मंदीच्या काळातही तुमची नोकरी राहील सुरक्षित, फक्त ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात

Authored by Pravin Dabholkar | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 11 Nov 2022, 9:48 am

Recession2k22: जागतिक मंदीचा कालावधी हा कमी असेल आणि त्याचा परिणाम कमी असेल असे जगातील आणि भारतातील सीईओंचे मत आहे. पण भविष्यात येणाऱ्या संकटांबद्दल आत्ताच काहीही सांगता येत नाही आणि त्यासाठी आपण आधीच तयारी केलेली बरी. या लेखाद्वारे काही खास टिप्स जाणून घेऊया, ज्याचा वापर करून तुम्ही जागतिक मंदीच्या परिस्थितीतही तुमची नोकरी टिकवून ठेवू शकाल.

 

Job Security Tips
मंदीच्या काळातही तुमची नोकरी राहील सुरक्षित, फक्त ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

हायलाइट्स:

  • मंदीच्या काळात अनेकांनी गमावली नोकरी
  • तुमची नोकरी राहू शकते सुरक्षित
  • फक्त ‘या’ गोष्टींची घ्या काळजी
हेही वाचा :  LSG Rajasthan Recruitment 2023 – Opening for 24,797 Safai Karmachari Posts | Apply Online
Recession2k22: जगभरात मंदी येण्याची शक्यता असून आतापासून हजारो लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागत आहेत. अशा परिस्थितीत संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे. असे केपीएमजीच्या अहवालानुसार, जागतिक मंदीचा कालावधी हा कमी असेल आणि त्याचा परिणाम कमी असेल असे जगातील आणि भारतातील सीईओंचे मत आहे. पण भविष्यात येणाऱ्या संकटांबद्दल आत्ताच काहीही सांगता येत नाही आणि त्यासाठी आपण आधीच तयारी केलेली बरी. या लेखाद्वारे काही खास टिप्स जाणून घेऊया, ज्याचा वापर करून तुम्ही जागतिक मंदीच्या परिस्थितीतही तुमची नोकरी टिकवून ठेवू शकाल.

१) छंद विकसित करा

संशोधनानुसार, बहुतेक लोक त्यांच्या छंदानुसार नोकरी सोडून व्यवसायाकडे वळत आहेत. मंदीच्या काळात तुमचा छंद उत्पन्नाचा मोठा स्रोत बनू शकतो. यामुळेच तरुणांनी आपले छंद वाढवण्यावर भर द्यावा.

२) या क्षेत्रात करिअर करण्याचा प्रयत्न करा

करोनाच्या संकटात आपण पाहिलं की, अनेक क्षेत्रं अशी आहेत जिथे काम थांबलेले नाही. शिक्षण, आरोग्य, माहिती तंत्रज्ञान अशी वाढत जाणारी क्षेत्र आहेत. तरुणांनी या क्षेत्रात आपले कौशल्य वाढवण्यासाठी काम केले पाहिजे. अशी कौशल्ये विकसित करण्याचा प्रयत्न करा ज्यामुळे तुम्हाला मंदीच्या काळातही नोकरीच्या संकटाचा सामना करावा लागणार नाही.

हेही वाचा :  दीड हजारपेक्षा अधिक विद्यार्थी स्थलांतरित, जिल्ह्याबाहेरून २५९ विद्यार्थी नाशिकमध्ये दाखल

Twitter layoffs: ‘ऑफिसला येत असाल तर घरी परता’, ट्विटरमध्ये कपात सुरु; एलोन मस्कचा मोठा निर्णय

३) नवीन कौशल्ये शिकण्याचा प्रयत्न करा

तुम्ही कुठेतरी काम करत असाल तरी रोज नवनवीन कौशल्ये शिकत राहण्याचा प्रयत्न करत राहा. असे केल्याने तुम्हाला तुमच्या क्षेत्राशी संबंधित कौशल्यांचे ज्ञान तर मिळेलच, शिवाय इतर क्षेत्रांचेही ज्ञान मिळेल. प्रत्येक कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना नवीन कौशल्ये शिकवण्यासाठी वेळोवेळी क्लासेस देते. या वर्गांमध्ये उत्साहाने भाग घ्या आणि तुमची कौशल्ये विकसित करा.

४) तुमचे ब्रँडिंग करा

हे डिजिटल जग आहे. या प्लॅटफॉर्मचा वापर करुन माहिती जागतिक स्तरावर लोकांपर्यंत पोहोचवी जाते. अशा परिस्थितीत ऑनलाइन नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवर आपले प्रोफाइल शेअर करणे आवश्यक आहे. यामुळे अधिकाधिक लोक आपल्याशी कनेक्ट होऊ शकतील. ऑनलाइन नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवर लोकांना तुमची कौशल्ये आणि यशाबद्दल सांगा.

अखेर ज्याची भीती होती तेच घडलं! ‘मेटा’मध्ये ११ हजार कर्मचाऱ्यांना नारळ!

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

हेही वाचा :  Virtual Learning: आभासी शिक्षण विद्यार्थ्यांना प्रादेशिक भाषांत मिळण्याची गरज

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …