टेलिकॉम कंपनीच्या सर्विसला वैतागला? घरबसल्या करता येईल मोबाइल नंबर पोर्ट, फक्त करा १ मेसेज

टेलिकॉम कंपनीच्या सर्विसला वैतागला? घरबसल्या करता येईल मोबाइल नंबर पोर्ट, फक्त करा १ मेसेज

टेलिकॉम कंपनीच्या सर्विसला वैतागला? घरबसल्या करता येईल मोबाइल नंबर पोर्ट, फक्त करा १ मेसेज

नवी दिल्ली : भारतात काही ठराविकच टेलिकॉम कंपन्या आहेत, ज्या यूजर्सला सेवा पुरवतात. यात प्रामुख्याने सरकारी कंपनी बीएसएनएल आणि खासगी कंपन्या रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडियाचा समावेश आहे. त्यामुळे सिम कार्ड खरेदी करताना यापैकीच एकाची निवड करावी लागते. मात्र, अनेकदा आपल्याला एखाद्या कंपनीची सर्विस आवडत नाही. अशावेळेस आपण दुसऱ्या कंपनीचे सिम कार्ड खरेदी करून नंबर बदलतो. मात्र, तुम्ही नंबर न बदलता देखील सहज दुसऱ्या कंपनीची सर्विस घेऊ शकता. यासाठी तुम्हाला केवळ आपला मोबाइल नंबर पोर्ट करावा लागेल. सिम पोर्ट करण्याची प्रोसेस खूपच सोपी आहे. तुम्ही घरबसल्या सिम पोर्ट करण्यासाठी रिक्वेस्ट करू शकता. तुम्ही सध्याच्या टेलिकॉम ऑपरेटरच्या सर्विसला वैतागला असाल तर पुढील स्टेप्स फॉलो करून सिम पोर्ट करू शकता.

वाचा: एकच नंबर !आता एका क्लिकवर Google Pay युजर्सच्या अकाउंटमध्ये येतील लाखो रुपये, पाहा कसे?

असे करा मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी

Mobile Number Port करण्यासाठी यूजर्सला सध्याचा नंबर बदलण्याची गरज नाही. तुम्ही सहज टेलिकॉम ऑपरेटर बदलू शकता. तसेच, सिम पोर्ट करण्याची कोणतीही मर्यादा नाही. तुम्ही कितीही वेळा कंपनी बदलू शकता. सिम पोर्ट कसे करता येईल, जाणून घ्या.

  • तुम्हाला सिम पोर्ट करण्यासाठी तुमच्या सध्याच्या मोबाइल नंबरवरून १९०० वर SMS पाठवावा लागेल.
  • तुम्हाला PORT मोबाइल नंबर असे लिहून १९०० वर पाठवावे लागेल.
  • त्यानंतर तुमच्या नंबरवर एक यूनिट पोर्टिंग कोड येईल, जो १५ दिवस वैध असेल.
  • आता तुमच्या जवळील कंपनीच्या रिटेल स्टोरवर जा व सिम पोर्ट करायचे असल्याची माहिती द्या.
  • तुम्हाला सोबत फोटो, ओळखपत्राचा पुरावा, पत्त्याचा पुरावा – रेंट एग्रिमेंट, लँडलाइन बिल, विजेचे बिल हे द्यावे लागेल.
  • तुम्ही जर पोस्टपेड सबस्क्राइबर असाल तर बिलाची कॉपी जमा करावी लागेल.
  • कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर तुमचे सध्याचे सिम बंद होईल व नवीन सिम सुरू होईल. ही प्रोसेस पूर्ण होण्यासाठी जवळपास एक आठवडा लागू शकतो. काही कंपन्या घरपोच देखील सुविधा देत आहे. अशाप्रकारे तुम्ही सहज नंबर पोर्ट करू शकता.
हेही वाचा :  फोन सर्व्हिस सेंटरला देण्याआधी ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा होईल मोठे नुकसान

वाचा: अनलिमिटेड कॉलिंगसाठी बेस्ट आहेत हे ९ प्रीपेड प्लान, सर्वात स्वस्त ४९ रुपयाचा, ५६ GB पर्यंत डेटासह अनेक फायदे

वाचा: Nokia Go Earbuds 2+ आणि Nokia Go Earbuds 2 Pro लाँच, पाहा डिव्हाइसेसमध्ये काय आहे खास

वाचा: सिम कार्ड खरेदी करतांना ‘या’ गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास व्हाल Sim Card Fraud चे शिकार

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा; निवडणूक आयोगाने गोठवलं पिपाणी चिन्ह

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा; निवडणूक आयोगाने गोठवलं पिपाणी चिन्ह

Sharad Pawar News: शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. कारण निवडणूक आयोगाने बिगुल …

नाशिक-मुंबई महामार्गाची भयानक अवस्था; रेल्वेने ट्रेन कोच ऍम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्याची मागणी

नाशिक-मुंबई महामार्गाची भयानक अवस्था; रेल्वेने ट्रेन कोच ऍम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्याची मागणी

Nashik Mumbai Highway : नाशिक-मुंबई महामार्गावर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी होत आहे. या महामार्गावर अशी …