लांबणीवर पडलेली यंदाची शिष्यवृत्ती परीक्षा जूनमध्ये?

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेतली जाणारी शिष्यवृत्ती परीक्षा जून महिन्यामध्ये आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती जि. प. शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली. अद्याप परीक्षा परिषदेमार्फत अधिकृतपणे ही घोषणा करण्यात आलेली नसली, तरी जून महिन्यातील तारीखच यासाठी निश्चित केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य परीक्षा परिषदेमार्फत दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन केले जाते. यंदा ही परीक्षा राज्यभरात २० फेब्रुवारीला आयोजित करण्यात आली होती. परंतु, परीक्षा परिषदेमार्फत अचानकपणे ही परीक्षा अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले होते. दीड महिना उलटला तरी अद्यापही परीक्षा परिषदेमार्फत या परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. परंतु, परीक्षा परिषदेमार्फत जूनमध्ये पाचवी आणि आठवी या दोन्ही शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याची तयारी सुरू करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. याबाबत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाशी संपर्क साधला असता, अद्यापही परीक्षा परिषदेमार्फत याबाबत कोणतीही सूचना आलेली नसल्याचे सांगण्यात आले. परंतु, जूनमध्ये परीक्षा होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली. पुढील आठवड्यात या परीक्षेची अधिकृत तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीही ही परीक्षा करोना प्रादुर्भावामुळे पुढे ढकलून ऑगस्ट महिन्यात घेण्यात आली होती.

हेही वाचा :  जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांची भरती

‘टीईटी’ गैरमार्ग प्रकरणाचा अडसर

गेल्या वर्षी करोना प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनमुळे शिष्यवृत्ती परीक्षेला विलंब झाला होता. यंदा मात्र विलंब टाळण्यासाठी नोंदणी प्रक्रियाही वेळेत पूर्ण करून २० फेब्रुवारी ही परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली होती. परंतु त्यापूर्वीच टीईटी गैरमार्ग प्रकरणी परीक्षा परिषदेतील अधिकाऱ्यांना अटक झाल्यामुळे, तसेच त्यानंतर या गैरमार्गाचा छडा लावण्याचे काम सुरू झाल्यामुळे या विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी याच कामात अडकले आहेत. त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षेला विलंब होत असल्याची माहिती या विभागातील सूत्रांनी दिली.

MHT CET 2022: कोणत्या अभ्यासक्रमाची सीईटी कधी? जाणून घ्या

महत्त्वाचे मुद्दे…

पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या राज्यात मोठी आहे.

या परीक्षेमध्ये मराठी, इंग्रजी, बुद्धिमत्ता व गणित या विषयांचा पेपर सोडविण्यास दिला जातो.

उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पाचवीसाठी शंभर, तर आठवीसाठी दीडशे रुपये अशी मासिक शिष्यवृत्ती मिळते.

पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नाशिक जिल्ह्यातील २१ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी.

आठवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जवळपास १४ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

परीक्षेनंतर पाचवीच्या ८३३, तर आठवीच्या ६८८ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे.

Pariksha Pe Charcha 2022: परीक्षेला उत्सवी वातावरणात सामोरे जा – पंतप्रधान
ICAI CA मे-जून परीक्षांसाठी नोंदणी विंडो पुन्हा खुली
NEET 2022 Notification: नीट परीक्षा जूनऐवजी जुलैमध्ये होण्याची शक्यता

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

भारतीय हवाई दल अंतर्गत अग्निवीरवायु पदांची भरती

Indian Air Force Agniveervayu Recruitment 2024 – Indian Air Force Invites Application From Eligible Candidates …

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …