Google मध्ये नोकरी संकट! सुंदर पिचाई १० हजार कर्मचाऱ्यांना घरी बसवणार

Authored by Pravin Dabholkar | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 22 Nov 2022, 3:24 pm

Google Layoff: समाधानकारक काम न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी गुगलने नवीन रँकिंग आणि परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट प्लॅन लाँच केला आहे. या अंतर्गत, कंपनी आपल्या रडारवर आलेल्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा विचार करत आहे. यापूर्वी मेटा, अॅमेझॉन आणि ट्विटर या टेक फर्मनेही मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली आहे.

 

Google Layoff
गुगलमध्ये नोकरी संकट! सुंदर पिचाई १० हजार कर्मचाऱ्यांना घरी बसवणार

हायलाइट्स:

  • गुगलमध्ये नोकरी संकट
  • १० हजार कर्मचाऱ्यांना घरी बसवणार
  • सुंदर पिचाई महत्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत
हेही वाचा :  कर्मचाऱ्यांना हवंय Work From Home, वेतनवाढ-नोकरी सोडण्यासही तयार
Google Layoff: गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटनेही आता मेटा, अॅमेझॉन, ट्विटरच्या पावलावर पाऊल टाकले आहे. जगातील सर्वात मोठी टेक कंपनी आता आपल्या १० हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा विचार करत आहे. कंपनी ६ टक्के कर्मचारी कमी करणार आहे. याअंतर्गत प्रथम ‘खराब कामगिरी करणाऱ्या’ कर्मचाऱ्यांना कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवला जाणार आहे.

द इन्फॉर्मेशनमधील एका रिपोर्टनुसार, समाधानकारक काम न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी गुगलने नवीन रँकिंग आणि परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट प्लॅन लाँच केला आहे. या अंतर्गत, कंपनी आपल्या रडारवर आलेल्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा विचार करत आहे. यापूर्वी मेटा, अॅमेझॉन आणि ट्विटर या टेक फर्मनेही मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली आहे.

पुढील वर्षाच्या सुरुवातीपासून पिंक स्लिप

“न्यू परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट सिस्टिम पुढील वर्षाच्या सुरुवातीपासून हजारो कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यास मॅनेजमेंना मदत करू शकते. नवीन प्रणाली अंतर्गत व्यवस्थापकांना ६ टक्के कर्मचारी किंवा सुमारे १० हजार लोकांना त्यांच्या व्यवसायावरील प्रभावाच्या दृष्टीने कमी कामगिरी करणारे म्हणून वर्गीकृत करण्यास सांगितले आहे.

गुगलची कर्मचारी संख्या सध्या १.८७ लाख

अल्फाबेटमध्ये अंदाजे १ लाख ८७ हजार कर्मचारी आहेत. यूएस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन (SEC) फाइलिंगनुसार, गेल्यावर्षी, अल्फाबेट कर्मचार्‍याची सरासरी भरपाई अंदाजे $२,९५,८८४ होती. अल्फाबेटने तिसऱ्या तिमाहीत (Q3) $१३.९ अब्ज डॉलरचा निव्वळ नफा नोंदवला आहे. हा एका वर्षापूर्वीच्या तुलनेत २७ टक्क्यांनी कमी आहे. तर जागतिक मंदी आणि मंदीच्या भीतीने महसूल ६ टक्क्यांनी वाढून $६९.१ अब्ज झाला आहे.

हेही वाचा :  शासकीय कंत्राटी भर्तीचा GR निघाला; तब्बल 85 संवर्गातील रिक्त पदे भरणार

कर्मचार्‍यांना काढण्याची प्रक्रिया पुढील वर्षापर्यंत सुरुच, Amazon कडून मिळतायत धक्क्यांवर धक्के
ट्विटरमधून काढलेल्या कर्मचाऱ्यांसाठी भारतीय कंपनी आली धावून

पिचाई यांना कंपनीची कामगिरी सुधारायची

कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांनी अल्फाबेटला २० टक्के अधिक कार्यक्षम बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. काही कर्मचार्‍यांच्या नोकऱ्या कमी करायच्या असतील तर अल्फाबेट कंपनीत नवीन जॉब रोलसाठी अर्ज करण्यासाठी ६० दिवसांचा अवधी देत असल्याचे यापूर्वीचे अहवाल आले होते. पिचाई म्हणाले होते की, कंपनी अजूनही क्वांटम कॉम्प्युटिंग सारख्या दीर्घकालीन प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करत आहे. परंतु स्मार्ट असणे, काटकसरी असणे, व्यर्थ नसणे आणि अधिक कार्यक्षम असणे महत्वाचे आहे.

गुगलकडे अधिक कर्मचारी आणि पगार

जागतिक मंदीच्या भीतीच्या पार्श्वभूमीवर जगभरातील आयटी कंपन्यांमध्ये आता पुनर्रचनेची मागणी वाढत आहे. गुगलच्या मूळ कंपनी अल्फाबेटमधील गुंतवणूकदारांपैकी एक अब्जाधीश उद्योगपती सर क्रिस्टोफर होनच्या हेज फंडाने कंपनीला पत्र लिहून आरोप केला आहे. त्यानुसार गुगल आणि यूट्यूबच्या कर्मचार्‍यांना जास्त पगार दिला जात असून कर्मचाऱ्यांमध्ये कपात करा असे म्हटले आहे.

Amazon ने कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं..आता पत्र लिहून कळविलं असं काही..

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

हेही वाचा :  Success Story: जन्मताच अंधत्व मिळालेल्या डोळ्यांनी पाहिले स्वप्न,९व्या प्रयत्नात नागेद्रन बनला IAS अधिकारी

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …