Engineering Admissions: इंजिनीअरिंग प्रवेशांमध्ये २१ हजारांनी वाढ

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

इंजिनीअरिंग महाविद्यालयांमधील विद्यार्थीसंख्या गेल्या काही वर्षांत घटत असताना यंदा मात्र त्यात वाढ झाली आहे. यंदा संपूर्ण राज्यात इंजिनीअरिंगच्या पदवी अभ्यासक्रमासाठी १,०९,४२२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. गेल्या वर्षीच्या विद्यार्थी संख्येच्या तुलनेत यावर्षी यामध्ये २३.७५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे इंजिनीअरिंग महाविद्यालयांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

राज्यात २०२२-२३ या वर्षासाठी इंजिनीअरिंग महाविद्यालयांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेशासाठी १,४५,२०१ जागा उपलब्ध होत्या. त्यासाठी प्रत्यक्षात १,३२,७१८ जागांसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. यापैकी शेवटच्या फेरीअखेर १,०९,४९९ विद्यार्थ्यांनी इंजिनीअरिंगसाठी प्रवेश निश्चित केले आहेत. सीईटी सेलने दिलेल्या माहितीतून ही बाब समोर आली आहे.

गेल्या वर्षीपेक्षा यंदा इंजिनीअरिंगच्या पदवी अभ्यासक्रमासाठी सुमारे २०,९९६ने वाढ झाली आहे. गेल्या वर्षी (२०२१-२२) राज्यात इंजिनीअरिंगच्या पदवी अभ्यासक्रमासाठी १,३९,४८४ जागा होत्या. त्यापैकी ८८,४२६ जागा भरल्या गेल्या. त्यातून सुमारे ५१,०५८ जागा रिक्त होत्या. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा इंजिनीअरिंग प्रवेशाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढल्याने रिक्त जागांच्या संख्या ३५,७०२पर्यंत घटली आहे.

विद्यार्थ्यांकडून कॉम्प्युटर इंजिनीअरिंग, आयटी अभ्यासक्रमाच्या अभियांत्रिकी शाखांना पसंती दिल्याचे दिसून येत आहे. त्याचवेळी सिव्हील इंजिनीअरिंग, मेकॅनिकल इंजिनीअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग शाखेकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटलेली दिसत आहे.

हेही वाचा :  CSIR UGC NET जून उत्तरतालिका जाहीर, २५ फेब्रुवारीपर्यंत नोंदवा आक्षेप

महाविद्यालयांच्या संख्येतही घट

गेल्यावर्षी अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमासाठी ३२९ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. यंदा या महाविद्यालयांची संख्याही घटून ३२६ झाली आहे. मात्र त्याचवेळी महाविद्यालयांतील जागा मात्र वाढल्याचे दिसत आहे. गेल्यावर्षी राज्यात अभियांत्रिकीच्या १,३९,४८४ जागा होत्या. यंदा त्या वाढून १,४५,२०१ झाल्या आहेत.

महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थी संख्येत वाढ

अभियांत्रिकीची पुस्तके मराठीतून, भाषांतराच्या त्रुटी आढळल्याने विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ

उपलब्ध जागा प्रवेश घेतलेले विद्यार्थी

आर्टीफिशिअल इंजिनीअरिंग ४७६३ ४४८७

सिव्हिल इंजिनीअरिंग १८६२२ ७२७१

कम्प्युटर इंजिनीअरिंग २२०५१ २१०५८

कम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग ११६७७ ११०७६

इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग ११२४१ ७६४१

इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजि. १७३६४ १५५९८

इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी ११२०५ १०८७१

मेकॅनिकल इंजिनिअरींग २४८१९ १२२२९

अरेरे! महापालिकेच्या निम्म्या विद्यार्थ्यांवर स्वेटरविना कुडकुडण्याची वेळ

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …