यूजीसी नेट परीक्षेत ५२ हजार उमेदवार यशस्वी

NTA UGC NET Result 2022: एनटीए यूजीसी नेट परीक्षेचा निकाल (NTA, UGC NET Result 2022) नुकताच जाहीर करण्यात आला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) घेतलेल्या परीक्षेत एकूण ५२ हजार उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) पदासाठी ४३७३० विद्यार्थ्यांना यश मिळाले आहे. तर जेआरएफच्या (Junior Reserch Fellowship, JRF) पदासाठी अर्ज करणारे ९१२७ उमेदवार यशस्वी झाले. या परीक्षेला एकूण ६.७ लाख उमेदवार बसले होते. परीक्षेसाठी एकूण १२ लाखांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली होती.

महत्वाची आकडेवारी

परीक्षेत नोंदणी केलेल्या उमेदवारांची संख्या- १२ लाख ६६ हजार ५०९

दोन्ही पेपरमध्ये उमेदवारांची संख्या- ६ लाख ७१ हजार २८८

फक्त असिस्टंट प्रोफेसरसाठी पात्र उमेदवारांची संख्या- ४३ हजार ७३०

जेआरएफ आणि सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्र उमेदवार – ९१२७

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये भरती, जाणून घ्या तपशील
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने अलीकडेच यूजीसी नेट परीक्षा डिसेंबर २०२० आणि जून २०२१ चे निकाल अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर जाहीर केले आहेत. ही परीक्षा एनटीएद्वारे देशभरातील २३९ शहरांमधील ८३७ केंद्रांवर १८ दिवसामध्ये ३ टप्प्यांत घेण्यात आली.

हेही वाचा :  अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत नर्सिंग ऑफिसर पदांची भरती

त्यानुसार पहिला टप्पा २० नोव्हेंबर २०२१ ते ५ डिसेंबर २०२१ या कालावधीत घेण्यात आला. दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा २४ डिसेंबर ते २७ डिसेंबर २०२१ या कालावधीत घेण्यात आली. याशिवाय, तिसरा टप्पा ४ जानेवारी ते ५ जानेवारी २०२२ दरम्यान आयोजित करण्यात आला होता.

Bank Job 2022: बँक ऑफ बडोदामध्ये भरती, मुंबईत नोकरीची संधी
UGC NET Result 2021: या स्टेप्स फॉलो करुन करा डाऊनलोड

स्टेप १: अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर जा.
स्टेप २: यूजीसी नेट डिसेंबर २०२० आणि जून २०२१ निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
स्टेप ३: अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख टाकून लॉग इन करा.
स्टेप ४: तुमच्या विषयाच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
स्टेप ५: निकाल डाउनलोड करा.
स्टेप ६: निकालाची प्रिंट काढा.

रत्नागिरी जिल्हा परिषदेत भरती, ७० हजार रुपयांपर्यंत मिळेल पगार
यूजीसी नेट डिसेंबर २०२० आणि जून २०२१ सत्र परीक्षा एनटीएने करोना प्रादुर्भावामुळे विलंबाने आयोजित केल्या होत्या. एजन्सीने २० नोव्हेंबर २०२१ ते ५ जानेवारी २०२२ या कालावधीत दोन्ही सत्रांच्या परीक्षा तीन टप्प्यांत घेतल्या होत्या.

हेही वाचा :  CSIR UGC NET Result 2021: यूजीसी नेट परीक्षेचा निकाल जाहीर

एनटीएकडून मिळेल प्रमाणपत्र
परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व उमेदवारांना राष्ट्रीय पात्रता चाचणी प्रमाणपत्र जारी केले जाईल. उमेदवार विविध ज्युनिअर रिसर्च फेलोशिप (JRF) किंवा विद्यापीठे किंवा इतर उच्च शिक्षण संस्थांमधील रिक्त पदांसाठी त्यांच्या संबंधित विषयातील यूजीसी नेट प्रमाणपत्राद्वारे अर्ज करू शकतील.
संरक्षण मंत्रालयात दहावी-बारावी उत्तीर्ण असणाऱ्यांना नोकरीची संधी
RBI Recruitment: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांची भरती

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …