Scholarship Result: पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर

5th 8th scholarship Result: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी), शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) चा अंतरिम (तात्पुरता) निकाल जाहीर करण्यात आला आहे. ही परीक्षा ३१ जुलै २०२२ रोजी घेण्यात आली होती.

या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना आपला निकाल परिषदेची अधिकृत वेबसाइट www.mscepune.in आणि https://www.mscepuppss.in वर पाहता येणार आहे. शाळांना आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या लॉगीनमधून तसेच पालकांना आपल्या पाल्यांचा निकाल वेबसाइटवर पाहता येईल.

UGC NET Results 2022: यूजीसी नेट परीक्षेचा निकाल जाहीर, येथे तपासा

MHT CET Counselling 2022: दुसऱ्या फेरीच्या जागा वाटपाचा निकाल जाहीर
गुणपडताळणी
विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये ७ ते ११ नोव्हेंबर या कालावधीत ऑनलाईन अर्ज भरावा लागेल. तसेच गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरीता रु. ५०/- याप्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाईन पेमेंटद्वारे भरावी लागणार आहे.

विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, शहरी / ग्रामीण, अभ्यासक्रम इत्यादीमध्ये दुरूस्तीसाठी १७ नोव्हेंबरपर्यंत संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. हा अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पध्दतीने पाठविल्यास स्वीकारले जाणार नाहीत. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

हेही वाचा :  Maharashtra Scholarship Results: शिष्यवृत्ती परीक्षांचे अंतिम निकाल जाहीर

दिलेल्या मुदतीत आवश्यक शुल्कासह ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जानुसार गुणपडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसांपर्यंत कळविण्यात येईल. दिलेल्या मुदतीत ऑनलाईन आलेले गुणपडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल.

दहावी-बारावीचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …