीऑक्सिडंट्स असून ती सीझनल फळांवर भर देते. दिवसाची सुरूवात हर्बल कॉफीने करून without sugar ही कॉफी आलिया पिते. यानंतर पोहे, ऑम्लेट, कॉर्नफ्लेक्स, ब्रेड टोस्ट, फळे यासारखा नाश्ता ती करते.

हेही वाचा :  Ranbir Alia Wedding : रणबीर कपूरनंतर आलिया भट्टनेही लग्नाच्या बातमीला दिला दुजोरा! म्हणाली ‘हे

मिड मॉर्निंग ब्रेकफास्ट

मिड मॉर्निंग ब्रेकफास्ट

आलियाने सांगितले होते की, भाज्यांचा रस ती सकाळी भूक लागल्यानंतर मिड मॉर्निंगला पिते. तसंच यासह इडली-सांबार, डोसा यासारखा नाश्ता खाण्याला आलिया प्राधान्य देते.

(वाचा – How To Lose Weight: ३०० किलो वजनाच्या माणसाने केले १६५ किलो वजन कमी, आजीच्या एका शब्दासाठी घेतली मेहनत)

ऋजुताने दिलेले डाएट करते फॉलो

ऋजुताने दिलेले डाएट करते फॉलो

इंडिया डॉट कॉमने दिलेल्या जुन्या वृत्तानुसार, आलिया उन्हाळ्यात ज्वारी, पावसाळ्यात नाचणीची आणि हिवाळ्यात बाजरीची भाकरी खाते. तर त्याशिवाय ऑर्गेनिक दूध, लस्सी, ताक हे तिचे आवडते पदार्थ असून जेवणातही त्याचा समावेश करते. यासह दुपारी जेवणात डाळ, पोळी, भाजीही याचाही समावेश असतो. यामध्ये तेलाचा बहुदा वापर करण्यात येत नाही. तर संध्याकाळच्या वेळात साखरेशिवाय कॉफी आलिया पित होती.

(वाचा – Weight Loss: रोज अर्धा तास व्यायाम की १० हजार पावलं चालणे, वजन कमी करण्यासाठी काय योग्य )

वजन नियंत्रणात राखण्यासाठी ऋजुता दिवेकरचे डाएट

रात्रीच्या वेळी हलके जेवण

रात्रीच्या वेळी हलके जेवण

आलियाने वजन कमी करण्यासाठी रात्रीच्या वेळी हलक्या जेवणाचा फॉर्म्युला वापरला होता. यामध्ये चिकन, भात, डाळ, पोळी आणि भाजीचा समावेश असून तेलकट पदार्थांचा अजिबातच यामध्ये समावेश करण्यात आला नव्हता.

हेही वाचा :  Google Most Searched Asians 2022 : आलिया, दीपिका पडल्या मागे, Katrina Kaif ठरली सर्वाधिक सर्च

(वाचा – पोटातील आतड्यांमधील घाण काढून फेकते बाहेर, तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्याचे आरोग्यासाठी फायदे )

७-८ वेळा थोडे थोडे खाणे

७-८ वेळा थोडे थोडे खाणे

आलिया भटने वजन कमी करण्यासाठी वर्कआऊट, पिलेट्ससह या डाएट प्लॅनचा आधार घेतला होता. लो कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन जास्त असणारे डाएट तिने फॉलो केले आणि अजूनही आलिया हेच डाएट फॉलो करत आहे. यमाध्ये फळं, दही, सलाड इत्यादीचा समावेश आहे. दिवसातून ७ ते ८ वेळा थोडे थोडे खाण्याची सवय आलियाने ठेवली. मात्र या दरम्यान पदार्थांची क्वान्टिटी कमी होती.

घरी बनविण्यात आलेली दालखिचडी, दही भात, तूप भात यासह भाजी खाऊन आलियाने आपल्या वजनावर नियंत्रण ठेवले आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …