सोलापूर : मुंबईत चिमुरडीच्या उपचारासाठी जाणाऱ्या आई-वडिलांना नाना पटोलेंनी पाठवले हेलिकॉप्टरमधून | Congress Nana Patole released her own helicopter for girl going to Mumbai for treatment abn 97


नानांच्या हेलिकॉप्टरमधून झोपडपट्टीतील एका चार वर्षाच्या मुलीला वैद्यकीय उपचारासाठी तिच्या आई-वडिलांसह मुंबईला पाठवण्यात आले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे सोलापुरात रविवारी पक्ष मेळाव्यासाठी ठरलेल्या वेळेपेक्षा दोन तास उशिरा आगमन झाले होते. त्यामुळे त्यांनी हेलिकॉप्टरऐवजी रात्री रेल्वेने मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. नाना पटोलेंचे हेलिकॉप्टर रिकामेच परतत असताना त्यामधून हृदयविकाराने त्रस्त असलेल्या झोपडपट्टीतील एका चार वर्षाच्या मुलीला वैद्यकीय उपचारासाठी तिच्या आई-वडिलांसह मुंबईला पाठवण्यात आले.

अक्कलकोट रोड एमआयडीसी भागातील सुनील नगरच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या तुकाराम दासी या श्रमिकाची मुलगी उंजल ही जन्मतःच हृदयविकाराने त्रस्त आहे. दासी कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती गरिबीची आहे. तिच्यावर मुंबईत वैद्यकीय उपचार होण्याची गरज निर्माण झाली होती. वैद्यकीय उपचार आर्थिकदृष्ट्या झेपत नसल्यामुळे दासी कुटुंबीयांनी काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांची नुकतीच भेट घेऊन मदत मागितली होती. त्याप्रमाणे दासी कुटुंबीयांना आधार देत, लहानग्या उंजल हिच्या हृदयविकारावर मुंबईत वैद्यकीय उपचार मिळवून देण्याचे आमदार शिंदे यांनी नियोजन केले होते. योगायोगाने रविवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे हेलिकॉप्टरने सोलापुरात दाखल झाले होते. पक्ष कार्यकर्त्यांसह भटक्या विमुक्त जाती जमाती समाजाच्या मेळाव्यासाठी पटोले यांना सोलापुरात येण्यास  दुपारनंतर दोन तास उशीर झाला. त्यामुळे त्यांनी पुढील कार्यक्रमात बदल करून रात्री रेल्वेने मुंबईला परतण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हेलिकॉप्टर रिकामेच परतणार होते.

हेही वाचा :  गर्भवती सुनेवर सासऱ्याचा अत्याचार, पीडितेने तक्रार केल्यावर पतीचं धक्कादायक उत्तर.. 'म्हणाला आता तू माझी'

तेव्हा आमदार प्रणिती शिंदे यांनी चिमुकल्या उंजल हिच्यावरील उपचारासाठी तिला आई-वडिलांसह याच हेलिकॉप्टरने मुंबईला पाठविण्याची विनंती पटोले यांना केली. पटोले यांनीही तात्काळ प्रतिसाद देत दासी कुटुंबीयांची विचारपूस करत त्यांना मुंबईला जाण्यासाठी स्वतःचे हेलिकॉप्टर उपलब्ध करून दिले.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

वसईतील बिबट्या पकडला, मात्र आता भाईंदरमध्ये मोकाट फिरतोय बिबट्या, CCTV Video समोर

Trending News Today: वसई किल्ला परिसरात गेल्या 25 दिवसांपासून धुमाकुळ घालणाऱ्या बिबट्याला मंगळवारी जेरबंद करण्यात …

JEE Main Result 2024: जेईई मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, महाराष्ट्रातील 7 जणांना मिळाले 100 टक्के गुण

JEE Main Result 2024 : जेईई मेन 2024 (JEE Main 2024) च्या दुसऱ्या सत्राचा निकाल …