टिम इंडियाचा फिनिशर हार्दिक पांड्याचे शिक्षण फारच कमी, ऐकून तुम्हाला विश्वास नाही बसणार

Hardik Pandya Education: टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) मूळचा गुजरातचा आहे. त्याने लहानपणापासूनच क्रिकेट खेळायला सुरुवात केली. आधी फक्त त्याचा मोठा भाऊ कृणाल पंड्या क्रिकेट खेळत असे, त्यानंतर कोचच्या सांगण्यावरून हार्दिकनेही प्रशिक्षण सुरू केले. क्रिकेटला आपले जीवन बनवण्यासाठी हार्दिकने शाळा आणि अभ्यासाला रामराम केला होता. भारतीय क्रिकेट संघाचा प्रसिद्ध खेळाडू हार्दिक पंड्याची शैक्षणिक कारकिर्दिविषयी (Hardik Pandya Education Details) जाणून घेऊया.

हार्दिक पांड्याचा जन्म ११ ऑक्टोबर १९९३ रोजी गुजरातमधील चोरायसी येथे झाला. त्याचे वडील हिमांशू पंड्या कार फायनान्सचा छोटासा व्यवसाय करतात. आई नलिनी पंड्या या गृहिणी आहेत. त्याचा भाऊ कृणाल पांड्या हा टीम इंडियाचा स्टार खेळाडू आणि लखनऊ सुपर जायंट्सचा उपकर्णधार आहे. दोन्ही भावांना लहानपणापासूनच क्रिकेट खेळण्याची खूप आवड आहे.

हार्दिक पांड्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. त्याचा मोठा भाऊ कृणाल पंड्या क्रिकेट खेळायला जायचा आणि हार्दिक त्याच्यासोबत मैदानावर मजा करायला जायचा. कृणालचे प्रशिक्षक किरण मोरे यांच्या सल्ल्याने हार्दिकनेही क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. पहिली तीन वर्षे त्याने कोचिंग फीही घेतली नाही. दिवसभर मॅगी खाऊन दोन्ही भाऊ जमिनीवर सराव करायचे.

हेही वाचा :  IPL 2022, GT vs DC Match LIVE Updates : गुजरात आणि दिल्ली सामन्याचं लाईव्ह अपडेट्स

Virat Kohli Education: शिक्षणात राहिला कच्चा पण क्रिकेटविश्वात ‘विराट’, कोहलीचं शिक्षण माहितेय का?
हार्दिक पांड्याला लहानपणापासून अभ्यासात फारसे काही वाटत नव्हते. आपल्याला फक्त क्रिकेटवर लक्ष केंद्रित करायचे आहे, नववीमध्ये असताना आपल्या घरच्यांना सांगितले होते. अनेक मीडिया रिपोर्टनुसार हार्दिक पांड्या नवववीची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकला नाही. म्हणूनच त्याची शैक्षणिक पात्रता केवळ आठवी उत्तीर्ण इतकीच सांगितली जाते.

पांड्याला शिक्षणात आपला सूर गवसला नाही. असे असले तरीही त्याने क्रिकेटवरची निष्ठा ढळू दिली नाही. हे दिसतं तितकं सोपं नव्हतंच. नियमित सराव, खेळामध्ये बदल, सातत्य राखण्यासाठी त्याला मेहनत घ्यावी लागली हे युवा पिढीने लक्षात ठेवायला हवे.

टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा कितवी शिकलाय माहितेय का? ऐकून तुम्हालाही वाटेल आश्चर्य
टीम इंडियामध्ये खेळण्याव्यतिरिक्त, हार्दिक पांड्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून देखील खेळतो आणि त्याचे विविध कंपन्यांशी ब्रँड एंडोर्समेंट डील देखील आहेत. हार्दिक आणि त्याचा मोठा भाऊ कृणाल पंड्या बालपणाच्या अडचणीच्या दिवसांमध्ये ४०० ते ५०० रुपये कमवण्यासाठी जवळच्या गावात क्रिकेट खेळायचे. हार्दिकला सामन्यासाठी ४०० रुपये आणि कृणालला ५०० रुपये मिळत होते.

हेही वाचा :  विद्यार्थी-पालकांना मोठा दिलासा; परीक्षा संपताच शाळांना सुट्टी

हार्दिक पांड्याने 2020 मध्ये लॉकडाऊन दरम्यान सर्बियन मॉडेल नतासा स्टॅनकोविक सोबत लग्न केले. त्यांना अगस्त्य नावाचा मुलगाही आहे. नतासा एक सर्बियन अभिनेत्री, मॉडेल आणि नृत्यांगना आहे. गेल्या काही वर्षांपासून ती मुंबईत राहते. प्रकाश झा यांच्या ‘सत्याग्रह’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यात ती अजय देवगणसोबत एका गाण्यात दिसली होती.
आर्थिक परिस्थितीमुळे अर्धवट सोडले होते कॉलेज, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिक्षण किती? जाणून घ्या

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …