इजिप्तच्या मातीत सापडल्या 5000 वर्ष जुन्या वाईनच्या बाटल्या! पाहा कशा दिसतात…

Egyptian Wine Bottles: आपल्या जगात असे अनेक रहस्यं आहेत ज्यांच्याबद्दल अद्यापही आपल्यालाही काहीच कल्पना नाही. परंतु या जगात अशी अनेक रहस्यं आहेत. ज्यांचा शोध लागणे बाकी आहे आणि सोबतच अशी अनेक रहस्ये ही समोरही येत आहेत. इजिप्तच्या देशातून अशाच काही रहस्यमयी गोष्टींचा शोध लागला आहे. ज्यांच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. 

वियना या विश्वविद्यालयाच्या पुढाकारानं हा शोध लागला आहे. यावेळी या कॉलेजच्या पुरातत्वशास्त्रज्ञ क्रिस्टियाना कोहलर यांच्या नेतृत्वातून हा शोध लागला आहे. जर्मनी आणि ऑस्ट्रियाच्या रिसर्चरच्या एका टीमनं मिस्त्रच्या पहिला महिला फिरॉन क्वीन मेरेट-नीथ (Queen Meret-Neith) हिची कबर शोधली आहे. खोदकामाच्या दरम्यान त्यांना 5000 वर्षे जुन्या वाइनच्या सीलजार सापडल्या आहेत. याद्वारे आता आणखीनं नवनवीन शोध लागू शकतात. 

वियना विश्वविद्यालयाच्या अनुसार, यावेळी शेकडो दारूच्या बाटल्या आणि जार सापडले असून त्यासोबतच अजून अनेक गोष्टीही सापडल्या आहेत. हे सर्व एका पेटाऱ्यात बंद होते. याला एका पेटाऱ्यात पॅक करून ठेवले होते. एवढेच नाही तर हे सर्व व्यवस्थित बंद करून ठेवले होते. हे सर्व 5000 वर्ष जुन्यादारूच्या बाटल्या आहेत. 

हेही वाचा :  मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाची मोठी कारवाई! वर्षभरात तब्बल 86 व्यक्तींचा वाचवला जीव

यावेळी या सापडलेल्या दारूच्या बाटल्यांमुळे अनेक गोष्टी समोर येऊ शकतात. पण तुम्ही म्हणाल की वर तर एका राणीची कबर मिळाली होती मग आता हे काय नवीन? आता आपण त्या राणीबद्दल जाणून घेणार आहोत. शिलालेखानुसार, क्वीन मेरेट-नीथ हिच्याबद्दल बरेच काही लिहिण्यात आले आहे. त्यांनी आपल्या राजकारणातही बरेच तेव्हा महत्त्वाचे बदल केले होते. तेव्हा आपण या राणीबद्दल जाणून घेणार आहोत. 

क्विन मेरेट-नीथ ही अशी एक एकमेव महिला होती ज्याची भली मोठी कबर ही मिस्त्र येथील पहिल्या शाही कब्रिस्तान एबिडोसमध्ये होती. त्या आपल्या काळात सर्वात शक्तिवान महिला होत्या. असं म्हणतात की, 18व्या राजवंश रानी हत्शेपसट यांच्या आधी त्या होत्या. 

यापुर्वी पश्चिम तुर्कीत प्राचीन शहर ऐजानोई येथे काम करणाऱ्या पुरातत्वशास्त्रज्ञ यांना 2000 वर्षांपुर्वीचे कॉस्मॅटिक्स मिळाले होते. त्यांना तर असेही एक दुकान मिळाले ज्यात ज्वेलरी, परफ्यूम, मेकअप अशा बऱ्याच गोष्टी होत्या. 

त्यांना एका रोमन डिपोर्टमेंटचे अवशेषही मिळाले होते. त्यावरून त्यावेळी रोमन महिलांच्या सौंदर्याची, रूपाची आणि जीवनशैलीची एक थोडी कल्पना आपल्याला येऊ शकते. त्यावेळी त्यांना यातून नेकलेस, हेअरपिन आणि मोतीही मिळाले होते. त्यातून अत्तरही सापडली होती. ज्यासाठी तेव्हा कंटेनर होते. 

हेही वाचा :  "महाराष्ट्र कर्नाटक सीमाभाग केंद्रशासित करा"; मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यावरुन टीका करत उद्धव ठाकरे यांची मागणी



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

राणेंनी मंत्रीमंडळात काय दिवे लावले? राऊतांचा सवाल; राज ठाकरेंना म्हणाले, ‘वकिली करणाऱ्यांनी..’

Sanjay Raut Slams Narayan Rane Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी …

‘राज ठाकरेंचे देव बदलू शकतात, ते नकली अंधभक्त! त्यांनी वेळ काढून..’; राऊतांचा टोला

Sanjay Raut On Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्मा सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नकली अंधभक्त आहेत, असा टोला …