Interview Tips: मुलाखत देताना घाम फुटतो? काहीच आठवत नाही?..मग ‘या’ टिप्स करा फॉलो

Tips For Interview: तुम्हाला मुलाखतीला जाण्याची भीती वाटते का? तुम्ही मुलाखती दरम्यान सर्वकाही विसरुन जाता का? इंटरव्ह्यूला जाता तणाव, घाम येतो का? असे होत असेल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. ही मुलाखत मी कशी उत्तीर्ण होईन? माझ्या बोलण्यातल्या चुका तर काढल्या जाणार नाहीत ना? अशा अनेक शंका उमेदवारांच्या मनात येत असतात.
दरम्यान या टिप्स तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहेत.

१) आत्मविश्वासपूर्ण दिसणे गरजेचे

आत्मविश्वास ही कोणत्याही मुलाखतीची सर्वात मोठी आवश्यक बाब असते.ते तुमच्या देहबोलीत (चालणे, बोलणे इ.) प्रतिबिंबित झाले पाहिजे. तुमचा प्रामाणिकपणा, आत्मविश्वास आणि स्वारस्य दर्शविण्यासाठी मुलाखतीत समोरच्यांच्या डोळ्यांशी संपर्क ठेवा. डोळ्यांशी संपर्कात राहणे म्हणजे टक लावून पाहणे असा नाही.

२) तयारी आणि संशोधन

चांगल्या तयारीतून चांगला आत्मविश्वास येतो. त्यामुळे मुलाखतीची तयारी पुरेशा संशोधनावर आधारित असावी. तुम्ही गेल्या एक-दोन वर्षात केलेल्या कामाबद्दल तुम्हाला सर्व काही चांगले माहित असले पाहिजे. जर तुम्ही कोणत्याही महाविद्यालयात किंवा विद्यापीठात प्रवेशासाठी मुलाखत देत असाल तर तुम्हाला ज्या अभ्यासक्रमात प्रवेश घ्यायचा आहे त्याविषयी जास्तीत जास्त माहिती हवी.
नोकरी का करायची आहे यासारख्या प्रश्नांसाठी तयार असले पाहिजे; अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तो काय करेल; तो नंतर समाजात कसे योगदान देईल; त्याला का वाटते की त्याला निवडले पाहिजे; त्याचे अद्वितीय गुण काय आहेत; त्याची ताकद आणि कमतरता काय आहेत. प्रामाणिक संशोधन आणि तयारी आपोआप तुमच्या बोलीमध्ये दिसून येईल.

हेही वाचा :  विमानतळ प्राधिकरण ज्युनियर एक्झिक्युटिव्ह भरती परीक्षेचा निकाल जाहीर

३) सौजन्य राखा

सौजन्य हा सभ्यता आणि योग्य वर्तनाचा नियम आहे. सौजन्य हा आदर दाखवण्याचा मार्ग आहे. शिष्टाचार राखलात तर वेगवेगळी परिस्थिती हाताळण्यात तुम्ही किती सक्षम आहात हे मुलाखतकर्त्याला दिसते. हे कृतीतून दर्शविण्यासाठी मुलाखतीच्या खोलीत प्रवेश करताच सुप्रभात किंवा नमस्कार वगैरे बोलून संपूर्ण मुलाखत पॅनेलला योग्यरित्या अभिवादन करा. मुलाखतीदरम्यान एखादा प्रश्नाचे उत्तर येत नसल्यास प्रतिप्रश्न न करता प्रामाणिकपणे माफी मागा.

अचानक नोकरी गेली तर काय करायचं? ‘या’ टिप्स करिअरमध्ये सर्वांनाच उपयोगी

Creative Resume बनवून केला गुगलमधील नोकरीसाठी अर्ज, जगभरात होतेय चर्चा

४) बॉडीलॅंग्वेज

‘पहिली छाप ही शेवटची छाप’ असे म्हणतात. मुलाखतीला जाण्यापूर्वी स्वच्छआंघोळ करा, पादत्राणांसह स्वच्छ धुतलेले/इस्त्री केलेले औपचारिक कपडे घाला. चांगला बेल्ट घ्या.
सुगंधासाठी सौम्य डीओ वापरा आणि परफ्यूमचे दुकान बनू नका. आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यासाठी तुमच्या खिशात हात रुमाल ठेवा. तुम्ही नोकरीदरम्यान येणारी कर्तव्ये आणि जबाबदाऱ्याही पार पाडू शकाल.

५) योग्य देहबोली

तुमच्या देहबोलीतून समोरच्या व्यक्तीला तुमच्याबद्दल न सांगताही सर्वकाही कळत असते. त्यामुळे तुमच्या देहबोलीसंदर्भातील प्रत्येक लहानात लहान गोष्टीकडे लक्ष ठेवा. मुलाखत देताना अंगाची जास्त हालचाल करु नका. तुमच्याकडे फाईल असेल तर ती तुमच्या मांडीवर ठेवा. खुर्चीवर सरळ बसणे आत्मविश्वास आणि विश्वासार्हता दर्शवते. चेहऱ्यावर हलके हसू ठेवा.

हेही वाचा :  Online interview मध्ये यश मिळवायचे असेल तर 'या' ७ टिप्स फॉलो करा

६) चौकटीबाहेरचा विचार

प्रत्येक मुलाखतीत अनेक प्रश्न बहुदा सारखेच असतात. तुम्ही सध्या काय करता? आवडता छंद? वैगेरे अशा प्रश्नांची तीच तीच उत्तरे न देता वेगळ्या पद्धतीने उत्तरे देऊन मुलाखतकाराला प्रभावित करा. येथे प्रामाणिकपणा सर्वोत्तम ठरतो. स्वयंपाक, योगा जे काही करत असाल ते प्रामाणिकपणे सांगा.

याशिवाय मुलाखतीला जाण्यापूर्वी पुरेसा बोलण्याचा सराव करा. सकारात्मक राहा, औपचारिक भाषेचा वापर करा. असे केलात तर यश तुम्हाला नक्कीच मिळेल.

Career Tips: यशस्वी करिअरसाठी योग्य निर्णय महत्वाचा, या ५ टिप्स करा फॉलो

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …