करिअर

SBI मध्ये परीक्षा न देता मिळेल नोकरी, ७८ हजारपर्यंत पगार

SBI Recruitment 2022: स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India, SBI) मध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. या पदांसाठी (SBI Job 2022) अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये व्यवस्थापक (प्रोजेक्ट-डिजिटल पेमेंट, उत्पादन-डिजिटल पेमेंट/कार्ड, …

Read More »

राज्यात लवकरच वैद्यकीय सेवा प्राधिकरण

Medical Services Authority: उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात दाखल झालेल्या एका याचिकेच्या पार्श्वभूमीवर खरेदी दरांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी आणि एकत्रित खरेदी केल्यास कमीत कमी दर मिळावा म्हणून २६ जुलै २०१७च्या शासन निर्णयानुसार हाफकिन जीव औषध महामंडळाच्या अंतर्गत खरेदी कक्ष स्थापन करण्यात आला आणि राज्यातील औषधे व उपकरणांची सर्व विभागांची खरेदी करण्याची जबाबदारी हाफकिनकडे सोपवण्यात आली होती.   राज्यात लवकरच वैद्यकीय सेवा प्राधिकरण …

Read More »

Engineering Admissions: इंजिनीअरिंग प्रवेशांमध्ये २१ हजारांनी वाढ

म. टा. प्रतिनिधी, मुंबईइंजिनीअरिंग महाविद्यालयांमधील विद्यार्थीसंख्या गेल्या काही वर्षांत घटत असताना यंदा मात्र त्यात वाढ झाली आहे. यंदा संपूर्ण राज्यात इंजिनीअरिंगच्या पदवी अभ्यासक्रमासाठी १,०९,४२२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. गेल्या वर्षीच्या विद्यार्थी संख्येच्या तुलनेत यावर्षी यामध्ये २३.७५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे इंजिनीअरिंग महाविद्यालयांना काहीसा दिलासा मिळाला आहे. राज्यात २०२२-२३ या वर्षासाठी इंजिनीअरिंग महाविद्यालयांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेशासाठी १,४५,२०१ जागा …

Read More »

HP layoffs: एचपीमधून पुढच्या तीन वर्षांत ६ हजार कर्मचार्‍यांना मिळणार डच्चू

Authored by Pravin Dabholkar | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 23 Nov 2022, 2:49 pm HP layoffs:एचपी आयएनसी मधील ही कपात त्यांच्या सध्याच्या कर्मचार्‍यांच्या सुमारे १० टक्के असल्याचे म्हटले जाते. हा कंपनीच्या खर्चात कपात करण्याच्या योजनांचा एक भाग आहे. एचपीची सतत कमी होत चाललेली विक्री आणि अर्थव्यवस्थेच्या चिंतेमुळे कंपनी हे करणार आहे. किंबहुना कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, चौथ्या तिमाहीतील महसुलात ११.२ टक्क्यांनी …

Read More »

केंद्राकडून दर महिन्याला १६ लाख रोजगार उपलब्ध होतायत, रेल्वेमंत्र्यांनी केला दावा

Railway Job: केंद्र सरकारकडून दर महिन्याला १६ लाख नोकऱ्यांची भरती केली जात असल्याचा दावा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केला आहे. म्हणजेच दर महिन्याला १६ लाख लोकांना रोजगार मिळत असल्याचे ते म्हणाले. अजमेरमध्ये सीआरपीएफने आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यात रेल्वेमंत्र्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, केंद्र सरकारकडून दर महिन्याला १६ लाख लोकांना पारदर्शकतेने नोकऱ्या दिल्या जात आहेत.जागतिक आर्थिक संकटाच्या काळातही भारत …

Read More »

महाराष्ट्रातील कन्नड शाळांसंदर्भात कर्नाटक सरकारने घेतला मोठा निर्णय

Kannada schools: महाराष्ट्रातील कन्नड शाळांना कर्नाटक सरकार विशेष अनुदान देणार आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी याबाबत माहिती दिली. त्यांच्या सरकारने महाराष्ट्रातील कन्नड माध्यमांच्या शाळांना विशेष अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. कर्नाटकच्या एकीकरणासाठी लढा देणाऱ्या शेजारच्या राज्यातील रहिवासी असलेल्या कन्नडिगांनाही पेन्शन दिली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमावादावरील न्यायालयीन खटला अनेक दशके सुरु आहे. महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे …

Read More »

एकाच इयत्तेत ३ वेळा नापास, साजिद खान कितवी शिकलाय माहितेय का?

Authored by Pravin Dabholkar | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 23 Nov 2022, 9:38 am Sajid Khan Career:साजिद खानचा जन्म बॉलिवूड इंडस्ट्रीतील माजी अभिनेते कामरान खान आणि मेनका खान यांच्या घरी झाला. प्रसिद्ध कोरिओग्राफर, दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेत्री फराह खान ही त्याची बहीण आहे. फरहान अख्तर आणि झोया अख्तर नात्यात त्याचे चुलत भावंड आहेत. साजिदने सुरुवातीचे शिक्षण मानेकजी कूपर स्कूलमधून केले. …

Read More »

HSC Exam: बारावी अर्जांसाठी अखेरचा आठवडा

म.टा.प्रतिनिधी, नागपूरयंदाच्या बारावी परीक्षेस बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी आता एका आठवड्याची मुदत उरली आहे. नियमित शुल्कासह २५ नोव्हेंबरपर्यंत तर विलंब शुल्कासह ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात बारावीची परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज भरावयाचे होते. त्याकरिता …

Read More »

Google मध्ये नोकरी संकट! सुंदर पिचाई १० हजार कर्मचाऱ्यांना घरी बसवणार

Authored by Pravin Dabholkar | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 22 Nov 2022, 3:24 pm Google Layoff: समाधानकारक काम न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी गुगलने नवीन रँकिंग आणि परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट प्लॅन लाँच केला आहे. या अंतर्गत, कंपनी आपल्या रडारवर आलेल्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा विचार करत आहे. यापूर्वी मेटा, अॅमेझॉन आणि ट्विटर या टेक फर्मनेही मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली …

Read More »

पदवी अभ्यासक्रमाच्या आजपासून परीक्षा

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या (परीक्षा प्रथम वर्ष वगळून) परीक्षा २२ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. परीक्षेसाठी एकूण तीन लाख १२ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे,’ अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. गणेश मंझा यांनी दिली. विद्यापीठाने मागील पदवी परीक्षेतील गोंधळ लक्षात घेऊन या सत्रातील परीक्षेची तयारी महिनाभरापूर्वीपासून सुरू केली. मंगळवारपासून सुरु होणाऱ्या पदवी …

Read More »

जागतिक मंदी म्हणजे काय? ती केव्हा येते? आल्यावर काय करायचं? अर्थतज्ञांचा इशारा समजून घ्या

Recession2k22: ज्या आयटी कंपन्या पूर्वी आलिशान पैसा आणि आरामदायी जीवन देण्यासाठी ओळखल्या जात होत्या, त्या आपल्या कर्मचाऱ्यांना निर्दयपणे काढून टाकत आहेत. ट्विटरमधून ५० टक्के लोकांना काढून टाकल्याची जगभरात चर्चा होत आहे. पण मेटा म्हणजेच फेसबुक, सिस्को, अॅमेझॉन आणि नेटफ्लिक्समधील कर्मचाऱ्यांनादेखील कपातीचा फटका बसला आहे. सहसा हे तेव्हाच घडते जेव्हा कंपनी तोट्यात जात असते. मंदीचे वारे वाहू लागणे हे देखील यामागचे …

Read More »

अरेरे! महापालिकेच्या निम्म्या विद्यार्थ्यांवर स्वेटरविना कुडकुडण्याची वेळ

म. टा. प्रतिनिधी, पुणेमहापालिकेच्या शाळांमधील निम्म्या विद्यार्थ्यांवर स्वेटरविना कुडकुडण्याची वेळ आली आहे. स्वेटरची अनुदानाची रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा केली नसल्याने दुसरी, चौथी, सहावी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. मनपाच्या शाळांमध्ये पहिली ते आठवीचे ८९ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याच्या खात्यात इयत्तानिहाय १५०० ते ४५०० रुपये जमा केले जातात. यंदाही ही प्रक्रिया राबवली जात आहे. पहिली, तिसरी, …

Read More »

‘जेजे’च्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच

म. टा. प्रतिनिधी, मुंबईजे. जे. कला महाविद्यालयातील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांची सोमवारी भेट घेतली. मात्र त्यामध्ये ठोस आश्वासन न मिळाल्याने आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला आहे. जे. जे. कला महाविद्यालयात कायमतत्त्वावर केवळ सात प्राध्यापक कार्यरत आहेत. कायम तत्त्वावरील प्राध्यपकांची पदे अनेक वर्षांपासून भरण्यात आली नसल्याने त्याचा शिक्षणावर परिणाम होत आहे. …

Read More »

BARTI: अनुसूचित जातीतल्या विद्यार्थ्यांना २ लाख देणारी बार्टीची योजना गेली कुठे?

