Year Ender 2022: म्हाताऱ्यांचा इमरान हाश्मीपासून पापा की परीपर्यंत नेटकऱ्यांना हसवणारे Top 10 Video

Trending Funny Video 2022 : ज्या एक वर्ष सरतं आणि नवीन वर्षांचं आपण स्वागत करण्यासाठी तयार असतो. तेव्हा अनेक जण या वर्षात म्हणजे 2022 मध्ये काय काय घडलं याचा विचार करतो. अशावेळी डोळ्यासमोर जणू सगळ्या गोष्टींचा फ्लॅशबॅक होतो. सोशल मीडियावरही अनेक व्हिडिओ यावर्षी ट्रेडिंग झाले. यावेळी 2022 सोशल मीडियावर नेटकऱ्यांना हसवणारे Top 10 Video एक नजर टाकूयात. (Year Ender 2022 TOP 10 Trending Funny Video on Social media)

म्हाताऱ्यांचा इमरान हाश्मी!

भररस्त्यात एक म्हातारा धावत्या बाईकवर महिलेला चुंबन घेतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. नेटकऱ्यांनी या वृद्ध व्यक्तीला म्हाताऱ्यांचा इमरान हाश्मी अशी उपमा दिली होती. 

जीवापेक्षा मोबाईल महत्वाचा

सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत दिसंतय की एक मुलगी मोबाईलवर बोलत रेल्वे रुळ ओलांडतेय. ती मोबाईलवर बोलण्यात इतकी व्यस्त असते की तिला समोरून येणारी ट्रेन दिसलीच नाही. पण ती सावध होते आणि रेल्वे रुळावर झोपून घेते. यानंतर संपूर्ण ट्रेन तिच्या अंगावरुन जाते. पण यानंतर जे घडतं ते जास्त धक्कादायक आहे. 

पापा का परा 

जेव्हा एखादी तरुणी गाडी चालवताना चुकते तेव्हा ती सोशल मीडियावर पापा की परी या नावाने व्हायरल होते. पण जेव्हा एखाद्या तरुण गाडी चालवताना चुकतो तेव्हा तो पापा का परा या नावाने व्हायरल होता. पेट्रोल पंपवर रांगेत उभे असताना बाईकवरील ताबा सुटतो आणि बाईक इतर गाड्यांना धडकते. 

चाँद नवाबनंतर ‘हा’ रिपोर्टर व्हायरल

हत्ती हा सर्वात बुद्धिमानप्राण्यांपैकी एक प्राणी. हत्ती अत्यंत संवेदनशील देखील असतो. या व्हिडिओमध्ये जो रिपोर्टर आपल्याला पाहायला मिळतोय तो वन्यजीव ट्रस्टबाबत माहिती सांगताना पाहायला मिळतो. हा रिपोर्टर आपलं रिपोर्टींग सुरु करतो. काही लाईन्स बोलतो तोवर सगळं ठीक असतं.अगदी काहीच वेळात एक छोटा हत्ती या रिपोर्टर जवळ येतो आणि तिथेच हा व्हिडीओ प्रचंड विनोदी होतो. आधी तुम्ही हा व्हायरल व्हिडीओ पाहा. 

बापरे! एकाच रिक्षात 27 प्रवासी

रिक्षातून पोलिसांनी जेव्हा प्रवाशांना बाहेर यायला सांगितलं, तेव्हा दोन तीन किंवा पाच नाही तर चक्क 27 लोक बाहेर आले. 27 लोक एकाच रिक्षात कसे बसले असतील असा प्रश्न आता तुम्हालाही पडलाच असेल. पण चक्क 27 लोक या रिक्षातून बाहेर आल्याचं पाहून पोलीस हैराण झाले. सोशल मीडियावर उत्तर प्रदेश पोलिसांनी शेअर केला होता. 

हेही वाचा :  तलाठी भरतीनं राज्य सरकारच्या तिजोरीत पैशांचा पाऊस, अर्ज शुल्कातून मिळाली 'इतक्या' कोटींची रक्कम

मुलीने शिकवली अद्दल

मुलीसमोर एक मुलगा बाईकवर स्टाईल मारायला गेला आणि रस्त्याचा कडेला जाऊन आपटला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

विकेटचा प्रो मॅक्स स्लो मोशन Video

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, गल्ली क्रिकेट खेळताना एक खेळाडू बॉल नाही म्हणून एका चिमुकल्याचा बॉल म्हणून वापर करतो. थांबा इथेच हसायला सुरुवात करु नका. पुढे जे होतं ते यापेक्षी भन्नाट आहे. फलंदाज आऊट होतो आणि तो अपायरला रिव्ह्यू मागतो. आता या गल्ली क्रिकेटमध्ये कुठे आला कॅमेरा आणि बाकी टेक्निकल गोष्टी…पण तरीही यात जी भन्नाट आयडिया शोधण्यात आली ते पाहून तुम्ही अवाक् व्हाल. क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच भन्नाट किस्सा घडला आहे. 

Ice cream साठी चिमुरडी रडली

या लहान मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. लहान मुलीसोबत प्रँक करण्यात आला आणि ती रडायला लागली, नेटकऱ्यांना हा व्हिडिओ तुफान आवडला होता. 

बाईकवरील बंदर

हा व्हिडिओ तर खूप मजेदार होतो. या व्हिडिओमध्ये बंदर एका बाईकवर बसला होता. त्याने बाईकच्या मिररमध्ये पाहिलं आणि काय…तो कंफ्यूज झाला स्व:तलाच पाहून तो गडबडला. 

Pakistani Girl च्या व्हायरल डान्सचं Mr. Bean फॅन

सोशल मीडियावर एखाद्या गोष्टीचा ट्रेंड (trend) आला की त्याचे रील्स आपल्याला पाहिला मिळतात.  लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या ‘मेरा दिल ये पुकारे आजा’ गाण्यावर अनेक रील्स सोशल मीडियावर आहेत. त्यातील पाकिस्तान मुलीचा व्हिडिओ (Pakistan girl video) हा सर्वात जास्त लोकप्रियक झाला. त्यानंतर आता मिस्टर बीन एक व्हिडिओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्रात अजब शिक्षक भरती; कन्नड भाषेच्या शाळेत 274 मराठी शिक्षकांची नियुक्ती

Sangali News : कन्नड आणि उर्दु शाळांमध्ये चक्क मराठी माध्यमिक शिक्षकांचे नियुक्ती करण्याचा अजब कारभार …

OTP कशासाठी वापरला? रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट होता का? निवडणूक अधिकाऱ्यांचा मोठा खुलासा

Ravindra Waikar :  मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातली निवडणूक वादाच्या भोव-यात सापडली आहे. शिवसेनेचे विजयी …