युक्रेनमध्ये 20 हजार भारतीय विद्यार्थी अडकलेत, यावरुन मोठा पेच

नवी दिल्ली : Russia-Ukraine Conflict: युक्रेन आणि रशियात सध्या युद्धाचे सावट वाढल्याने शिक्षणासाठी गेलेले 20 हजार विद्यार्थी युक्रेनमध्येच  (Ukraine) अडकले आहेत. (  Indian students stuck) भारतीयांना युक्रेन सोडण्याची सूचना भारतीय दूतावासाकडून देण्यात आली आहे. मात्र, भारतात परत येण्यासाठी भारतीय विद्यार्थ्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.(20,000 Indian students stuck in Ukraine)

30 हजार रुपये असलेले विमानाचं तिकीट आता दीड लाख इतके करण्यात आले आहे. ही रक्कम परवडणारी नसून, भारत सरकारने मदत करावी, अशी व्यथा युक्रेनमध्ये असलेल्या तरुणांनी ‘झी 24 तास’कडे व्यक्त केली. 

हजारो भारतीय विद्यार्थ्यांमध्ये बहुतेक अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. रशिया आणि युक्रेन युद्धाच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हे विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यापैकी बहुतांश राजस्थान, आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ आणि पंजाबमधील आहेत.

युक्रेनमध्ये सुमारे 20,000 विद्यार्थी शिकत आहेत. राजस्थानच्या कोटा येथून सुमारे 40 विद्यार्थी आहेत तर राजस्थानमधील 1,000 हून अधिक विद्यार्थी आहेत. परदेशात संकटात सापडलेल्या भारतीयांना मदत करण्यासाठी  काँग्रेस नेते चर्मेश शर्मा यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना विनंती केली आहे. या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी राष्ट्रपतींनी सरकारला निर्देश देण्याची विनंती केली आहे.

हेही वाचा :  खरंच युक्रेनमधील सर्वात सुंदर महिला शस्त्रानं देतेय रशियाला उत्तर? तिचं धाडसी रुप एकदा पाहाच

बहुतेक विद्यार्थी पश्चिम युक्रेनमध्ये राहत आहेत. तर पूर्वेकडील भागात युद्धाच्या पार्श्वभूमीवर तणाव आहे. युक्रेनमध्ये चांगले शिक्षण आणि स्वस्त प्रवेशामुळे युक्रेनला भारतीयांची पसंती  दिसून येत आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

क्लस्टर योजना सत्यात उतरणार! आशियातील सर्वात मोठ्या योजनेचा मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते होणार शुभारंभ

ठाणे : देशातीलच नव्हे तर आशिया खंडातील (Asia) सर्वात मोठ्या, महत्वाकांक्षी आणि ऐतिहासिक समुह विकास …

Amol Kolhe: राष्ट्रवादी शिरुरमध्ये भाकरी फिरवणार? अजितदादांच्या गुगलीनंतर कोल्हे गॅसवर?

Shirur Lok Sabha constituency: राष्ट्रवादीचे माजी आमदार आणि अजितदादांचे खास… विलास लांडेंच्या (Vilas Lande) वाढदिवसानिमित्त …