करिअर

शिक्षणात एचसीएल, टीआयएसएसची मदत घेणार- शिक्षणमंत्री

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई‘विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. यामुळे प्रत्येक शाळेत सर्वगुणसंपन्न विद्यार्थी घडविण्यासाठी एचसीएल, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (टीआयएसएस) या संस्थांसोबत करार करण्यात आला आहे. सरकारकडून प्रामुख्याने इंग्रजी, गणित, विज्ञान या विषयांवर अधिक भर दिला जात असून, कौशल्य आणि तंत्रज्ञानावर आधारित शिक्षणासाठी या संस्थांची मदत घेतली जाणार असल्याचे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी नमूद केले. …

Read More »

फेसबुकनंतर आता Amazonमध्ये नोकर कपात! ३,५०० कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार

Recession2k22: फेसबुकची मूळ कंपनी मेटाने मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपातीची घोषणा केली. त्यानंतर आता च्या घोषणेनंतर आता अॅमेझॉननेही कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यास सुरुवात केली आहे. बिझनेस टुडेच्या रिपोर्टनुसार, ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉनमध्ये काम करणारे सॉफ्टवेअर इंजिनियर जेमी झांग यांनी एका लिंक्डइन पोस्टमध्ये दावा केला आहे. त्यानुसार अनेक कर्मचाऱ्यांना कंपनीतून काढून टाकण्यात आले आहे.ॲमेझॉनच्या एका माजी कर्मचाऱ्याच्या पोस्टमध्ये असेही म्हटले आहे की, संपूर्ण रोबोटिक्स …

Read More »

चिमुरड्यांसाठी आनंदाची बातमी, बालवाड्याच्या अभ्यासक्रमासंदर्भात महत्वाचा निर्णय

म. टा. प्रतिनिधी, पिंपरीपिंपरी-चिंचवड शहरातील सर्व बालवाड्यांमध्ये आता एकच अभ्यासक्रम असणार आहे. बालवाडी शिक्षणामध्ये एकवाक्यता असावी, सर्वांना हसत खेळत शिक्षण मिळावे हा यामागील हेतू आहे. त्यासाठी ‘आकांक्षा फाउंडेशन’, ‘विपला फाउंडेशन’, राज्य सरकारच्या ‘आकार’ आणि ‘ग्राममंगल’ यांच्यातर्फे अभ्यासक्रमाची आखणी करण्यात आली असून, उपक्रमशील शिक्षकांचा आणि सामाजिक संस्थांची मदत घेतली जाणार आहे. या संदर्भातील बैठक शुक्रवारी महापालिकेच्या चिंचवड स्टेशन येथील शाळेत पार …

Read More »

Children’s Day Speech 2022: बालदिनी शाळेत अशा प्रकारे द्या भाषण, होईल टाळ्यांचा कडकडाट

Children’s Day: दरवर्षी १४ नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा केला जातो. या विशेष दिवशी शाळांमध्ये भाषण स्पर्धा आयोजित केल्या जातात. तुम्ही तुमच्या शाळेत बालदिनानिमित्त भाषण देण्याचा विचार करत असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. आज या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला बालदिनानिमित्त एक उत्तम भाषण कसे देऊ शकतो हे सांगणार आहोत, जे ऐकल्यानंतर संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा कडकडाट होईल. परिचयाने भाषणाची सुरुवात स्पर्धेच्या एक …

Read More »

PhD Rules: ‘पीएच. डी’च्या नियमांत बदल

Authored by Harsh Dudhe | Edited by Pravin Dabholkar | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 12 Nov 2022, 10:40 am PhD Rules:आतापर्यंतच्या नियमांनुसार पदव्युत्तर पदवी मिळाल्यानंतर, विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षा, एमफिल आणि नेट-सेट परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर मुलाखत देऊन, पीएच. डी.ला प्रवेश मिळवता येत होता. मात्र, नव्या शैक्षणिक धोरणानुसार चार वर्षांचा आणि आठ सत्रांचा पदवी अभ्यासक्रम किमान ७५ टक्के गुणांसह किंवा पदवीनंतर एक …

Read More »

Bigg Boss 16: कोण आहे शिव ठाकरे? न्यूजपेपर, दूध विकून केली करिअरची सुरुवात

Shiv Thackeray career : सलमान खानचा शो बिग बॉस १६ आपल्या रोमांचक वळणावर आहे. यामध्ये बिग बॉस मराठी सीझन २ चा विजेता शिव ठाकरे देखील प्रेक्षकांचे लक्ष आपल्याकडे खेचून घेत आहे. शिव अगदी सुरुवातीपासूनच चांगला खेळ खेळताना दिसतो. अलीकडेच शिव आणि अर्चना गौतम यांच्यात मोठी भांडण झाली. प्रेक्षक अजूनही स्पर्धकांचा खेळ समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान शिव ठाकरे कोण …

Read More »

Success Story: रिक्षा चालकाच्या मुलाने रचला इतिहास, परिस्थितीवर मात करत बनला सर्वात तरुण IAS

Success Story: केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ची नागरी सेवा परीक्षा (CSE) ही केवळ भारतातीलच नव्हे तर जागतिक स्तरावरील सर्वात आव्हानात्मक भरती परीक्षांपैकी एक आहे. अनेकांना ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अनेक वर्षे लागतात. पण जालन्यातील तरुणाने अवघ्या वर्षांमध्ये हा कारनामा करुन दाखविला आहे. अन्सार शेख हा इतक्या कमी वयात परीक्षा उत्तीर्ण करणारा आणि आयएएस बनणारा सर्वात तरुण ठरला आहे. त्याची संघर्ष …

Read More »

स्थलांतरित विद्यार्थ्यांसंदर्भात शालेय शिक्षण विभागाचा महत्वाचा निर्णय

म. टा. प्रतिनिधी, नाशिकस्थलांतरित झालेल्या विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्याचे नियोजन शालेय शिक्षण विभागामार्फत करण्यात आले असून, २० नोव्हेंबर ते ५ डिसेंबरदरम्यान हा उप्रकम राबविला जाणार आहे. या सर्वेक्षणादरम्यान बाहेरच्या गावातून शहरात स्थलांतरित झालेले विद्यार्थी निदर्शनास आल्यास, त्यांना विद्यार्थ्यांना शाळांमध्ये प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती जि. प. शिक्षण विभागामार्फत देण्यात आली. साधारणत: दिवाळी संपल्यानंतर विविध कुटुंबे कामाच्या शोधानिमित्त घराबाहेर पडतात. रोजंदारीवर काम …

Read More »

SET Exam: ‘सेट’ परीक्षा २६ मार्चला होणार

म. टा. प्रतिनिधी, पुणेसहायक प्राध्यापक पदाला पात्र होण्यासाठी घेण्यात येणारी महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) २६ मार्च २०२३ रोजी घेण्यात येणार आहे. यासाठीची अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, विद्यार्थी ३० नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात, अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रशासनाने दिली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मान्यतेने राज्य सरकारच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे महाराष्ट्र व …

Read More »

परदेशात शिक्षण घ्यायचंय? काळजी कसली करता, एकलव्य आहे ना…!

नागपूर : भारतात वंचित घटकातून येत असलेल्या पहिल्या पिढीतील विद्यार्थ्यांना आजही शिक्षणासाठी संघर्ष करावा लागतो. वंचित घटकातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची संधी ‘एकलव्य संस्थे’च्या माध्यमातून आता मिळणार आहे. विशेष म्हणजे हे सर्व मार्गदर्शन मोफत असून, अशाच वंचित घटकातून उच्च शिक्षण पूर्ण केलेले मार्गदर्शक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. देशभरातील, वंचित समूहातील जे विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊ इच्छितात, …

Read More »

पालिकेच्या शाळांमध्ये माध्यमिकचे शिक्षण, हजारो गरीब विद्यार्थ्यांना होणार फायदा

म. टा. प्रतिनिधी, मुंबईमहापालिकेच्या ९२ शाळांमध्ये माध्यमिकचे वर्ग सुरू करण्याची परवानगी राज्य सरकारकडून मिळाली आहे. त्यामुळे आता पालिकेच्या शाळेतही नववी आणि दहावीचे वर्ग सुरू होणार आहे. या निर्णयाचा सर्वसामान्य कुटुंबांतील विद्यार्थ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे. त्यामुळे आठवीनंतर पालकांना शिक्षणासाठी खासगी शाळांमध्ये मोजाव्या लागणाऱ्या हजारो रुपयांच्या फीमधून सर्वसामान्यांची सुटका होणार आहे. मात्र या माध्यमिकच्या वर्गांपैकी सुमारे ७२.८ टक्के वर्ग हे …

Read More »

National Education Day का साजरा केला जातो? काय आहे महत्व? जाणून घ्या

National Education Day 2022: राष्ट्रीय शिक्षण दिन दरवर्षी ११ नोव्हेंबर रोजी देशात साजरा केला जातो. हा दिवस भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. देशातील विद्यार्थ्यांसाठी हा दिवस महत्वाचा आहे. त्यामुळे या दिवशी विद्यार्थी विविध खेळ, स्पर्धांच्या माध्यमातून हा दिवस साजरा करतात. सोबतच मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या आठवणींना उजाळा देतात. या दिवशी विद्यार्थ्यांकडून आपल्या …

Read More »

राष्ट्रीय शिक्षण दिन विशेष: जाणून घेऊ देशाच्या पहिल्या शिक्षणमंत्र्याविषयी

National Education Day 2020: भारतात दरवर्षी ११ नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय शिक्षण दिन (National Education Day) म्हणून साजरा केला जातो. देशाचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद (Maulana Abul Kalam Azad) यांचा ११ नोव्हेंबर हा जयंती दिन आहे. ११ नोव्हेंबर २००८ पासून हा दिवस राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय तत्कालीन केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाने घेतला होता. मौलाना आझाद यांचे …

Read More »

मंदीच्या काळातही तुमची नोकरी राहील सुरक्षित, फक्त ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात

Authored by Pravin Dabholkar | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 11 Nov 2022, 9:48 am Recession2k22: जागतिक मंदीचा कालावधी हा कमी असेल आणि त्याचा परिणाम कमी असेल असे जगातील आणि भारतातील सीईओंचे मत आहे. पण भविष्यात येणाऱ्या संकटांबद्दल आत्ताच काहीही सांगता येत नाही आणि त्यासाठी आपण आधीच तयारी केलेली बरी. या लेखाद्वारे काही खास टिप्स जाणून घेऊया, ज्याचा वापर करून तुम्ही …

Read More »

Success Story: लहानपणी वडील वारले तर आई विडी कारखान्यात मजूर, यूट्यूबवर शिकून हरिका बनली डॉक्टर

Success Story: ध्येय पक्क असेल आणि आपल्या मेहनतीवर विश्वास असेल तर प्रत्येक व्यक्ती आपली स्वप्ने पूर्ण करतो. अनेक संकटे मागे टाकून ती यशाच्या मार्गावर पुढे जात राहते. निजामाबाद जिल्ह्यातील नंदवाडा येथील रहिवासी असलेल्या हरिकाने हे सिद्ध केले आहे. तिने यूट्यूब व्हिडिओच्या मदतीने एमबीबीएसची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. तिची आई विडी कारखान्यात मजूर आहे. हरिकाने आपल्या मेहनतीच्या आणि झोकून देऊन प्रयत्न …

Read More »

टिम इंडियाचा फिनिशर हार्दिक पांड्याचे शिक्षण फारच कमी, ऐकून तुम्हाला विश्वास नाही बसणार

Hardik Pandya Education: टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) मूळचा गुजरातचा आहे. त्याने लहानपणापासूनच क्रिकेट खेळायला सुरुवात केली. आधी फक्त त्याचा मोठा भाऊ कृणाल पंड्या क्रिकेट खेळत असे, त्यानंतर कोचच्या सांगण्यावरून हार्दिकनेही प्रशिक्षण सुरू केले. क्रिकेटला आपले जीवन बनवण्यासाठी हार्दिकने शाळा आणि अभ्यासाला रामराम केला होता. भारतीय क्रिकेट संघाचा प्रसिद्ध खेळाडू हार्दिक पंड्याची शैक्षणिक कारकिर्दिविषयी (Hardik Pandya …

Read More »

PET Exam: उशिराने मिळाले ‘पेट’चे पेपर, परीक्षा केंद्रांवर गोंधळ

म. टा. प्रतिनिधी, नागपूरराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या एमफिल आणि पीएचडीकरिता घेण्यात आलेल्या प्रवेशपरीक्षेत बुधवारी गोंधळ उडाला. काही परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना एक ते सव्वा तास उशिराने पेपर मिळाल्याने परीक्षेचे नियोजन ढासळल्याचे प्रकार घडले. याशिवाय, विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींचाही सामना करावा लागला. पाच विद्याशाखांमधील एकूण ६७ विषयांमध्ये ही परीक्षा ९ आणि १० नोव्हेंबर रोजी घेण्यात येते आहे. बुधवारी सकाळी १० वाजता या …

Read More »

NEET Merit List Tampered: होतकरु विद्यार्थ्यांना डावलून अधिकाऱ्यांनी स्वत:च्या मुलांना दिला प्रवेश

NEET Admission 2022: वैद्यकीय महाविद्यालयांमधील नीट प्रवेशांसंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. देशातील विविध आयुष महाविद्यालयांमध्ये प्रवेशाच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केला जात असल्याचे उघडकीस आले आहे. नीट २०२२ च्या गुणवत्ता यादीतून होतकरू आणि गुणवंत विद्यार्थ्यांची नावे काढून टाकून, कमी गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात असल्याचे समोर आले आहे. हा गोंधळ पाहता NEET मेरिटमध्ये समाविष्ट असलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी बुधवारी …

Read More »

DRDO Job 2022: डीआरडीओमध्ये हजारो पदांसाठी बंपर भरती, येथे पहा तपशील

DRDO Recruitment: डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (Defense Research and Development Organization, DRDO) ने प्रशासन आणि सहयोगी (A&A) संवर्गाच्या १,०६१ रिक्त पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्यास पात्र आणि स्वारस्य असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. DRDO Recruitment 2022: रिक्त जागांचा तपशील एकूण पदे- १०६१ शैक्षणिक पात्रता सर्व पदांसाठी अर्ज करण्याची शैक्षणिक पात्रता वेगळी …

Read More »

अखेर ज्याची भीती होती तेच घडलं! ‘मेटा’मध्ये ११ हजार कर्मचाऱ्यांना नारळ!

वृत्तसंस्था, न्यूयॉर्कएलन मस्क यांनी ट्विटरमध्ये केलेल्या कर्मचारी कपातीपाठोपाठ आता फेसबुकची पालक कंपनी असलेल्या ‘मेटा’ने ११ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करीत असल्याची घोषणा बुधवारी केली. आतापर्यंतची ही सर्वांत मोठी नोकरकपात आहे. ‘मेटा’मधील कर्मचाऱ्यांची सप्टेंबरअखेरपर्यंतची संख्या ८७ हजार होती. सर्व तंत्रज्ञान कंपन्या नोकरकपात करीत असताना ‘मेटा’नेही तोच पर्याय स्वीकारला आहे. नोकरकपातीचा अर्थ काय आहे हे लवकरच कर्मचाऱ्यांना मेलद्वारे कळविले जाईल’, असे सांगण्यात …

Read More »