म. टा. प्रतिनिधी, नागपूरडॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्यावतीने (बार्टी) २०२० साली दहावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांसाठी प्रतिविद्यार्थी दोन लाख रुपये देणारी डॉ. आंबेडकर विशेष अनुदान योजना सुरू करण्यात आली होती. मात्र, दोन वर्षे उलटली तरी ती कार्यान्वित झालेली नाही. बार्टीची योजना कुठे गेली, असा प्रश्न विचारण्यात येत आहे. इयत्ता दहावीमध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या अनुसूचित जातीमधील विद्यार्थ्यांना मेडिकल …

Read More »

ट्विटरमधून काढलेल्या कर्मचाऱ्यांसाठी भारतीय कंपनी आली धावून

Authored by Pravin Dabholkar | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 21 Nov 2022, 5:21 pm Koo Job:भारतासह संपूर्ण जगात रोजगाराचे मोठे संकट निर्माण झाले आहे. ट्विटरवरून काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांसाठी आता एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. भारतातील ट्विटरचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी कूचे सह-संस्थापक मयंक बिदावतका यांनी एक मोठी घोषणा केली आहे. कंपनी दिलेल्या माहितीनुसार, ट्विटरमधून काढण्यात आलेले कर्मचारी कू कंपनीत सहभागी …

Read More »

मुंबई विद्यापीठातील ‘विधी’च्या विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यात अडचणी

म. टा. प्रतिनिधी, मुंबईमुंबई विद्यापीठाच्या विधी अभ्यासक्रमाच्या (Mumbai University Law Courses) सत्र परीक्षा तोंडावर आल्या असताना, अद्यापही विद्यार्थ्यांचे अर्ज भरलेले नाहीत. त्यामुळे परीक्षेपूर्वी प्रवेशपत्र मिळणार की नाही, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. तसेच २९ नोव्हेंबरला नियोजित असलेली परीक्षा होणार का, असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून विचारला जात आहे. विद्यापीठाकडून विधी अभ्यासक्रमाच्या पाचव्या आणि सहाव्या सत्राची परीक्षा घेतली जाते. त्यासाठी परीक्षेपूर्वी विद्यापीठाकडे अर्ज दाखल …

Read More »

Interview Tips: मुलाखत देताना घाम फुटतो? काहीच आठवत नाही?..मग ‘या’ टिप्स करा फॉलो

Tips For Interview: तुम्हाला मुलाखतीला जाण्याची भीती वाटते का? तुम्ही मुलाखती दरम्यान सर्वकाही विसरुन जाता का? इंटरव्ह्यूला जाता तणाव, घाम येतो का? असे होत असेल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. ही मुलाखत मी कशी उत्तीर्ण होईन? माझ्या बोलण्यातल्या चुका तर काढल्या जाणार नाहीत ना? अशा अनेक शंका उमेदवारांच्या मनात येत असतात. दरम्यान या टिप्स तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहेत. १) …

Read More »

आता झोमॅटोही करणार कपात, ४ टक्के कर्मचारी गमावणार नोकऱ्या

Recession2k22: भारतीय फूड डिलिव्हरी अॅप झोमॅटोचे नावही कर्मचाऱ्यांना काढून टाकणाऱ्या कंपन्यांच्या यादीत सामील झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार झोमॅटोने या आठवड्यापासूनच कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यास सुरुवात केली आहे. उत्पादन, तंत्रज्ञान, कॅटलॉग आणि मार्केटींग यासारख्या क्षेत्रांमध्ये कमीतकमी १०० कर्मचाऱ्याच्या नोकरीवर याआधीच परिणाम झाल्या म्हटले जाते. सप्लाय चैनमधील कर्मचाऱ्यांवर याचा परिणाम झाला नाही. झोमॅटो आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी किमान ४ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी …

Read More »

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मिळणारी ‘ही’ सुविधा रद्द

म. टा. प्रतिनिधी, पुणेकरोनाकाळात दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून देण्यात आलेली ‘शाळा तेथे केंद्रा’ची सुविधा यंदा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे फेब्रुवारी-मार्च २०२३मध्ये होऊ घातलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना आपल्याच शाळेत केंद्र मिळणार नाही. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना गेल्या वर्षी पेपर लिहिण्यासाठी देण्यात आलेला अतिरिक्त कालावधीही काढून टाकण्यात आला आहे. यंदाच्या परीक्षा करोनापूर्वीच्या पद्धतीनुसार पार पडणार असल्याची माहिती राज्य मंडळाचे …

Read More »

विद्यापीठ निवडणुकांतही ठाकरे-शिंदे गट समोरासमोर

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षात शिवसेनेत फूट पडल्यानंतर आता युवा सेनेतही दोन गट पडले आहेत. हे दोन्ही गट लवकरच विद्यापीठांच्या सिनेट निवडणुकीसाठी आमने-सामने येणार असून, त्यांनी प्रामुख्याने मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. दोन्ही गटांनी सिनेटच्या निवडणुकीसाठी बैठकीचे आयोजन केले असून, या निवडणुकीसाठी आवश्यक नोंदणी प्रक्रियेत बाजी मारावी म्हणून शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट समोरासमोर उभे ठाकले आहेत.मुंबई …

Read More »