Success Story: जन्मताच अंधत्व मिळालेल्या डोळ्यांनी पाहिले स्वप्न,९व्या प्रयत्नात नागेद्रन बनला IAS अधिकारी

UPSC Success Story: जर तुमच्या मनात एखादी गोष्ट करायची जिद्द असेल आणि ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही कठोर परिश्रम करत असाल, तर प्रतिकूल परिस्थितीसुद्धा तुमच्या यशात अडथळा ठरू शकत नाही. तामिळनाडूच्या डी बाला नागेंद्रन यांनी हे सिद्ध करुन दाखविले आहे. बाला नागेंद्रन हे जन्मापासून शंभर टक्के अंध आहेत. पण त्यांनी लहानपणापासूनच कलेक्टर होण्याचे स्वप्न बंद डोळ्यांनी पाहिले होते. बालाने यासाठी कठोर परिश्रम केले. अपयशाचा सामना केला, पण हार मानली नाही. त्यांच्या संघर्षाची कहाणी जाणून घेऊया.

नागेंद्रन लहानपणापासूनच अभ्यासात हुशार

डी बाला नागेंद्रन यांनी चेन्नईतील लिटल फ्लॉवर कॉन्व्हेंट आणि रामा कृष्णा मिशन स्कूलमधून त्यांचे प्रारंभिक शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी चेन्नईच्या लॉयला कॉलेजमधून बीकॉमची पदवी घेतली. बालाचे वडील भारतीय लष्करातून निवृत्त झाले असून सध्या ते चेन्नईमध्ये टॅक्सी चालक म्हणून काम करतात. त्यांची आई गृहिणी आहे. बाला लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असून त्यांची गणना शाळेतील उत्तम मुलांमध्ये होते. बालाची ही प्रतिभा ओळखून शाळेतील शिक्षकांनी त्याला आयएएस होण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यानंतर बाला आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पाहू लागले.

हेही वाचा :  AISSEE Result 2022: सैनिक शाळा प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर

सततच्या अपयशानंतरही हार मानली नाही

बीकॉमची पदवी घेतल्यानंतर, बाला यांनी २०११ मध्ये नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरू केली. मात्र, येथे ब्रेल लिपीतील सर्व पुस्तके उपलब्ध नसल्यामुळे त्यांची मोठी अडचण झाली. पण त्यांनी हार मानली नाही. यानंतर बालाने ४ वेळा यूपीएससीची परीक्षा दिली आणि प्रत्येक वेळी त्यांना अपयश येत होते. तया अडथळ्यांना न जुमानता, बाला नागेंद्रन यांनी IAS अधिकारी होण्याच्या अतुलनीय आत्मविश्वासाने आपली तयारी सुरू ठेवली. पाचव्या प्रयत्नात त्यांना यश मिळाले पण नोकरीवर रुजू झाले नाहीत. ८ परीक्षांमध्ये संघर्ष करुन त्यांनी नवव्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन निर्धारित लक्ष्य पूर्ण केले. सिव्हिल सर्व्हिसेस २०१९ परीक्षेत ६५९ वा क्रमांक मिळविला. ज्याद्वारे त्यांना त्यांच्या आवडीचे आयएएस पद मिळाले.

JEE Mains:’आयआयटी-जेईई मेन्स’ पुढे ढकलणार? मुंबई हायकोर्टचा महत्वपूर्ण निर्णय

बाला यांचा आदर्श IAS आर्मस्ट्राँग

अनेक अपयशानंतर यश मिळवणाऱ्या बाला नागेंद्रनची ही कहाणी तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. बाला तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री के कामराज आणि आयएएस अधिकारी आर्मस्ट्राँग पामे यांना त्यांच्या यशाची प्रेरणा मानतात. IAS आर्मस्ट्राँग मणिपूर ते नागालँडला जोडणारा १०० किमीचा रस्ता बांधण्यासाठी लोकप्रिय आहे.शासनाची कोणतीही आर्थिक व कामगार मदत न घेता त्यांनी हा रस्ता स्वत: बांधला होता.

हेही वाचा :  नवीन वैद्यकीय शिक्षण प्रणाली अंतर्गत विद्यार्थ्यांना 'हे' काम करणे अनिवार्य

बाला यांना आयएएस होऊन बाल शोषण आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी काम करायचे आहे. देशातील गरिबी, बेरोजगारी आणि इतर सर्व सामाजिक आजारांचे उच्चाटन करण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण हाच एकमेव उपाय आहे, असे बाला यांचे मत आहे.

Success Story: सायकलवर भाजी विक्रेत्याचा मुलगा बनला सीए, रोहितच्या संघर्षाची कहाणी जाणून घ्या
Satyajeet Tambe Education: कॉंग्रेसला ‘दे धक्का’ करणारे सत्यजित तांबे शिक्षणात ‘लय भारी’, जाणून घ्या

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …